Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वीज उत्पादन वाढल्याचा महावितरणचा दावा
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

गेल्या काही वर्षात राज्याची वीज निर्मिती क्षमता एका युनिटनेही वाढलेली नाही, हा आरोप वीज महावितरण कंपनीने फेटाळला असून वीज उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा केला आहे.

 

पावसामुळे विजेची मागणी सध्या कमी झालेली असली तरी राज्यातील विविध वीज प्रकल्पांतील अनेक संच बंद असल्याने वीजनिर्मितीतही घट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर महावितरण आणि महानिर्मितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावण्यात येत असताना विजेची वाढीव उपलब्धता आणि भावी प्रकल्पांमुळे राज्य विजेच्या निर्मितीत अग्रेसर असल्याचा दावा ‘महावितरण विद्युत वार्ता’तून करण्यात आला आहे. सध्या दाभोल प्रकल्पातून २००५ पासून १००० मेगाव्ॉट, परळी केंद्रातून २००७ पासून २५० मेगाव्ॉट, पारस, घाटघरमधून २५० मेगाव्ॉट तर उरण वीज केंद्रातून ३५० मेगाव्ॉट अशी २१०० मेगाव्ॉट तसेच विविध केंद्रीय प्रकल्पांतून २००५ ते २००९ या काळात ११५२ मेगाव्ॉट वीज मिळत आहे. राज्याला एकूण ३२५२ मेगाव्ॉट वाढीव वीज उपलब्ध होत आहे.
याशिवाय २०१२ पर्यंत महानिर्मितीने विविध प्रकल्प हाती घेतले असून २००९ मध्ये परळीच्या नवीन संचातून २५० तर पारसच्या नवीन संचातूनही तितकीच वीज मिळणार आहे तर केंद्रीय प्रकल्पांतून ११२९.३ मेगाव्ॉट वीज उपलब्ध होणार आहे. २०१० मध्ये महानिर्मितीचा खापरखेडा, भुसावळ १ व भुसावळ २ या विस्तारित प्रकल्पातून प्रत्येकी ५०० प्रमाणे एकूण १५०० मेगाव्ॉट वीज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय प्रकल्पातून २७० मेगाव्ॉट तर खाजगी प्रकल्पांतून ३०० मेगाव्ॉट वीज मिळणार आहे. २०११ मध्ये चंद्रपूरचे ५०० मेगाव्ॉटचे विस्तारित १ व २, परळीचा २१० मेगाव्ॉट, उरण गॅस बी-१ मधून ८१४, बी-२ मधून ४०६ अशी २४३० मेगाव्ॉट वीज मिळणार आहे. याशिवाय केंद्रीय प्रकल्पातून ३५३ तर खाजगी प्रकल्पातून ११६० मेगाव्ॉट वीज मिळेल. २०१२ मध्ये भुसावळ व पारस केंद्रातून प्रत्येकी १९५ मेगाव्ॉट वीज उपलब्ध होईल. केंद्रीय प्रकल्पातून १४८० तर खाजगी प्रकल्पातून १३४० मेगाव्ॉट वीज मिळेल, असा लेखाजोखा महावितरणने दिला आहे.