Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रश्नध्यापकांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग लागू करण्यासह इतरही मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करीत असलेल्या प्रश्नध्यापकांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे.
१४ जुलैपासून प्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. प्रश्नध्यापक महाविद्यालयात येतात मात्र वर्ग घेत

 

नाही, काही महाविद्यालयांनी पर्यायी व्यवस्था केली आहे, मात्र ती अपुरी ठरली आहे. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकनाच्या कामावरही या आंदोलनामुळे परिणाम झाला आहे. शिवाय विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रश्नध्यापकांच्या स्वाक्षरीची गरज भासते, मात्र ते स्वाक्षरी करण्यास नकार देत असल्याचे विद्यार्थी सांगतात. प्रश्नध्यापकांच्या आंदोलनामुळे अनेक महत्त्वाच्या विषयाचे तास होत नसल्याने विद्यार्थ्यांंची अडचण झाली आहे.
प्रश्नध्यापकांच्या संघटना विद्यापीठापुढे रोज निदर्शने करून शासनाचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असले तरी राज्य शासनाकडून अद्याप तरी आंदोलन मागे घेण्याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. नेट/सेट ग्रस्त प्रश्नध्यापकांच्या नियुक्तीचा प्रश्न, सहावा वेतन आयोग प्रश्नध्यापकांना लागू करावा यासह एकूण ३२ मागण्या प्रश्नध्यापकांच्या आहेत, त्यावर शासनाने तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाने दिला आहे.
शनिवारी या संदर्भात विद्यापीठापुढे आंदोलनकर्त्यां प्रश्नध्यापक संघटनांची सभा झाली. त्यात डॉ. हिवरकर, प्रश्न. मिसाळ, डॉ. आढाव, प्रश्न. जाचक, डॉ. फुलझेले, डॉ. यावलकर, डॉ. बावनकर, प्रश्न. बोरकर, डॉ. डोंगरे, डॉ. इलमे, डॉ. पाटील यांची भाषणे झालीत. सभेचे संचालन सुनील हजारे यांनी केले.