Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात साडे सहा कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी
चंद्रपूर, १३ जुलै/प्रतिनिधी

 

चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात ६ कोटी २९ लाख ९० हजार रुपये किमतीच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सन २००९-१० च्या अर्थसंकल्पात या मंजूर कामांसाठी एक कोटी ३८ लाख १२ हजार रुपये निधी खेचून आणण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यश प्रश्नप्त केले आहे.
सन २००९-१० च्या अर्थसंकल्पात प्रश्नमुख्याने चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस बायपास रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी रुपये किमतीच्या कामासाठी २४.५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात मुनगंटीवार यांना यश प्रश्नप्त झाले आहे. पडोली, दाताळा, देवाडा, हिंगनाळा या रस्त्यावरील दाताळा गावातील सुटलेल्या लांबीचे काँक्रिट नालीसह बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये किमतीच्या कामासाठी १२.२६ लाख रुपये, बल्लारपूर, आलापल्ली, सिरोंचा रस्त्याची उंची वाढवण्याच्या ७५ लाख रुपये किमतीच्या कामासाठी १८.३९ लाख रुपये, बल्लारपूर, आलापल्ली सिमेंट रस्त्याची सुधारणा करण्याच्या ७५ लाख रुपये किमतीच्या कामांसाठी १८.३९ लाख रुपये, पडोली, छोटा नागपूर, भटाळी पद्मापूर रस्त्यावरील एकपदरी पुलाच्या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याच्या ३० लाख रुपये किमतीच्या कामासाठी ४.५१ लाख रुपये, ताडाळी, येरूर, सोनेगाव, उसेगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठीच्या ३० लाख रुपये किमतीच्या कामासाठी ४.५१ लाख रुपये, गडचांदूर, भोयेगाव, धानोरा, महाकुर्ला रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठीच्या १९ लाख रुपये किमतीच्या कामासाठी २.२९ लाख रुपये, बल्लारपूर वळण मार्गावर मोठय़ा पुलाचे बांधकाम करण्यासाठीच्या २ कोटी रुपये कि मतीच्या कामासाठी ३० लाख रुपये, गडचांदूर, भोयगाव, धानोरा, महाकुर्ला रस्त्याची सुधारणा करण्यासाठीच्या ७० लाख रुपये किमतीच्या कामासाठी १०.५२ लाख रुपये, बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी, इटोली, गिलबिली मार्गावरील हत्तीगोटा नाल्यावर उंच पुलाच्या बांधकामासाठीच्या ८० लाख रुपये किमतीच्या कामासाठी १२.०२ लाख रुपये निधीस मुनगंटीवार यांनी मंजुरी मिळवली.
रस्त्यांच्या कामांबाबतची चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची प्रलंबित मागणी होती. रस्त्याच्या व पुलांच्या कामांना मंजुरी मिळाल्यामुळे व त्यासाठी आर्थिक तरतूद झाल्यामुळे या परिसराच्या विकासात मोलाची भर घातली आहे. रस्त्यांच्या व पुलांच्या कामासाठी निधी खेचून आणल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती देवराव भोंगळे, उपसभापती विजय बल्की, बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती राजू बुद्धलवार, उपसभापती विलास बोबडे, नामदेव डाहुले, किशोर पंदिलवार, शालिक पेंदराम, अंजली पंदिलवार, हंसराज रायपुरे, विलास टेंभुर्णे, ब्रिजभूषण पाझारे, कविता आमटे, सुरेखा थोरात, लोकचंद कापगते, रंजना थेरे आदींनी अभिनंदन केले आहे.