Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

प्रादेशिक

मातृभाषेमुळेच आकलनशक्तीचा विकास शक्य - कुमार केतकर
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी
प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. होमी भाभा यांचे तत्कालिन सहकारी डॉ. भा. मा. उदगावकर हे या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते. त्यांनी डॉ. आनंद घैसास यांच्या प्रयत्नांना शिक्षकांची साथ मिळाली तर खगोलशास्त्राचा व विज्ञानाचा झपाटय़ाने प्रसार होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आणि डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रा’च्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये पाठविण्याचा कल पालकांमध्ये वाढत आहे. मात्र, इंग्रजी ही संवाद व ज्ञानाची भाषा आहे. मुलांच्या आकलनशक्तीचा विकास करण्यासाठी मातृभाषेची नितांत आवश्यकता आहे.

नागरिकांच्या आरोग्याची चिंता कोणाला?
प्रसाद रावकर/सुनील नांदगावकर, मुंबई,१९ जुलै

देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले. एकीकडे एत्तदेशीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले प्रकल्प यशस्वी होत असूनही पालिकेने तब्बल १०-११ वर्षे केवळ कागदी घोडे नाचविले आणि कचऱ्यावर पुनप्र्रक्रिया करणारा प्रकल्प उभारलाच नाही. देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील परिसरातील प्रदूषण कमालीचे वाढत असल्यामुळे आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चेंबूर हे गॅसचे चेंबर आहे असे म्हटले जात होते. आरसीएफमुळे येथे प्रदूषण होत असल्याची तक्रार तेथील नागरिकांकडून करण्यात येत होती.

पवार, विलासराव, भुजबळांचे नाव असलेल्या महाविद्यालयांना मान्यता!
मुंबई, १९ जुलै / खास प्रतिनिधी

नवीन महाविद्यालय सुरू करायचे असल्यास त्या महाविद्यालयास नेत्याचे नाव दिल्यास काम पक्के..असाच आदर्श बहुधा सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घालून दिला आहे. कारण राज्य शासनाने यंदा महाविद्यालयांना मंजुरी देताना शरद पवार, विलासराव देशमुख व छगन भुजबळ यांची नावे असलेल्या महाविद्यालयांना प्राधान्याने मान्यता दिली आहे. इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर तब्बल दीड महिन्याने राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व्यावसायिक व उच्च शिक्षणाच्या १८१ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.

प्रा. अनंत भावे यांच्या कवितांत रंगला ‘वात्सल्य’ पुरस्कार वितरण सोहळा!
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी
पद्मा बिनानी फाऊंडेशनच्या ‘वात्सल्य’ पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार विजेते प्रा. अनंत भावे यांनी सत्काराला उत्तर म्हणून औपचारिक भाषण न करता आपल्या चार कविता सादर केल्या आणि उपस्थित श्रोतृवर्गाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली व हा सोहळा अधिकच रंगतदार झाला. कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये आज सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्या हस्ते साहित्यातील योगदानाबद्दल प्रा. भावे यांना शाल, श्रीफळ आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रवादीला झाली घाई तर काँग्रेसचे वेळकाढूपणाचे धोरण!
मुंबई, १९ जुलै / खास प्रतिनिधी

काँग्रेसने आघाडीचा निर्णय शक्यतो लवकर घेऊन जागावाटपाची बोलणी सुरू करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली असतानाच राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबतानाच राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कनिष्ठ लिपिकाला सहाय्यक जनसंपर्क अधिकारी केल्याने एसटी महामंडळात असंतोष!
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी.) जनसंपर्क विभागांत काम करणाऱ्या एका कनिष्ठ कारकुनाला सर्व नियम डावलून सहाय्यक जनसंपर्क अधिकारी म्हणून बढती देण्यात आली असल्याने एस. टी.चे मध्यवर्ती कार्यालयच नियमांची पायमल्ली करीत असल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे. महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशनचे मुखपत्र असलेल्या स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार वार्ताच्या जुलैच्या अंकातच ही बाब प्रसिद्ध करण्यात आली असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

संगीत नाटक अकादमी ; रोहिणी हट्टंगडी आणि प्रकाश खांडगे यांची नियुक्ती
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी
देशातील प्रयोग कलांची शिखर संस्था असलेल्या दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या जनरल कौन्सिल सदस्यपदी लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची, तर कौन्सिलच्या स्वीकृत सदस्यपदी नाटककार महेश एलकुंचवार व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची नियुक्ती झाली आहे. नाटय़-संगीत व कलाविषयक धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे तसेच राज्य सरकारमध्ये सांस्कृतिक समन्वय साधण्याचे काम संगीत नाटक अकादमी करीत असते. अकादमीच्या जनरल कौन्सिलवर राज्य सरकारतर्फे सूचित केलेल्या व्यक्ती असतात. राज्य सरकारतर्फे प्रकाश खांडगे यांचे नाव कौन्सिलच्या सदस्यपदासाठी सुचविण्याच आले होते. कौन्सिल नृत्य, संगीत, नाटक या विषयांतील तज्ज्ञांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करीत असते. यामध्ये एलकुंचवार, हट्टंगडी यांच्याबरोबरच रतन थिय्याम आणि तिजनबाई यांचाही समावेश असल्याचे कळते.

ट्रॉली रुळावरून घसरल्याने हार्बर लाइन विस्कळीत
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी

हार्बर लाइनच्या कुर्ला स्थानकानजीक आज ओव्हरहेड वायर दुरुस्ती करताना ट्रॉली रुळावरून घसरल्याने सीएसटी ते बेलापूर मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी १०.४५च्या सुमारास कुर्ला स्थानकानजीक ओव्हरहेड वायर दुरूस्त करणारी ट्रॉली रुळावरून घसरली.