Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कन्यका नागरी सहकारी बँकेच्या नागपूर शाखेचे उद्घाटन
नागपूर , १९ जुलै/प्रतिनिधी

कन्यका नागरी सहकारी बँकेच्या सहाव्या नागपूर शाखेचे उद्घाटन खासदार राज्यमंत्री विलासराव मुत्तेमवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, अर्बन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे दृष्यंत शिडाम यांची

 

प्रश्नमुख्याने उपस्थिती होती.
बँकेचे अध्यक्ष प्रश्नचार्य डॉ. विजय आईंचवार यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल माहिती देताना बँकेच्या संचालक मंडळाने बँकिंग व्यवसाय अधिक पारदर्शी, अधिक लोकाभिमुख व विश्वासार्ह राहण्यासाठी कडक शिस्त, दूरदृष्टी व कामकाजातील प्रत्येक घटकासोबत सुसूत्रता, अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केल्यामुळे आज बँकेला हे वैभव प्रश्नप्त झाले आहे. नागपूर येथे बँकेची शाखा असावी अशी बँकेच्या सर्व संचालक, सभासद व ग्राहकांची इच्छा होती ती आज पूर्णत्वास गेली.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार विलासराव मुत्तेमवार यांनी सर्वप्रथम बँकेचे सर्व संचालकांचे अभिनंदन करून चंद्रपूर-गडचिरोली सारख्या मागास भागातून सीमोल्लंघन करून बँकेने नागपूर शहरात प्रवेश केला असून ही बँक मुंबईपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. सहकारी बँकेचे भविष्य चांगले आहे ज्या तऱ्हेने या बँकेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रश्नचार्य डॉ. विजय आईंचवार यांच्या नेतृत्वात ज्या विश्वासाने संचालक मंडळ म्हणून काम करीत आहे तो विश्वास कायम असावा या दृष्टीने संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासून ही बँक सर्वसामान्यांच्या दृष्टीने कशी उपयुक्त ठरेल याकडे संचालक मंडळानी लक्ष दिले पाहिजे. आज या बँकेच्या ठेवी १४५ कोटी रुपयाच्यावर असून कर्जवाटप ६५ कोटीपेक्षा अधिक रुपयाचे आहे हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक असून नागपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून ही बँक वेगाने पुढे कशी जाईल याकरिता आवश्यक ती मदत व बँकेच्या भरभराटीकरिता शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, कैलासचंद्र अग्रवाल, दुष्यंत शिडाम यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. नागपूर शाखा उघडण्याकरिता गणेश चक्करवार यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे संचालक डॉ. प्रफुल्ल भास्करवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक नागपूर शाखा, सल्लागार समिती सदस्य व अनेक गणमान्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.