Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
चंद्रपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

 

रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा शपथ विधी नुकताच येथील एका सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रश्नंतपाल प्रफुल्ल मुक्कदम उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांना मावळते अध्यक्ष प्रशांत खजांजी यांनी सूत्रे सोपवली. या कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार हंसराज अहीर, अशोक मुखी उपस्थित होते. प्रशांत खजांची यांनी संपूर्ण वर्षाचा अहवाल सादर केला. विद्या बांगडे यांनी सचिवाचा अहवाल प्रस्तुत केला. खासदार अहीर यांनी रोटरी क्लबतर्फे केलेल्या समाजपयोगी कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
डॉ. प्रफुल्ल मुक्कदम यांनी रोटरीचे कार्य यावर प्रकाश टाकला. यावेळेस दहा नवीन रोटरी सदस्य यांना पुरस्कृत करण्यात आले. मावळत्या इनरव्हिल अध्यक्ष अर्जना बुक्कावार यांनी नवीन अध्यक्ष आशा सुरी यांना पदभार सोपविला. तर ‘रोट्रॅक्ट’ अध्यक्ष अभिषेक बागला यांनी केयूर गांधी यांना पदभार सोपविला. अशोक मुखी यांनी प्रश्नंतपालाचा संदेश वाचून दाखविला. या कार्यक्रमासाठी ‘आयएमए अध्यक्ष गोपाल मुंधडा, ‘एमईएल’चे डायरेक्टर पाल, संदीप अडवानी उपस्थित होते. आभार नवनियुक्त सचिव राम चांदे यांनी मानले. संचालन अजय पालारपवार व डॉ. शर्मिली पोद्दार यांनी केले. कार्यक्रमास यशवंत कुलकर्णी, रमेश मामीडवार, जितेंद्र दोशी, अ‍ॅड. विनायक बापट, मंगेश गोरंटीवार, रवींद्र जैन, महेश उचके आदी उपस्थित होते.