Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पवनी नगरपालिकेला ‘युवाशक्ती’चा इशारा
भंडारा, १३ जुलै / वार्ताहर

 

पवनीत गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेवाळयुक्त हिरवट पाणी पुरवठय़ाच्या विरोधात शहरातील ‘युवाशक्ती’ संघटनेद्वारा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेवाळयुक्त पाण्यामुळे गॅस्ट्रो व इतर रोग होत आहे. मात्र, नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युवाशक्ती संघटनेने केला आहे.
वैनगंगा नदीला नाग नदीचे जंत, रासायनिक पदार्थ युक्त पाणी सोडले जाते. हे पाणी गोसे धरणामुळे अडवून ठेवलेले आहे.
त्यातच पवनी मधील फिल्टर प्लॅन्ट वाढत्या लोकसंख्येला शुद्ध पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
त्यामुळे पवनी नगरातील जनतेला मागील चार-पाच वर्षापासून शेवाळयुक्त रासायनिक पदार्थयुक्त, हिरवट जंतयुक्त पाणी नाईलाजाने प्यावे लागते. परिणामत: बेलगाटा, धोडेगाट, शनिवारी, बजरंग व मंगळवारी वॉर्डात अनेक लोकांना गॅस्ट्रोची लागण झालेली आहे.
पाण्याच्या समस्येवर नगरपालिकेने सात दिवसांच्या आत योग्य ती उपाययोजना करून गावातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा युवाशक्ती संघटना पालिका कार्यालयाला कुलूप ठोकेल, असा इशारा युवाशक्तीचे अध्यक्ष देवराज बावनकर यांनी दिला आहे.