Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

समाज विघातक प्रवृत्तींना प्रश्नेत्साहन नको -प्रमिला मेढे
नागपूर १९ जुलै प्रतिनिधी

समाज व्यवस्था व नैतिक मूल्यांना समलैगिंक संबंधासारख्या विकृत प्रवृत्तीपासून वाचवण्याची गरज असून अशा प्रवृत्तींना सामाजिक हिताचा विचार करता प्रश्नेत्साहन देऊ नये, असे आवाहन

 

राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका प्रमिला मेढे यांनी केले.
राष्ट्र सेविका समितीच्या अर्ध वार्षिक बैठकीचा समारोप नुकताच देवी अहल्या मंदिरात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडला असून त्याचा कोवळ्या वयातील मुलांवर विपरित परिणाम होत आहे. प्रसार माध्यमांच्या या भूमिकेचा सभेच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचेही प्रमिलाताई म्हणाल्या. अनैसर्गिक शारीरिक संबंधांबाबतच्या न्यायालयाच्या निर्णयाचा धार्मिक, सामाजिक संस्था व सैनिकी अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. समाजव्यवस्था आणि नैतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी कलम ३७७ आवश्यक असल्याचा प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला.
दहशतवादाने समाजाला चारही बाजूंनी घेरले असून देशाची एकता व अखंडतेपुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्य सरकार नागरिकांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे सामान्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत संवेदनशील क्षेत्रामध्ये सीमा सुरक्षा दलांच्या माध्यमातून शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा व पिडीतांचे पुनर्वसन करावे. राष्ट्रभक्तांनी अशा घटनांप्रति संवेदनशीलता दाखवत शासनावर नैतिक दबाव निर्माण करण्यासाठी समोर येण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी प्रमिलाताईंच्या हस्ते राष्ट्र सेविका समितीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. बैठकीला विविध प्रश्नंतातील १३३ प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला अ.भा. प्रमुख कार्यवाहिका शांताक्का, सहकार्यवाहिका आशा शर्मा, रुक्मिणी अक्का, अलका इनामदार, रेखा राजे, डॉ. शरद रेणू, माधुरी मराठे व माजी प्रमुख संचालिका उषाताई चाटी उपस्थित होत्या. यावेळी अखिल भारतीय सहनिधी प्रमुख म्हणून वैदेही राजे व विदर्भ प्रश्नंत सहकार्यवाहिका म्हणून श्रद्धा पाटखेडकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.