Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

दिशा
स्लिम इन्स्टंट

या नव्या फिल्डमध्ये करिअरच्या संधी आहेत का हे विचारले असता त्या म्हणाल्या, कोणतेही काम करताना प्रथम त्यासाठी पुष्कळ मेहनत घेण्याची तयारी हवी व त्या कामाबद्दल पॅशन हवं तरच आपण यशोशिखर गाठू शकू
आपण सुंदर दिसावे, सुडौल शरीरयष्टी असावी, असे आपल्याला नेहमीच वाटत असते; परंतु आजच्या धावपळीच्या वेळापत्रकात ते कुठेही बसत नाही. त्याचा परिणाम दिसून येतो तो आपल्या शरीरावर. वजन वाढणे, सुजलेला चेहरा, वयानुसार चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, पुटकुळ्या, डाग, स्ट्रेचमार्क अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे

 

लागते. डॉ. मंजिरी पाटणकर यांनी स्वप्नवत वाटणारे तारुण्य आणि सौंदर्य ‘स्लिम इन्स्टंट’ या क्लिनिकद्वारे अल्ट्रासाऊंड लायपोलिसीस हे अत्याधुनिक फ्रेंच तंत्रज्ञान भारतात प्रथमच आणले.
डॉ. मंजिरी पाटणकर या ओबेसिटी कन्स्लटन्ट आणि कॉस्मेटिक फिजिशियन आहेत. या प्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणतात की, अल्ट्रासोनिक लायपोलिसीस ही एक शस्त्रक्रियाविरहित पद्धत फ्रेंच, पोलंड अशा बाहेरच्या देशांत प्रचलित आहे. या प्रक्रियेत शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा, टाके, वेदना, शस्त्रक्रिया होत नाही व एका तासात शरीराच्या कुठल्याही भागातील चरबी कायमस्वरूपी कमी केली जाते.
बऱ्याच जणांचा असाही समज आहे की, आम्ही दुभंगलेला ओठ किंवा शस्त्रक्रियेमुळे बिघडलेला चेहरा व्यवस्थित करून देतो. कारण अल्ट्रासोनिक लायपोलिसीस या प्रक्रियेची माहिती अजून आपल्याकडे फारच थोडय़ा लोकांना माहीत आहे.
कोणत्या वयोगटातील महिला तुमच्या क्लिनिकमध्ये येतात, असे विचारले असता त्या चटकन म्हणाल्या की, ज्यांना मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे आहे, अशा कॉलेज गर्ल्स येतात. तसेच तिशीनंतर स्त्रियांमध्ये वजन वाढणे, हायपर पिगमेंटेशन, पोट सुटणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे या समस्या असतात म्हणून तिशीनंतरच्या महिलांचे प्रमाणही जास्त आहे. हेच नव्हे तर आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पुरुषांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. आजपर्यंत ५००० हून अधिक केसेस आम्ही यशस्वीपणे हाताळल्या. हे सांगत असतानाच त्या यशात आपल्या सहकाऱ्यांना सहभागी करून घेतात.
या सर्वच सेशनमध्ये तुम्ही ५ ते १० वर्षे तरुण दिसता हे त्या तितक्याच आत्मविश्वासाने सांगत होत्या.
डॉ. मंजिरी पाटणकर यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये असलेले ‘इन्टेसिटी फोकलाइज्ड अल्ट्रासाऊंड, मेसोथेरपी, अॅलरगान व अल्ट्रासाऊंड लायपोलिसीसचे प्रशिक्षण अनुक्रमे फ्रान्स, स्पेन, इटली, यू.एस.ए., पोलंड येथे जाऊन घेतले आहे. या सर्व तंत्राचा वापर एकाच वेळी ‘स्लिम इन्स्टंट’ येथे अनुभवू शकतो. हे सांगताना त्या म्हणतात की, `World under the one roof.'
डॉ. मंजिरी यांना त्यांच्या क्षेत्रातील प्रतिस्पध्र्याबद्दल विचारलं असता त्या हसून म्हणाल्या, इतर क्लिनिकमध्ये फक्त एकाच गोष्टीवर भर दिलेला असतो; परंतु आमच्या इथे मात्र चेहऱ्यावरील ट्रीटमेंट व शरीराच्या कोणत्याही भागावरील ट्रीटमेंट दिल्या जातात.
या नव्या फिल्डमध्ये करिअरच्या संधी आहेत का हे विचारले असता त्या म्हणाल्या, कोणतेही काम करताना प्रथम त्यासाठी पुष्कळ मेहनत घेण्याची तयारी हवी व त्या कामाबद्दल पॅशन हवं तरच आपण यशोशिखर गाठू शकू आणि म्हणूनच मी मुंबई, वाशी, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद यांसारख्या ठिकाणी माझी क्लिनिक उघडू शकले. त्यासाठी मी सतत वेगवेगळ्या नव्या गोष्टी शिकते व आमच्या क्लिनिकमध्ये आणते. या लेझर प्रक्रियेनंतर लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप समाधान देणारा असतो. कारण चांगले दिसणे ही एक आता समाजाची गरज आहे आणि त्यामुळेच आपण अधिक कॉन्फिडण्ट होतो.
या उपचारांसंबंधी अधिक माहितीसाठी डॉ. मंजिरी पाटणकर यांना ०२२२ ६४५ ११६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
स्वप्नाली देसाई
डॉ. मंजिरी पाटणकर
swapnalidesai077@gmail.com