Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९


सरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘आर्ट अ‍ॅण्ड आर्टिस्टिज्’ व ‘पंचम निषाद’ यांच्या सहयोगाने खास संगीत सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ११ जुलै रोजी पार पडला. या सोहळ्यात डॉ. एल. सुब्रमणियम (व्हायोलिन), उस्ताद रशीद खान (हिंदुस्तानी शास्त्रीय गायन), अनुप जलोटा (भजन), पं. नयन घोष (सतार), मुनाव्वर मासूम (कव्वाली), राकेश चौरसिया (बासरी), नीलाद्री कुमार (सतार), देवकी पंडित (हिंदुस्तानी शास्त्रीय गायन), सावनी शेंडे (भजन), जयतीर्थ मेवूंदी (हिंदुस्तूानी शास्त्रीय गायन), शशांक (बासरी), शौनक अभिषेकी (हिंदुस्तानी शास्त्रीय गायन), कविता सेठ (सुफी), रितेश व रजनीश मिश्रा (हिंदुस्तानी शास्त्रीय गायन), जसविंदर सिंग (गझल), अम्बी सुब्रमणियम (व्हायोलिन) आणि पं. रोणू मुझुमदार (बासरी) या दिग्गजांनी बहारदार मेजवानी रसिकांसमोर सादर केली. या सोहळ्यातील ही काही क्षणचित्रे..

‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’चा विक्रीकर विभागातील ई-गव्हर्नन्स
महालेखापालांच्या प्रश्नावलीला वाटाण्याच्या अक्षता

निशांत सरवणकर

कोटय़वधी रुपयांच्या ‘सत्यम कॉम्प्युटर’ घोटाळ्यातील ‘प्राईस वॉटरहाऊस कूपर’ या कंपनीवर राज्याच्या ई-गव्हर्नन्सची जबाबदारी सोपविण्याआधी या कंपनीच्या विक्रीकर खात्यातील ई-गव्हर्नन्सचा अनुभन शासनाने घ्यायला हवा होता, असे मत विक्रीकर विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.

सेव्ह राणी बाग
भाग-५
पुन्हा बदलावा लागणार आराखडा?

प्रसाद रावकर/रेश्मा जठार

‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालया’च्या आधुनिकीकरणाच्या प्रस्तावाला ‘मुंबई हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटी’ने मंजुरी दिली आहे. मात्र, ही मंजुरीदेखील ‘अटी सापेक्ष’ असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आधुनिकीकरण आराखडय़ात पुन्हा एकदा फेरबदल करावे लागणार अशी चिन्हे आहेत.

प्रबोधनकार आणि घटनाकार यांचे नातू एकत्र येणार !
बंधुराज लोणे

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्रबोधनकार ठाकरे आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यामुळेच प्रबोधनकारांचे नातू व शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे आणि डॉ. बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येऊ शकतात, असे तर्कशास्त्र भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते सध्या जाहीरपणे मांडत आहेत.

कॉर्पोरेट टॅक्सीवाल्या..
नमिता देशपांडे

रशीदा शेख, नाझनिन शेख, सुप्रिया गायकर, आरती वाघ, पूर्वा पवार या सगळ्याजणी सध्या खूप उत्साहात आहेत. आपल्या आयुष्याला काहीतरी दिशा मिळाल्याचा आनंद त्यांना आहे. कारण.. लवकरच या सगळ्याजणी टॅक्सीचालक म्हणून मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार राहणार आहेत. या सगळ्याजणींचे प्रशिक्षण नुकतेच संपले आहे. ग्राहकांशी कसे बोलायचे, मुंबईतल्या रस्त्यांची माहिती, तांत्रिक बाबींसंबंधीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. या सगळ्यांबरोबरच कराटेचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले आहे. बारा तासांची नोकरी करण्यासाठी मानसिक तयारीही त्यांनी केली आहे.

‘मुंबईतील गुन्हेगारीचा एनसायक्लोपीडिया’चे बुधवारी प्रकाशन
प्रतिनिधी

पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एनसायक्लोपीडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (१५ जुलै) करण्यात येणार आहे. आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये सायंकाळी चार वाजता हा प्रकाशन सोहळा होमार आहे.
‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत, पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अ‍ॅण्टी करप्शनचे सहपोलीस आयुक्त विजय कांबळे, मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राकेश मारीया, कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे मुंबईचे सहपोलीस आयुक्त के. एल. प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.