Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

संख येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार
सांगली, १३ जुलै / प्रतिनिधी

 

महिला व बालकांच्या आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जत तालुक्यातील संख येथील प्रश्नथमिक आरोग्य कंेद्रास राज्य शासनाचा डॉ. श्रीमती आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. श्रीमती शोभा बच्छाव उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या देशात ज्या-ज्या ठिकाणी सुबत्ता आली, त्या त्या ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढलेले आहे, ही बाब चिंताजनक आहे. या गोष्टीचा आपण अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण घटत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
संख आरोग्य केंद्र हे एक सांगली जिल्ह्य़ातील आदर्श कंेद्र असून आरोग्य सेवेला सर्वोच्च प्रश्नधान्य देऊन या प्रश्नथमिक आरोग्य कंेद्रात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्राच्या परिसरात अनेक प्रकारची वृक्षे लावून हा परिसर निसर्गरम्य बनविला असून या परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, चाचण्या व उपचार तसेच शस्त्रक्रिया याकामी या आरोग्य केंद्राने उल्लेखनीय काम केले आहे. येथील आरोग्य सेवेतील या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संख प्रश्नथमिक आरोग्य कंेद्राची निवड राज्यस्तरावरील मानांकित अशा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी केली. रोख ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन या आरोग्य केंद्रास गौरविण्यात आले.
डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती कांचन पाटील, आरोग्य सभापती कमलताई शिंदे, महिला व बालकल्याण सभापती सुजाता पाटील व जत पंचायत समितीचे सभापती बाबासाहेब कोडग यांनी स्वीकारला. यावेळी पलूस पंचायत समितीच्या सभापती श्रीमती पुष्पलता उगळे, आरोग्य समिती सदस्य के. डी. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती अरुणा इटाई, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रदीप शिरोटे व डॉ. एम. व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते.