Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पीएच.डी.-एम.फिल. धारक प्रश्नध्यापक नियुक्त्यांच्या विरोधात मुंडण
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

पीएच.डी. आणि एम.फील. धारकांना प्रश्नध्यापक म्हणून देण्यात आलेल्या नियुक्तयांच्या विरोधात नुटा, एमफुक्टो, नेट-सेट कृती समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, राष्ट्रीय शैक्षणिक गुणवंता मंच आदी विद्यार्थी संघटनांनी आज रिझव्‍‌र्ह बँक चौकात मुंडण आंदोलन केले.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपसचिव बी.के. सिंग यांच्या पत्राचा आधार घेत राज्यातील बारा विद्यापीठांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांनी नेट, सेट हे एम.फील. आणि पीएच.डी.ला समकक्ष आहे, असे आदेश काढले आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरूंना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ नुसार स्वतंत्र अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल केला आहे. या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून रिझव्‍‌र्ह बँक चौकात कुलगुरू एस.एन. पठाण, कुलसचिव सुभाष बेलसरे आणि सहसंचालक देशमुख यांच्या नावाने मुंडण केले.
एम.फील. आणि पीएच.डी. धारकांना प्रश्नध्यापक म्हणून नियुक्तीच्या अध्यादेश ताबडतोब रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नेट, सेट पात्र असलेल्या सेवेतील सर्व प्रश्नध्यापकांनी सोमवारपासून संपातून माघार घेऊन त्यांच्या महाविद्यालयात कार्यरत व्हावे आणि सोबतच विद्यार्थी संघटनांनी चालवलेल्या अपात्रताधारक प्रश्नध्यापकांच्या मागणीलाही विरोध करावा, असे आवाहन विद्यार्थी संघटनेचे संयोजक मिलिंद साठे यांनी केले आहे. या प्रतिकात्मक आंदोलनात डॉ. इंद्रजित ओरके, श्रीकांत भोवते, नयन कांबळे, नितेश मोटघरे, मंगेश जुनघरे, विवेक गोंडाणे, रक्षित बागडे, राकेश सिंपी, अमोल शेंडे, श्रीरंग लभाने, समीर महाजन, ठाणेश्वर उरकुडे, पंकज मून, प्रफुल्ल कोटांगले यांनी सहभाग घेतला.