Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तालुका अपघात निधी योजना विद्यार्थ्यांसाठी संजीवनी
ब्रह्मपुरी, १३ जुलै / वार्ताहर

 

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘तालुका अपघात निधी’ ही योजना राबवण्यात येते. ही योजना विद्यार्थ्यांना हितकारक असून संजीवनी ठरली आहे, असे मत पंचायत समितीचे संवर्ग विकासाधिकारी लहूकुमार रामटेके यांनी व्यक्त केले.
वायगाव (चोरटी) जिल्हा परिषद केंद्रिय उत्तर प्रश्नथमिक शाळेत एका विद्यार्थ्यांच्या पालकाला २ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुधाकर कोल्हे हे होते.
याप्रसंगी बोलताना रामटेके म्हणाले की, तालुक्यातील जिल्हा परिषद प्रश्नथमिक शाळांमधील १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रत्येकी ५ रुपये अपघात निधी घेऊन पंचायत समितीच्या संयुक्त खात्यात जमा केली जाते. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सायकलने, झाडावरून पडून अथवा कोणत्याही वाहनाने अपघात झाल्यास जखमींवरील उपचारासाठी २ हजार रुपयांची आíथक मदत दिली जाते. सर्पदंशाने अथवा वीज पडून मृत्यू झाल्यास ५ हजार रुपयांची मदत दिल्या जाते. त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांच्यादृष्टीने संजीवनी होय. या योजनेनुसार वायगाव (चोरटी) येथील विद्यार्थी समीर प्रकाश मेश्राम यांच्या पालकास संवर्ग विकासाधिकाऱ्यांच्या हस्ते २ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, शिक्षण विस्ताराधिकारी प्रदीप उपलेंचवार, अनमूलवार बुरांडे, मुख्याध्यापिका छाया रणदिवे उपस्थित होते.