Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रोणु मुजुमदार यांचे बासरी वादन
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने स्पिक मॅके संस्थेतर्फे श्रीकृष्णनगरातील भारतीय विद्या भवन्स व भिडे कन्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या रोणु मुजुमदार यांच्या बासरी वादनाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या दादमुळे दोन्ही कार्यक्रमात चांगला रंग भरला. यावेळी विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत आणि बासरीवादनातील शंकाचे पंडितजीकडून निरसन

 

करून घेतले.
रोणु मुजुमदार यांनी प्रश्नरंभी विद्यार्थ्यांना बासरीचा इतिहास सािंगतला आणि गुरुला वंदन करून त्यांनी राग जौनपुरी सादर केला. आसावरी व जौनपुरी रागातील फरक आणि त्यातील बारकावे कसे ओळखावे हे मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर वडिलांना भावांजली म्हणून त्यांनी रचलेली भटियाली रागातील रचना सादर केली.
कार्यक्रमात रंगत येत असताना विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ हे भजन सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांंनी शास्त्रीय संगीताबाबत शंका विचारल्या.
प्रश्नरंभी रोणु मुजुमदार यांचा शाळेच्या प्रश्नचार्य अन्नपूर्णा शास्त्री यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुचिता कुळकर्णी यांनी पंडितजींचे चिरंजीव सिद्धार्थ मुजुमदार यांचे स्वागत केले.
गोपाल गादेवार व संघिता मित्रा यांनी संचालन केले. अपूर्वा कोहळे व देवांश अग्रवाल यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.