Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा

आपल्याला यश हवं असतं. या यशाकडे जाण्याच्या मार्गात बऱ्याचदा आपण स्वत:च अडथळे निर्माण करतो.. आपण आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारायला हवी आणि आपल्या चुकांवर, कमतरतेवर पांघरूण टाकू नये, कधीही सबबी सांगू नयेत..
बऱ्याच वर्षांपूर्वी मी लोणावळ्याच्या फरियास रिसॉर्ट इथे हॉटेल मॅनेजमेंटला होतो. त्या क्षेत्रात नवीन असल्याने मला त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. काही वेळेला माझ्यावर अशी कामं लादली जायची की, जी मी पूर्ण करू शकतच नव्हतो. मग मी शेफ राकेश यांच्याकडे जायचो. ते खूप समजून घेणारे आणि समजावणारे होते. मग ते स्वत: माझं

 

काम करून द्यायचे पण मध्येच ते संपावर गेले.
आता मी कार्यकारी शेफ थॉमस यांना रिपोर्ट करायला लागलो. ते खूपच कार्यक्षम आणि हुशार होते पण त्यांना राग पटकन यायचा आणि ते फार कमी बोलायचे. बरेच वरिष्ठ शेफ संपावर गेल्याने शेफ थॉमस मला जास्त कठीण काम द्यायचे आणि ती कामं मी साहजिकच पूर्ण करू शकत नव्हतो. मग मी त्यांच्याकडे जायचो. ‘मी ते काम का करू शकलो नाही, ते माझ्यासाठी कसं अशक्य होतं’ वगैरे वगैरे सगळी कारणं सविस्तरपणे सांगायचो. ते त्यावर करडय़ा आवाजात म्हणायचे, ‘मला कारणं सांगू नकोस, मला रिझल्ट हवाय.’ मी एखादं काम का करू शकलो नाही हे त्यांनी कधीच ऐकून घेतलं नाही. ‘झालं’ किंवा ‘नाही झालं’ यापैकीच सांगायचं होतं- कसलेही समर्थन न देता मला खूप वैताग आलेला. एक शिकावू इतक्या उच्च दर्जाचं काम कसं पूर्ण करू शकेल? आणि तेसुद्धा कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय. स्पष्टपणे सांगायचं तर एकूणच परिस्थिती कठीण होऊन बसलेली. मी आधी ‘हे मला जमत नाही,’ असं म्हणून हात झटकून मोकळा व्हायचो. फारच आळस आला असेल तर जमतंय की नाही हे बघण्याचे पण कष्ट घ्यायचो नाही. एखादी छानशी आणि पटेल अशी सबब शोधून काढायचो पण आता शेफ थॉमस यांचं ‘झालं’ की ‘नाही झालं..’ आली का पंचाईत!
त्यांच्या या वागणुकीचे विचित्र परिणाम दिसायला लागले. मला देण्यात आलेल्या कामांकडे मी एक आव्हान म्हणून बघायला लागलो. मी ठरवलं, कोणतंही काम असू दे. पूर्ण करायचंच. मी माझ्या सहकाऱ्यांची मदत घ्यायचो, वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयत्न करायचो. उशिरापर्यंत काम चालू असायचं, कष्ट घ्यायचो पण कसंही करून ते काम पूर्ण करायचो आणि मग शेफ थॉमस यांना ‘झालं’ हे उत्तर द्यायला फार बरं वाटायचं. शाबासकी म्हणून ते मला अजून जास्त आव्हानात्मक काम द्यायचे.
क्वचित कधी तरी मी ‘नाही झालं,’ असा रिपोर्ट द्यायचो तेव्हा त्यांच्या कुत्सितपणे हसण्याचा मला राग यायचा. मग पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करायचो. मला कळलं की, त्यांच्याबरोबर काम करून एक महिन्यात माझ्यात खूपच सुधारणा झालेली. मी जास्त वेगाने शिकत होतो आणि मला काहीतरी साध्य केल्यासारखं वाटत होतं.
‘फरियास’मधून बाहेर पडून वषर्ं लोटली पण अजूनही मी ‘झालं’ की ‘नाही झालं’ हा नियम पाळतोय- कोणतीही सबब देत नाही. माझी काम करण्याची क्षमता वाढली हे माझ्या लक्षात आलं, अशी कारणं आपल्याला कमजोर बनवतात आणि ती कारणं योग्य असतील तर आपण अजूनच कमजोर होतो. मी सेल्स आणि मार्केटिंगवर एक पुस्तक वाचलेलं. `how to become a rainmaker' त्याचे लेखक जेफ्री फॉक्स एक किस्सा सांगतात. अमेरिकेतल्या देशात सेल्स टार्गेट संपादन करण्याची स्पर्धा लागलेली. ती स्पर्धा संपण्याच्या तीन आठवडे आधी कॅलिफोर्नियात भूकंप झाला. तिकडच्या ऑफिसचं फारच नुकसान झालं. कॅलिफोर्निया टीमला ते टार्गेट मिळवता आलं नाही पण बाकीच्या टीम्सनी मॅनेजरला विनंती केली की, बक्षीस कॅलिफोर्निया टीमला द्यावं कारण त्यांच्याकडे ‘योग्य कारण’ होतं. तो मॅनेजर तुसडेपणाने म्हणाला, ‘भूकंप गृहीत धरले जात नाहीत.’ सगळ्यांना त्याचा राग आला पण पुढच्या वर्षी शिकागोमध्ये वादळ आलं. मिसिसिपीला पूर आला. वॉशिंग्टनमध्ये राजकीय तंटे चालू होते आणि न्यूयॉर्कच्या ऑफिसला आग लागली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या टीम्सने त्यांची टार्गेट्स संपादन केलेली.
‘कोणतीही सबब सांगू नका’ ही वागणूक खरंच फलदायी ठरते. तुम्हीसुद्धा प्रयत्न करून पाहा. तुमच्याकडे जेव्हा काम असेल तेव्हा ठरवा की, तुम्ही कोणतीही सबब दुसऱ्यांना आणि खास करून स्वत:ला देणार नाही. तुम्ही व्यायाम केला का? तुम्हाला नोकरी मिळाली का? इंटरव्ह्यूमध्ये पास झालात का? तुम्हाला मार्क्स मिळाले का? तुम्ही घर स्वच्छ केलंत का? ‘केलं’ किंवा नाही केलं एवढंच उत्तर द्या. उत्तराचं समर्थन करू नका.
तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घर चालवत असाल, सबबी स्वीकारूच नका. ते काम ‘झालं’ की ‘नाही झालं’ यात बघा तुमची टीम, घरातली माणसं आणि बाकीच्यांच्या वागणुकीत तुम्हाला लक्षात येण्याजोगे बदल दिसतील ते त्यांचं अपयश स्वीकारून त्याची जबाबदारी घेतील. त्या बाबतीत ते नेहमी प्रामाणिक राहतील यामुळे तुमच्या कामाचे संबंध, कुटुंबातले बंध आणि तुमचं स्वत:चं समाधान नक्कीच वाढेल.
स्वत:चं समर्थन करू नका, दुसऱ्यांना दोष देऊ नका. तुमच्या ज्ञानात, हुशारीत कमतरता असल्यास अभ्यास करा, सराव करा. सबबी शोधू नका- ‘सध्या रिसेशन चालू आहे’, ‘माझे वपर्यंत कोणाशी संबंध नाहीत!’ ‘मी लाच देऊ शकत नाही..’ जबाबदारी स्वीकारा आणि त्यातून मिळणाऱ्या रिझल्टकडे लक्ष द्या- ‘मान्य’ की ‘अमान्य?’ तुम्हीच ठरवा!
अनुवाद : यशोदा लाटकर
डॉमिनिक कोस्टाबीर

dominiccostabir@yahoo.com