Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘बार काऊन्सिल’ निरीक्षण समितीची शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालयास भेट
चंद्रपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या निरीक्षण समितीचे सदस्य अॅड. देवेंद्र कुमार शर्मा, अॅड. हेमंत कुमार पटेल व अॅड. फैजल रिझवी या चमुने शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालयाचे संलग्नीकरण विस्तारित करण्यासाठी भेट दिली. या भेटी दरम्यान महाविद्यालयातील सर्व कागदपत्रे, साधन संपत्ती व शैक्षणिक सुविधांचे निरीक्षण केल्यानंतर विधि महाविद्यालयाच्या दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
या निरीक्षणादरम्यान आयोजित सभेच्या बीसीआयचे विश्वस्त सहयोगी व्यवस्थापक अॅड. डी.के. शर्मा यांनी शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालय हे मध्यवर्ती भारतातील नवीन सुरू होऊ घातलेल्या विधि महाविद्यालयासाठी आदर्श उदाहरण आहे, असे मत व्यक्त केले. कायदेविषयक ज्ञानाच्या क्षेत्रात विधि महाविद्यालयाचे योगदान भरीव असून कायदेविषयक शिक्षणाचा दर्जा उत्तरोत्तर वाढविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असे अॅड. शर्मा यांनी सांगितले. अॅड. हेमंत पटेल यांनी विधि महाविद्यालयाद्वारा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक साधनांच्या उपलब्धतेबाबत समाधान व्यक्त केले. अॅड. फैजल यांनी या महाविद्यालयाला पूर्वीच्या भेटीतील आठवणींना उजाळा देताना हे महाविद्यालय कायदेविषयक ज्ञानाचे प्रसार व प्रचार करणारे या क्षेत्रातील एक वटवृक्षासारखे वाढणारे आहे, असा अनुभव व्यक्त केला. या महाविद्यालयाच्या विकासामध्ये संस्था, प्रश्नचार्य व सर्व सहकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रश्नचार्य डॉ. अंजली हस्तक यांनी या निरीक्षण समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले व विधि महाविद्यालयाद्वारा शैक्षणिक, संशोधन, कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गोषवारा दिला. सवरेदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मामीडवार व पी.एच. धनकर, सचिव के.यू. निंबाळकर, सहसचिव प्रशांत पोटदुखे, माणिकगड सिमेंट फॅक्टरीचे व्यवस्थापक मंडेलिया, यावेळी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष रमेश मामीडवार यांनी निरीक्षण समितीला आश्वासन दिले की, या महाविद्यालयाच्या विकासात्मक धोरणे आखणीमध्ये संस्था सदैव सहकार्य देत आलेली आहे व यापुढेही देत राहील. अॅड. प्रशांत खजांची यांनी विधि महाविद्यालयाच्या दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीबद्दल अभिमान व्यक्त केला.
डॉ. ए.पी. पिल्लई, यशवंत कुलकर्णी, अॅड. मुकुंद, उपप्रश्नचार्य डॉ. उमा चॅटर्जी व प्रश्न. ए.यू. शेख, अॅड. बजाज, अॅड. फरहाद बेग, अॅड. बोरीकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रश्न. पंकज काकडे यांनी केले तर आभार डॉ. बेन्नी, एम.जे. यांनी मानले.