Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘गणगोत’ भूमिकांचे
चतुरस्र अभिनयाने मराठी रंगभूमी तसेच हिंदूी व मराठी चित्रपटसृष्टीवर स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या निळू फुले यांनी आपल्या पन्नास-साठ वर्षांच्या कला प्रवासात अनेक लोकनाटय़े, नाटके व शेकडो चित्रपटांतून अभिनय करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या स्मरणात असलेली काही प्रमुख नाटके, लोकनाटय़े व चित्रपट पुढीलप्रमाणे-
नाटके- सूर्यास्त, सखाराम बाइंडर, जंगली कबूतर, रण दोघांचे, बेबी.
लोकनाटय़- पुढारी पाहिजे, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथा अकलेच्या काद्यांची, बिन बियाचे झाड, लवंगी मिरची कोल्हापूरची, राजकारण गेलं चुलीत, मी लाडाची मैना तुमची.
मराठी चित्रपट- एक गाव बारा भानगडी, सामना, िपजरा, सिंहासन, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापाडय़ा, गणानं घुंगरू हलवलं, बन्या बापू, जैत रे जैत, दीड शहाणे, कुंकू, नाव मोठं लक्षण खोटं, सोनाराने टोचले कान, सातच्या आत घरात, लक्ष्मी, जिद्द, पैजेचा विडा, भालू, फटाकडी, आयत्या बिळावर नागोबा, पैज, भिंगरी, सवत, आई, आई उदे गं अंबाबाई, लाखात अशी देखणी, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद, चोरीचा मामला, सहकारसम्राट, सासुरवाशीण, नणंद भावजय, अजब तुझे सरकार, शापित, भुजंग, वरात, पदराच्या सावलीत, भन्नाट भानू, चटक चांदणी, गल्ली ते दिल्ली, बायको असावी अशी, राघु मैना, राणीने डाव जिंकला, जगावेगळी प्रेमकहाणी, दिसतं तसं नसतं, एक होता विदूषक, मालमसाला, एक रात्र मंतरलेली, जन्मठेप, सेनानी साने गुरुजी.
हिंदी चित्रपट- कुली, सारांश, मशाल, जुगलबंदी, जरासीजिंदगी, गुमनाम है कोई, रामनगरी, नागिन (२) भयानक, घर बाजार, औरत तेरी कहानी, मोहरे, कब्जा, हिरासत, जागो हुआ सवेरा, सूत्रधार, इन्साफ की आवाज, काँच की दीवार, सौं दिन साँस के, दो लडके दोनो कडके, मेरी बिबी की शादी, वो सात दिन, नरम गरम.