Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

आरामदायी मॅट्रेस
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे यंदाचा दादासाहेब रावळ यशस्वी नवउद्योजिका पुरस्कार डॉ. सुजाता पवार यांना मिळाला. त्यांच्या ‘निद्रा क्रिएशन्स’च्या सुजलाम मॅट्रेसविषयी..
सध्याच्या धावपळ, तणावपूर्ण जीवनपद्धतीत जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला काहीना काही व्याधी जडल्या आहेत. पाठदुखी, सांधेदुखी, मणक्यांचे आजार, निद्रानाश अशा कित्येक आजारांची एक मालिकाच जणू मागे लागलेली असते. या दुखण्यांवर ठाण्यातल्या डॉ. सुजाता पवार यांनी एक उपाय शोधला आहे तो म्हणजे, मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या गादीचा. त्यांच्या ‘निद्रा क्रिएशन्स’च्या ‘सुजलाम मॅट्रेस’ अनेकांसाठी आरामदायी ठरल्या आहेत.
या गाद्यांचा विशेष म्हणजे त्या नैसर्गिक गोष्टींपासून तयार करण्यात आल्या आहेत. या गाद्यांसाठी लागणारी लोकरी राजस्थानबरोबरच भारतातील अन्य ठिकाणं व ऑस्ट्रेलियातून मागिवली जाते. ही लोकर प्रक्रिया करून स्वच्छ केली जाते.

 

तिला ठराविक आकारात बांधण्यासाठी (बाईंडर म्हणून) हर्बल पेस्ट वापरली जाते. ज्यात चंदन, नीम, हळद यांसारख्या ३० ते ३५ वनौषधींचा समावेश असतो. अशी खास तयार केलेली गादी किंवा गाडीचं सीट कव्हर आरामदायी ठरलं आहे.
सुजलाम मॅट्रेस उबदार असून शरीरातला रक्तपुरवठा नियमित ठेवायला मदत करते. त्याची नैसर्गिक व संतुलित उष्णता पाठदुखीच्या तक्रारींचं निवारण करण्यास मदत करते. सांधेदुखी, मणक्यांचे आजार, स्नायूंची दुखापत, निद्रानाश, हातापायाला मुंग्या येणं, अंग जड होणं अशा अनेक समस्यांवर ही गादी फलदायी ठरली आहे. अर्थात यामागे आपलं हजारो वर्षांपूर्वीचं भारतीय संशोधनच आहे. ते पुन्हा समाजासमोर आणायचं काम डॉ. सुजाता पवार यांनी केलं आहे.
सुजाताताई सांगतात, ‘पूर्वी ऋषी, मुनी तपश्चर्येच्या वेळी लोकरीचा वापर करत असत. ध्यानधारणेसाठी वा झोपण्यासाठी लोकरीपासून तयार केलेल्या आसनांचा वापर करीत. गुरुगीतेत वाचल्याप्रमाणे शरीरातली विद्युत शक्ती थेट जमिनीत जाऊ नये म्हणून ऋषी, मुनी, व्याघ्रचर्म किंवा मृगचर्म वापरत असत. याचाच आधार घेऊन त्यावर अधिक संशोधन करून मी ही गादी तयार केली. खरं तर या व्यवसायाची सुरुवात झाली ते माझे पती सुनील पवार यांच्या पाठदुखीपासून. आमचा पेपर डिश बनवण्याचा व्यवसाय आहे. पेपर डिश फॅक्टरी मुंब्य्राला आणि अन्य दुकानांना सप्लाय करण्यासाठी त्यांना बाईकवरून जावं लागे. परिणामी त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी एखादी घोंगडी बांधून घ्यावी असं ठरवलं. अवघ्या दीड महिन्यात त्या घोंगडीचा गुण आमच्या लक्षात आला. तेव्हाच अशाप्रकारच्या गादीची कल्पना माझ्या डोक्यात आली. मी पहिली गादी ग्रामीण भागातून करून आणली. पण त्याला पावसाळ्यात घाणेरडा वास येऊ लागला. मग कळलं की त्या धनगराने बाइंडिंगसाठी जी पेस्ट वापरली ती चांगल्या दर्जाची नव्हती. तसंच सॉफ्टनेसही नव्हता. या सगळ्या अडचणी दूर करून बाइंडिंगसाठी वनौषधींचा वापर केला आणि वातावरणाचा समतोल राखण्यासाठी, कोणत्याही ऋतूत वापरण्यासाठी योग्य अशा तीन गाद्या तयार करून घेतल्या.
सुरुवातीला याचं मार्केटिंग करणं खूप कठीण गेलं. मुख्य म्हणजे याची खात्री पटवायची कशी? कुणी वापरल्याशिवाय ते होणार नव्हतं. मग पत्रकं, छोटी-छोटी प्रदर्शनं यांच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढविला. सुजलाम मॅट्रेस विकत घेणाऱ्या ग्राहकांशी फॉलोअप ठेवत गेले. आता इतकी मागणी असते की, कधी कधी लोकर मिळाली नाही की ग्राहकांना काही दिवस थांबायला सांगावं लागतं.’
त्यांच्या या व्यवसायातील यशाचं एक शिखर म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे दिला जाणारा दादासाहेब रावळ यशस्वी नवउद्योजिका पुरस्कार यंदा डॉ. सुजाता पवार यांना देण्यात आला.
निसर्गाशी सांगड घालून त्याला आयुर्वेदाची जोड देऊन भारतीय परंपरेचा हा वारसा त्यांनी आपल्या उद्योगातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनंत हस्ते त्यांना मदतही झालेली आहे. दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी एका प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी ‘सुजलाम’ पाहिली. ती त्यांनी कोल्हापूरच्या मित्राला भेट दिली. त्या मित्राने फोन करून आवर्जून फायदे सांगितले आणि त्यानंतर परांजपे यांनी अनेकांना ‘सुजलाम’चा पर्याय सुचवला. नितीन कंपनीतले गोखले यांनी दिवाळीत कामगारांना हीच भेट दिली. हजला जाणाऱ्यांनाही ही गादी भेट दिली गेली. भारताच नव्हे तर अमेरिका, लंडन, दुबईतही सुजलाम पोहोचली आहे.
सुजाताताई म्हणाल्या, ‘सुरुवातीला गोधडय़ा, चादरी काय विकताय? असं म्हणून हसणारे अनेक होते. पण मी खचले नाही. मी माझे काम करीत राहिले. ग्राहकांचा विश्वास हाच माझ्या व्यवसायातला मोठं करीत ओह. विशेष म्हणजे या गादीचे फायदे पाहून ग्राहकांनीच गाडीचं सीट कव्हर तयार करायला सांगितलं. आज अनेक जण आपल्या गाडीत आम्ही तयार केलेलं सीट कव्हर वापरतात. ऑफिसमध्ये गेल्यावर तेच कव्हर खुर्चीवर ठेवतात.
सुजलाम मॅट्रेसबाबतचा एक अनुभव सांगताना सुनीताताई म्हणाल्या, ‘‘पाल्र्याच्या एका प्रदर्शनात ८८ वर्षांचे एक आजोबा रोज तिथे येऊन बसत. हजार प्रश्न विचारून त्यांनी भंडावून सोडलं होतं, मी ही गादी घेतली तर मला त्याचा नक्की फायदा होईल ना? माझे पती सुनील यांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही ही गादी घेऊन जा, वापरून बघा. तुम्हाला गुण आला तरच मला पैसे द्या. शेवटी ते आजोबा गादी घेऊन गेले. काही दिवसांनंतर त्यांचा फोन आला. तेव्हा आम्ही दोघं गोव्याला प्रदर्शनासाठी गेलो होतो. त्यांना मला भेटायचं होतं. गोव्याहून आल्यावर आम्ही ठाण्याहून पाल्र्याला खास त्यांना भेटायला गेलो. त्यांचं समाधान बघून आम्ही भरून पावलो.
उत्तरा मोने
chatu.lok@gmail.com