Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
डॉक्टरांनी नुसती कॅन्सरची शक्यता वर्तवली की गर्भगळित व्हायला होतं. मग कॅन्सर आहे किंवा नाही हे नक्की समजेस्तोवर जो काळ लागतो तो अक्षरश: जीवघेणा असतो. शिवाय तपासण्यांमध्ये जो मानसिक-शारीरिक त्रास होतो तो आणखीनच वेगळा. उद्या काय? या विचारानंच तहान-भूक-झोप हरपते. टेन्शन तर असणारच आहे पण त्यातल्या त्यात निदान तपासण्याचा जो त्रास होतो तो तरी वाचावा आणि अचूक निदान व्हावं या हेतूने सिमेन्स हेल्थकेअर घेऊन येत आहे ‘ब्रेस्ट इलॅस्टिसिटी’, ब्रेस्ट कॅन्सरचे अचूक आणि त्वरित निदान करण्यासाठीची टेक्नॉलॉजी. या विषयी बोलताना बिझनेस हेड नीता म्हात्रे म्हणतात, ‘ब्रेस्ट कॅन्सर हा रोग जरी थरकाप उडवणारा असला तरी तो जीवघेणा असतोच असं नाही. जर वेळेत अचूक निदान झालं आणि त्वरेने उपाययोजना झाल्यास

 

यात जीवाला काही धोका नसतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते योग्य वेळेत आणि अचूक निदान होणं. कित्येकदा बायोप्सीमध्ये निदान चुकू शकतं. पण हे अल्ट्रा साऊंड मशीनच जर चुकीचं वापरलं तरच निदान चुकेल अन्यथा यात चूक होणं शक्य नाही.’
बायोमेडिकल इंजिनीअर आणि एम.बी.ए. असणाऱ्या नीता म्हात्रे यांना जेव्हा सिमेन्सने या मशीनच्या मार्केटिंगची जबाबदारी दिली तेव्हा त्या क्षणाचाही विचार न करता कॅलिफोर्निया येथील आपलं उत्तम करियर सोडून भारतात आल्या आणि साऊथ आशिया विभागाच्या बिझनेस हेड म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्या म्हणतात, ‘मला आरोग्याशी संबंधित काम करायला आवडतं पण डॉक्टर व्हायचं नव्हतं म्हणून तर मी बायोमेडिकल इंजिनीअरिंग करण्याचं ठरवलं. जेव्हा ही संधी आली तेव्हा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. ही टेक्नॉलॉजी वापरायला अगदी सोपी आहे. अल्ट्रासाऊंड रेज्च्या मदतीने डॉक्टरांना टिश्युज्ची स्थिती पटकन समजू शकते त्यामुळे रिझल्टस् अचूक आणि लवकर मिळतात. आपल्याला नक्की ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा नाही हे अगदी चटकन आणि अजिबात त्रास न होता समजू शकतं. हे स्त्रियांसाठी वरदानच आहे.’
यामागची टेक्नॉलॉजी काय आहे किंवा ही टेक्नॉलॉजी कसं काम करते हे डॉक्टरांना विस्ताराने सांगितल्यावर डॉक्टरांकडून या टेक्नॉलॉजीला उत्तम प्रतिसाद मिळतो सांगताना नीता म्हात्रे पुढे म्हणतात, ‘मला स्त्रियांना सांगावंसं वाटतं की तुमच्या दुर्दैवानं जर तुमच्यावर अशी तपासणी करून घेण्याची वेळ आली तर डॉक्टरांना तुमची तपासणी करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरण्याचा आग्रह धरा. ज्यायोगे तुमचा शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव वाचेल.’
मनीषा सोमण
maneesha24april@rediffmail.com