Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यपाल एस.सी. जमीर उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

राज्यपाल एस.सी. जमीर हे मंगळवार, २१ जुलैपासून २५ जुलैपर्यंत गडचिरोली, भंडारा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत.
राज्यपालांचे मंगळवारी रात्री ८ वाजता विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय

 

विमानतळावर आगमन होईल. २२ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता ते गडचिरोलीला जातील. तेथे लोककला केंद्रांतर्गत मानवविकास मिशनला भेट देऊन ते प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. दुपारी १२.३० वाजता आदिवासींना जमिनीच्या पट्टय़ाचे वाटप, विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ते अर्थसहाय्याचे वाटप करतील व नागरिकांशी चर्चा करतील. दुपारी १.२० वाजता सार्वजनिक बाल संगोपन हेल्प लाईनचे उद्घाटन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेच्या ओळखपत्राचे वाटप करतील. दुपारी ३ वाजता आरमोरी येथे कोसा प्रदर्शनाला भेट देतील व नागरिकांशी चर्चा करतील.
२३ जुलैला सकाळी ७.३० वाजता ते मोटारीने साकोलीला जातील. ९.५५ वाजता शिवनीबांध येथे मत्स्यबीज केंद्राला भेट देतील. दुपारी १.४५ वाजता ते सालेकसा तालुक्यातील कवराबांध येथे जातील. कवराबांध येथील डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्रश्नप्त प्रश्नथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन ते नागरिकांशी चर्चा करतील. त्यानंतर राज्यपाल गोरेगावहून सडकअर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथे जातील. ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरावर द्वितीय आलेल्या या गावातील नागरिकांशी ते चर्चा करतील. त्यानंतर राज्यपाल ५.३० वाजता भंडाऱ्याला जातील.
२४ जुलैला सकाळी ७.३० वाजता ते यवतमाळला जातील. सकाळी १०.१० वाजता रातचंदना येथे स्वयंसहायता बचतगट, अंगणवाडी आणि आदर्श गावाला भेट देतील व नागरिकांशी चर्चा करतील. ११.३० वाजता सायखेडा खुर्द येथे स्वयंसहायता बचतगटाला भेटी देतील व चर्चा करतील. दुपारी १२.५० वाजता यवतमाळला येतील. नंतर दुपारी ३.२५ वाजता ते पांढरकवडय़ाला जातील. तेथील ग्रामीण रुग्णालय, आकोली येथील आश्रमशाळा भेट देतील व आदिवासींना जमीन पट्टय़ांचे वाटप करतील. सायंकाळी ७.२५ वाजता यवतमाळवरून निघून ते रात्री ८ वाजता नागपूरला राजभवनाला येतील. राज्यपाल शनिवार, २५ जुलैला सकाळी १०.४५ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९६ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.