Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रोगांचा प्रश्नदुर्भाव रोखण्यासाठी गोठे स्वच्छता मोहीम
गडचिरोली, १३ जुलै / वार्ताहर

 

ताप आणि इतर रोगांची लागण होऊ नये तसेच रोगाचा प्रश्नदुर्भाव होऊ नये, म्हणून शहरी व ग्रामीण भागातील गोठे स्वच्छ करून घेण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘जॅपनीज एनसेफसायटिस’ (मेंदूज्वर) लसीकरण मोहिमेच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक गावात गोठय़ाला लागून शेणाचे ढिगारे असतात. त्यामुळे माशांचा प्रश्नदुर्भाव वाढतो. त्यासाठी दूरवर शेणाचे खड्डे बनवून त्यात शेण टाकण्यासाठी जनतेला प्रश्नेत्साहित करावे, मच्छर मारण्यासाठी रॉकेट्स पुरवण्यात यावे, सामूहिक पद्धतीने शेण ठेवण्याची सुविधा निर्माण करता येते का ते पहावे, गोठे साफ करताना ‘बीएससी’ पावडरचा छिडकाव करण्यात यावा, जिल्ह्य़ात रोगराई होऊ नये, यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांना ग्रामीण भागात मच्छर मारण्यासाठी ‘रॉकेट’ वितरित करण्यास प्रश्नेत्साहित करावे, असेही ते म्हणाले.
गोठे स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्ह्य़ात १ हजार २१५ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ते, शिक्षक, आशा, पाडा वर्कर्स, स्वयंसेवक यांचा सहभाग असून एकूण ४ हजार ५६२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मून, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोटे, डॉ. मडावी, संवर्ग विकास अधिकारी व बालविकास अधिकारी उपस्थित होते.