Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

पथनाटय़ात करिअर
पथनाटय़.. पथ म्हणजे मार्ग, रस्ता. रस्त्यावर कोणत्याही साधनसामुग्रीशिवाय सादर होणारं नाटय़, पथनाटय़ केवळ मनोरंजन करीत नाही, तर जनतेत संदेश पोहोचविण्याचे काम करते. २०-३० तले काही तरुण रंगभूमीच्या या सगळ्यात बेसिक, पण तरीही सगळ्या जिवंत व प्रभावशाली प्रकाराकडे एक करिअर म्हणून पाहातायत. त्यांच्या ग्रुपचे नाव आहे ‘युनस्त’. युनस्तचा अर्थ आहे ‘युवा’. थिएटर आर्टमध्ये मास्टर्स केलेल्या केशव पेडणेकरने त्याच्याच काही मित्रांबरोबर २ जुलै २००० ला ‘युनस्त’ची उभारणी केली.

मल्हार-द मूव्ही
सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या एका गोष्टीची नशा आहे, ती म्हणजे ‘मल्हार २००९’. त्यांच्या या कॉलेज फेस्टची सर्वच आतुरतेने वाट बघत आहेत. मल्हारची तयारी तर एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू झाली होती. अनेक डिपार्टमेंटस्चे ऑर्गनायजर्स, त्यांची कमिटी असे अनेक विद्यार्थी दोन महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. मल्हारची चेअरपर्सन श्रिया पिळगांवकर, व्हाइस चेअरपर्सन इव्हेंटस् सोनाली गुप्ता, व्हाइस चेअरपर्सन श्रुती राघवेंद्रन व व्हाइस चेअरपर्सन कन्वेन्शन्स सोनिया जॉन आनंदाने तासन्तास कॉलेजमध्ये राहून मल्हारची कामे पाहतात.

स्ट्रगलर्स अ‍ॅण्ड अचिव्हर्स
चाँद-तारों को छूने की आशा!

व्यासपीठावर गायनाचा कार्यक्रम सुरू होता. सभागृह श्रोत्यांनी खच्चून भरले होते.. गाणे ऐन रंगात आले असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. आयोजकांना वाटले आता एकच गलका होणार, गोंधळ उडणार, पण असे काहीही झाले नाही. गायिका एका क्षणासाठी विचलित झाली नाही. त्यामुळे श्रोतेही शांतपणे बसूनच राहिले. सभागृहातील काळ्याकुट्ट अंधाराला चिरत कितीतरी वेळ तिचे सूर मैफल सजवीत राहिले. आश्चर्य वाटून घेऊ नका! कारण सभागृहातील वीजपुरवठा खंडित झाला आहे हे तिच्या लक्षातच आले नाही. ती गायिका होती वृषाली विश्वनाथ अमृते.

स्लम शायनिंग
झोपडपट्टी हा सर्वसामान्य आणि उच्चभ्रू शहरी नागरिकांच्या दृष्टीने तसा डोकेदुखीचा विषय. झोपडपट्टी हा शब्द उच्चारताच लोकांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटतात. झोपडपट्टी नको, पण तिथे राहणारी मोलकरीण मात्र कामावर आलेली चालते. झोपडपट्टीविरोधात बोलताना मात्र धारावीविषयी आपण खुमासदार चर्चा करतो. काहीशा अभिमानाने तिचा उल्लेख करतो.

तरुणांचे व्यासपीठ ‘विद्युत’
आजच्या तरुणांना त्यांच्या व्यस्त जीवनातून त्यांच्या इतर काही आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळच मिळत नाही. कारण आजकाल सरकारी नोकरीसारखे ९ ते ६ हा ऑफिस टायमिंग त्यांच्या कामाचा नसतो. परंतु तरीही काही तरुण कामातून वेळ काढून त्यांच्या आवडत्या उपक्रमात सहभागी होतात. त्यापैकी एक म्हणजे अंशुमन सिन्हा. तो एका चांगल्या कंपनीत कामाला असून ‘विद्युत’ या संघटनेत कार्यरत आहे.

दिल से..
प्रिय मिहीर,

हाय! अनिशची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. मध्यंतरी काऊन्सिलिंगलाही जाऊन आला वाटतं. बाकीच्या सगळ्या ९०:१० च्या घोळामुळे एक बरं झालं त्या निमित्ताने अनिश रोजचे पेपर्स नीट मन लावून वाचायला लागलाय! जोक्स अपार्ट, पण हल्ली चाळीत संध्याकाळी हे खेळायला म्हणून जमतात आणि याच विषयावर चर्चा करत बसतात. तावातावाने वाद काय घालतात. आपल्या आपल्या उपाययोजना काय शोधतात, विचारू नकोस! परवा तर मामला फारच गंभीर झाला होता. अनिशच्या ग्रुपमधला ऋषभ