Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सून बोनांझा मालिकेत आजपासून ‘हार्मनी’ चित्रपदर्शन
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस (सिस्फा)तर्फे लक्ष्मीनगरातील सिस्फा की छोटी गॅलरीत सुरू असलेल्या मान्सून बोनांझा या चित्रप्रदर्शन मालिकेत उद्या, सोमवारपासून औरंगाबादच्या चित्रकला महाविद्यालयाचे बाळकृष्ण छडीदार, श्रद्धा उत्तरवार

 

व प्रसाद निकुंभ या तरुण चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन ‘हार्मनी’ आयोजित करण्यात आले आहे.
उद्या सायंकाळी ६.३० वाजता शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण दारोकार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. २२ जुलैपर्यंत रोज सायंकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील. अजिंठा आणि वेरुळ यासारखे महान कलावैभव लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे नुकतेच बीएफए पदवी प्रश्नप्त केलेले तीन तरुण चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन म्हणजे तरुणाईच्या भाव भावनांचा उत्तम संवाद आहे.
कलाक्षेत्रात भरारी मारण्यासाठी सज्ज झालेली ही चमू त्यांच्या दर्जेदार कामासाठी प्रसिद्ध आहे. बाळकृष्ण छडीदार हा तरुण चित्रकाराच्या चित्रातील विषय अंजिठा व वेरुळ येथील लेण्यावर आधारित आहे. श्रद्धा उत्तरवार या चित्रकीर्तीच्या चित्रात तिच्या भावनांचे दर्शन घडते तर प्रसाद निकुंभ यांच्या चित्रात मानव व त्याच्या पशुपालन व्यवसायाने प्रश्नण्यांशी होणारी दोस्ती नाती आणि त्यामुळे होणारी बांधिलकी याचे उत्कट चित्रण आढळते.
प्रदर्शनासोबतच कलाकारांवर करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मस, आर्टिस्ट स्पिक्स, कलागोष्टी स्लाईड शो आणि कलेवरील पुस्तकाचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने पाश्चात्य कलाशैली व भारतीय कलाशैलीवर आधारित कलापुस्तकाच्या कलासंग्रहाचे वैशिष्टपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले.