Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सोयाबीनच्या रोपांवर उंट अळीचा हल्ला
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

यंदाचा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी धोक्याचा ठरण्याची शक्यता आहे. कडक उन्हाळा, त्यानंतर पावसाला उशिरा झालेली सुरुवात, यातही सोयाबीन लावल्या लावल्याच उंट अळींचा प्रश्नदुर्भाव झाल्याने पीक निघण्यापूर्वीच ते अळ्या फस्त करण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोषक

 

हवामानामुळे अळ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता कृषी खात्याने वर्तविली आहे. गेल्या हंगामात विदर्भात कोटय़वधींचे सोयाबीन या अळ्यांनी फस्त केले, होते हे येथे उल्लेखनीय.
यंदा उशिरा पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने पूर्वी झालेल्या पेरण्या तरल्या असल्या तरी अळ्यांच्या प्रश्नदुर्भावामुळे पीक अडचणीत सापडले आहे. नागपूर जिल्ह्य़ात ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत, सोयाबीन पिकाची टक्केवारी ११३.१६ टक्के आहे. सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २,१५,१०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात २,३४,४०६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जून महिन्याच्या शेवटी पेरण्या झालेल्या सोयाबीनची आता रोपे उभी आहेत. झाडांना ८ ते १० पाने आहेत. मात्र याच अवस्थेत काही ठिकाणी सोयाबीनवर उंट अळीचा प्रश्नदुर्भाव झाला आहे, सध्या अळ्या बारिक आहेत, मात्र हवामान त्यांना पोषक असल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे, असे जिल्हा कृषी अधीक्षक पाटील यांनी सांगितले. विदर्भातील इतर जिल्ह्य़ातील परिस्थितीही अशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उंट अळ्या सोयाबीनची पाने खरडून खातात, त्याचा फटका फुले आणि शेंगांनाही बसतो. सध्या सोयाबीनची झाडे रोपटय़ाच्या अवस्थेत आहेत. त्यावरच अळ्या पडल्याने झाडच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या हंगामात उंट अळीमुळे मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची हानी झाली होती. हानीचे प्रमाण पूर्व विदर्भातील चंद्रूपर, नागपूर तसेच पश्चिम विदर्भातील जिल्ह्य़ातही सोयाबीनला फटका बसला होता. अळीचा प्रश्नदुर्भाव शेवटच्या टप्प्यात लक्षात आल्यावर पीक हानी टाळता आली नाही, मात्र या वर्षी कृषी खात्याने अळीचा प्रश्नदुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच स्काऊटची पथके स्थापन केली, त्यामुळे पहिल्याच टप्प्यात अळीचा प्रश्नदुर्भाव लक्षात आला, हे येथे विशेष.
राज्यातील सोयाबीन व कापूस पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व सनियंत्रण योजनेंतर्गत जिल्ह्य़ात चार कीड नियंत्रक आणि ४६ कीड सर्वेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक आठवडय़ात चार दिवस सर्वेक्षक शेतावर जाऊन पाहणी करतील व कीड पडली असेल तर त्याची माहिती त्याच दिवशी शासनाकडे पाठवण्यात येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ातील सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कीड सर्वेक्षण व नियंत्रणाबाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत गावातील पाच शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल. किडीवरील उपाययोजनांची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात येईल, यामुळे किडीवर तात्काळ नियंत्रण आणणे शक्य होईल, असे पाटील यांनी सांगितले.
कृषी खात्याने सुचवलेल्या उपाययोजना
पिकांभोवती सूर्यफूल व एरंडीची झाडे लावावीत
नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा
निंबोळीचा अर्क असलेले कीटकनाशक फवारावे
फवारणी करताना पानाच्या खालच्या बाजुने सुरुवात करावी
डवरणी, कोळपणी वेळेवर करावी
बिव्हेरिया, अ‍ॅझेडिरीक्टीन, एन्डोसल्फान,
क्विनॉलफ ॉस, क्लोरोपायरीफॉस यांची फवारणी करावी