Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

शेतीवाडी
(सविस्तर वृत्त)

सुगंधी तेल ‘प्रकल्प अहवाल’
कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याची यशस्वी होण्याची शक्यता व्यावहारिक कसोटय़ांवर पाहण्यासाठी ‘‘प्रकल्प अहवाल’’ उपयोगी पडतो. वित्तीय साहाय आणि सरकारी खात्यात

 

नोंदणीसाठी ‘‘प्रकल्प अहवाल’’ आवश्यक आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव मिळाल्यानंतर आíथक संस्था त्याची छाननी व अभ्यास करून त्याची व्यवहार्यता पडताळून पाहतात. त्यासाठी, तो जितका परिपूर्ण असेल तितका सहज ग्राह्य़ धरला जातो.
या साठीच प्रकल्प अहवालात उत्पादनाची माहिती, त्याचे उपयोग, बाजारपेठ, उत्पादनाची बाजारातील किंमत, उत्पादन पद्धत व प्रकल्पाची क्षमता याची माहिती द्यायला हवी. तसेच उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री, त्याचा घसारा, मनुष्यबळ, कायमस्वरूपी गुंतवणूक, खेळते भांडवल, प्रत्यक्ष खर्च व नफा याची माहिती द्यायला हवी. प्रकल्प उभारण्यासाठी जमीन/जागा स्वत:ची आहे, खरेदी करणार की भाडेपट्टय़ाने घेणार यावर त्यांचा खर्च ठरतो.
प्रकल्प अहवालातील उत्पादन खर्च, प्रकल्प खर्च, मनुष्यबळ खर्च या गोष्टी आíथक यशाची शक्यता ठरवतात. यासाठीच सुगंधी वनस्पतींची लागवड आणि सुगंधी तेलांचे उत्पादन करावयाचे झाल्यास सुधारित तंत्रज्ञानानेच करावे. तरच ते फायदेशीर ठरेल.
सिट्रोनेला गवताचा उत्पादन खर्च
सिट्रोनेला गवताची लागवड करण्यासाठी तसेच लागवड केल्यानंतर ४ वर्षे येणाऱ्या खर्चाचा तपशील लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी एकदाच येणारा दरएकरी खर्च रुपये नांगरणी.. ९००, कुळवणी ..५००, सरी ओढणे..३००, लागवडीसाठी
मजुरी..१००० (५ महिला ७ ४ दिवस ७ ५० रु. प्रतिदिवस), ४ टन शेणखत..४००० (नांगरताना), रोपे..१०,००० (१०,००० रोपे ७ १ रु. प्रमाणे), खते..११५० (लागवड करताना). १७,८५० रु. एकूण खर्च.
लागवड केल्यानंतर ४ वर्षे येणारा खर्च प्रतिएकर-प्रतिवर्ष, रुपये आंतर मशागत..२४००, पाणी देण्यासाठी..१८००, खते (प्रत्येक कापणी नंतर)..६००, औषधे..४००. ५२०० एकूण रुपये.
—४ वर्षांचा एकूण खर्च ५२०० ७ ४ = २०,८०० रु.
४ वर्षांत एकंदर १५ कापण्या होतील. पहिल्या वर्षी ३० टन, नंतरची ३ वर्षे प्रत्येकी ४० टन याप्रमाणे ४ वर्षांत साधारणपणे प्रती हेक्टर १५० टन गवत मिळेल. म्हणजेच १ एकर जमिनीतून ४ वर्षांत ६० टन गवत मिळेल.

त्यासाठी झालेला खर्च व उत्पादन किंमत- रु. १७,८५० (लागवडीसाठी)+ रु. २०,८०० (लागवडीनंतरचा ४ वर्षांचा) = रु. ३८,६५० भागिले - ६० टन गवत = ६४४ रु.
- सिट्रोनेला गवताची स्वत:च्या जमिनीत लागवड केल्यास रु. ६४४ प्रतिटन उत्पादन किंमत येते.
जमीन भाडेपट्टय़ाने घेऊन लागवड केल्यास जमिनीचा भाडेपट्टा रु. ५००० प्रती एकर प्रतीवर्षी ४ वर्षे = २०००० रु. + २००० वकिलाची फी, स्टँप डय़ूटी वगैरे एकूण रु. २२००० भागिले ६० टन गवत = रु. ३६६ भाडेपट्टा प्रती टन.
-जमीन भाडेपट्टय़ाने घेऊन लागवड केल्यास सिट्रोनेला गवताची उत्पादन किंमत रु. ६४४ अधिक रु. ३६६ भाडेपट्टय़ापोटी = रु. १०१० प्रती टन येते.
उध्र्वपातन यंत्रात पुढील गोष्टी येतात- १) सुगंधी वनस्पती ठेवण्यासाठी २ टाक्या. या टाकीत तळापासून काही अंतरावर लोखंडी जाळी ठेवलेली असते. २) टाकीवर सहज काढता-बसविता येणारे, मध्यभागी निमुळते होणारे झाकण बसविले असते. झाकणाच्या मध्यभागी तेलमिश्रीत पाण्याची वाफ कंन्डेन्सरकडे वाहून नेणारा पाईप जोडला असतो. (उल्ल्रूं’ ळस्र् उ५ी१ ह्र३ँ श्ंस्र्४१ ढ्रस्र्ी). ३) पाण्याची वाफ तयार करणारा बॉयलर. ४) तेलमिश्रीत पाण्याची वाफ तंड करणारा कंन्डेन्सर. ५) तेल आणि पाणी वेगळे करणारा सेपरेटर. ६) पाईप लाईन व झडपा.
इतर खर्च- उध्र्वपातन केंद्र उभारण्यासाठी, उध्र्वपातन यंत्राव्यतिरीक्त इतरही खर्च येतो. श्रम कमी करण्यासाठी उध्र्वपातन यंत्रावर फ्रेमच्या साहायाने, उभी व आडवी अशा दोन पुल्या लोखंडी साखळीसह बसवाव्या लागतात. उध्र्वपातन यंत्राच्या टाकीचे झाकण व टाकीतीलस जाळ्या साखळीच्या साहायाने उचलून बाजूला सरकविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ज्यायोगे तेल काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गरम पाला सहज काढता येतो. तेल काढण्यासाठी सुगंधी वनस्पती उध्र्वपातन यंत्राच्या टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी ट्रॉलीची आवश्यकता भासते. उध्र्वपातनाच्या प्रक्रियेत कंन्डेन्सरमध्ये थंड पाण्याचा सतत पुरवठा ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी कंन्डेन्सरमधून आलेले गरम पाणी थंड करून पुन्हा प्रकल्पात वापरण्यासाठी कुलिंग टॉवर उभारवा लागतो. पाण्याच्या टाकीची व्यवस्था करावी लागते. उध्र्वपातन केंद्रासाठी शेड, तसेच तयार माल व जळाऊ लाकडे, अवजारे इत्यादी ठेवण्यासाठी खोली बांधावी लागते. याशिवाय उध्र्वपातन यंत्र आपल्या शेतात आणण्यासाठी वाहातुकीचा, त्याच्या उभारणीचा, त्यावरील विक्रीकर व जकातीचा खर्च वेगळाच.
उध्र्वपातन यंत्राची किंमत तसेच प्रकल्पाचे आयुष्य, सुरक्षितता ही त्याचे डिझाईन, त्यासाठी वापरलेल्या मटेरीयलचा दर्जा व जाडीवर अवलंबून असते.
उध्र्वपातन यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टीलमध्ये बनविणे खíचक असते. त्यासाठी त्यातील काही उपकरणे स्टेनलेस स्टीलमध्ये तर काही ट.र. मध्ये बनविल्यास खर्च आटोक्यात येतो. त्यासाठी १ टन क्षमतेच्या उध्र्वपातन यंत्रातील ५०० कि.ग्रॅम क्षमतेच्या दोन्ही टाक्या, इतर पाईप लाईन व झडप या गोष्टी ट.र. मध्ये बनविल्या आणि कोनीकल टॉप कव्हर, त्यावरील तेलमिश्रीत पाण्याची वाफ कंन्डेन्सरकडे वाहून नेणारा पाईप, कंन्डेन्सर, ऑईल सेपरेटर या गोष्टी संपूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये, तर बॉयलर बनविण्यासाठी स्टेनलेस स्टील व ट.र. चा संयुक्तरीत्या वापर केल्यास खर्चात बचत होते.
उध्र्वपातन केंद्र उभारण्यासाठी स्वत:ची जमीन आहे असे गृहीत धरून एकदाच होणारा खर्च. रुपये-
१ टन क्षमतेचे उध्र्वपातन यंत्र.....३,७०,०००
स्टेनलेस स्टील व ट.र.चा संयुक्त वापर करून, टाकीतील लोखंडी जाळ्या व उध्र्वपातन यंत्रातील चेन पुली सह.
यंत्र उभारणीसाठी.....१५,००० सुगंधी वनस्पती टाकीपर्यंत वाहून आणण्याची ट्रॉली....१०,००० २००० लिटरची पाण्याची टाकी व कुिलग टॉवरसाठी..५०,००० शेड उभारणीसाठी....८०,००० माल ठेवण्यासाठी खोलीचे बांधकाम...७०,००० उध्र्वपातन यंत्राची वाहतूक, विक्रीकर व जकात...५५,००० एकूण खर्च- रु. ६,५०,०००
१ टन सिन्ट्रोनेला गवतापासून, उध्र्वपातन प्रक्रिया करून तेल काढण्यासाठी येणारा खर्च रुपये-
उध्र्वपातन यंत्रावरील ४ मजूर ७ १०० रु. प्रतिदिवस-प्रतिमजूर..४००, ३०० किलो जळाऊ लाकूड (बॉयलरसाठी ) ...७५०, लाईट बील...१०, यंत्रसामग्री, शेड व इतर बंधकाम यांच्यावरील घसारा (१० टक्के) ..२२०. एकूण खर्च १३८०
सिन्ट्रोनेला गवतात ०.८ ने १.० टक्का तेलाचे प्रमाण असते. तेलाचे प्रमाण (उतारा) .८५ टक्के मिळाल्यास १ टन सिन्ट्रोनेला
गवतापासून ८.५किलो तेल मिळेल. १ टन स्रिटोनेला गवताच्या कापणीसाठी १५० रु. खर्च येतो (३ महिला ७ १ दिवस ७ ५० रु. प्रती महिला-प्रती दिवसप्रमाणे मजुरी.
सिन्ट्रोनेला तेलाची उत्पादन किंमत - रुपये-
१ टन सिन्ट्रोनेला गवताची उत्पादन किंमत..६४४ १ टन सिन्ट्रोनेला गवताच्या कापणीसाठी..१५० उध्र्वपातन प्रक्रियेसाठी..१३८०. एकूण रु. २१७४
२१७४ रुपयात ८.५ किलो सिन्ट्रोनेला तेल तयार होईल. त्याची प्रतिकिलो किंमत २५६ रुपये. (२१७४ भागिले ८.५)
-जमीन भाडेपट्टय़ाने घेऊन सिन्ट्रोनेला गवताची लागवड केल्यास सिन्ट्रोनेला तेलाची उत्पादन किंमत .......२५४० रुपयांत ८.५ किलो म्हणजे २९९ रु. प्रतिकिलो होईल.
उध्र्वपातन केंद्रापासून १० किलोमीटर परीघ क्षेत्रातील शेतक ऱ्यांनी सिन्ट्रोनेला गवताची लागवड केलेली असल्यास त्यांच्या शेतातील सिन्ट्रोनेला गवत १६०० रु. टन या भावाने उध्र्वपातन केंद्रावर विकत घेऊन सिन्ट्रोनेला तेल काढल्यास..
१६०० रु. १ टन गवतासाठी + १३८० रु. उध्र्वपातन प्रक्रियेसाठी = २९८० रुपयांत ८.५ किलो तेल म्बणजे प्रतिकिले ३५१ रु.
— १६०० रु. प्रती टन दराने सिन्ट्रोनेला गवत विकत घेऊन त्यापासून तेल काढल्यास सिन्ट्रोनेला तेलाची उत्पादन किंमत ३५१ रु. प्रती किलो येईल. तयार झालेले सुगंधी तेल ठेवण्यासाठी कॅन व वाहतुकीसाठी मिळून ८ रु. प्रती किलो खर्च येतो.
बाजारभाव : सिन्ट्रोनेला तेल बाजारात ४०० ते ४२५ रु. प्रती किलो दराने विकले जाते. शेतकऱ्यांना १६०० रु. टन दराने सिन्ट्रोनेला गवत उध्र्वपातन केंद्रावर पोहोचवताना प्रती टन १५० रु. कापणीसाठी व २०० रु. प्रती टन वाहतुकीसाठी खर्च येईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे सुगंधी वनस्पती लागवड योजनेअंतर्गत उध्र्वपातन यंत्र कार्यरत आहे. या यंत्राद्वारे वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतींचे तेल काढले जाते. हा आíथक अहवाल औसा, लातूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. बसवराज वाघदरे यांच्या शेतात प्रत्यक्ष लागवडीसाठी उध्र्वपातन केंद्र उभारणीसाठी आलेला / येत असलेला खर्च व मिळालेले / मिळत असलेले उत्पादन यावर तयार केला आहे. वरील आकडे हे अंदाज देणारे असून ते क्षेत्र, ठिकाण इत्यादीनुसार निरनिराळे असू शकतील. संपर्क- ९८१९०५६७४२
अजिंक्य विश्वास