Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अभियंत्यांना केंद्राप्रमाणे वेतन देण्यास मुख्यमंत्र्यांची अनुकूलता
प्रतिनिधी

 

राज्यातील अभियंत्यांचे वेतन हे केंद्रातील वेतनाप्रमाणे करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची सकारात्मक भूमिका असून त्या संदर्भात येत्या आठ दिवसांत सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात येईल आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा महासंघातर्फे आयोजित राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री रामराजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग देण्याचा निर्णय राज्यात कुणी मागणी न करता घेण्यात आला.
केंद्र व राज्यातील अभियंत्यांच्या वेतनातील फरक दूर करण्याकरिता आठ दिवसांत बैठक बोलाविली जाईल. पदोन्नतीबाबत विभागाने निर्णय घ्यावेत. अभियंत्यांनी आपापसातील मतभेद मिटवावेत, असा सल्ला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. पदवीधारक व पदविकाधारक अभियंता हा मोठा वादविषय मिटविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
सेवा महासंघाचे उपाध्यक्ष बी. आर. लुंगे, सचिव एस. आर. चांदपुरे, एस. आर. नालंग यांनी अभियंत्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले.