Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

वनौषधींचा प्रसारक
नाशिक जिल्ह्य़ातल्या पेठ तालुक्यातील वनौषधींचे जाणकार गंगाराम जानू आवारी (आवारी गुरूजी)यांची पुण्यतिथी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध..
दुर्गम आदिवासी भाग पायाखाली तुडवताना माळरानावर फुललेल्या झाडा-फुलांपासून वनौषधी तयार करण्याच्या विद्येत पारंगत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे गंगाराम जानू आवारी ऊर्फ आवारी गुरूजी. नाशिक जवळील पेठ तालुक्यातले रहिवासी असलेले आवारी गुरूजी मुळातच अभ्यासू वृत्तीचे. १९३६ साली सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९४२ पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली.

पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक
मनमाडला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा, पुणे शहरात ४० टक्के पाणी कपात, कोयना परिसरात पाऊस नसल्यामुळे २२ जुलै पासून महाराष्ट्र अंधारात जाण्याचे संकेत, तानसा-वैतरणा पाणलोट क्षेत्रात पाऊस नाही, मुंबई पाणी कपात, खामगाव-भुसावळचे तपमान ४९ अंश सेल्िंसयसपर्यंत, जगात एक अब्ज लोक उपासमारीने त्रस्त अशा सर्व बातम्या वाचल्या म्हणजे भविष्यातील भीषण परिस्थितीचे चित्र डोळ्यासमोर येते.

गॅस सिलिंडरचा अनियमित पुरवठा; आ. कदमबांडेंची अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
धुळे, १३ जुलै / वार्ताहर

शहरातील विविध भागात गॅस सििलडरसाठी लागणाऱ्या ग्राहकांच्या रांगाची लांबी कमी का होत नाही, असा सवाल करीत आ. राजवर्धन कदमबांडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सििलडरसाठी नोंदणी केल्यानंतर ४८ तासाच्या आत घरपोच सििलडर का पोहोचत नाही, याचे उत्तर द्या, असे सुनावताच निर्धारित वेळेत सिलींडर पोहोचविण्याची हमी अधिकाऱ्यांना द्यावी लागली.

धुळे येथे भिल्ल संघटनेचा मोर्चा
धुळे, १३ जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ासाठी आदिवासी विकास प्रकल्प व शबरी विकास महामंडळ ही दोन्हीही कार्यालये स्वतंत्रपणे निर्माण करावी, यासह इतर अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भिल्ल समाज संघटनेतर्फे सोमवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.