Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

ई- गव्हई- गव्हर्नन्स
नीरज पंडित
र्नन्स, प्रमाणीकरण आणि वाद
ई-गव्हर्नन्सचे प्रमाणीकरण व्हावे यासाठी शासनाचे सर्व स्तरांवर गेली अनेक वष्रे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रमाणीकरण काही विदेशी कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी होत असल्याची आयटी वर्तुळात चर्चा आहे. शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पात कोणतेही हितसंबंध जपणे योग्य ठरणार नाही, याची जाणीव शासनाला होणे गरजेचे आहे. या संदर्भात येत्या बुधवारी म्हणजे १५ जुलै रोजी अ‍ॅपेक्स बोर्डाची बैठक होणार आहे. आयटी क्षेत्राचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

सांस्कृतिक कट्टा
डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार
डोंबिवली नगरी ही साहित्य-सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हे डोंबिवलीकर आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दररोज जीवघेण्या गर्दीतून अप-डाऊन प्रवास करूनही समस्त डोंबिवलीकर आपली ऊर्जा, उत्साह आणि सळसळतेपण नेहमीच कायम ठेवतात. अशा या डोंबिवली नगरीत आठवडय़ाच्या शेवटी तर विविध साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीच असते.

घडामोडी
नगर
विखे विरुद्ध सारे!

जिल्ह्य़ाला आता विधानसभेचे वेध लागले आहेत. एरवी निवडणुकीचे पडघम वाजू लागले की पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणीला वेग येई. आताही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मात्र, त्याची दिशा भरकटली आहे. राष्ट्रवादी विरुद्ध विखे पिता-पुत्र, इंदिरा काँग्रेसअंतर्गत थोरात विरुद्ध विखे आणि आता पालकमंत्री वळसे विरुद्ध विखे असा संघर्ष जिल्ह्य़ात ऐरणीवर आला आहे. विखे विरुद्ध सारे अशीच पारंपरिक नेपथ्यरचना राजकीय रंगमंचावर साकारते आहे.