Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

शेतीवाडी

सुगंधी तेल ‘प्रकल्प अहवाल’
कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याची यशस्वी होण्याची शक्यता व्यावहारिक कसोटय़ांवर पाहण्यासाठी ‘‘प्रकल्प अहवाल’’ उपयोगी पडतो. वित्तीय साहाय आणि सरकारी खात्यात नोंदणीसाठी ‘‘प्रकल्प अहवाल’’ आवश्यक आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव मिळाल्यानंतर आíथक संस्था त्याची छाननी व अभ्यास करून त्याची व्यवहार्यता पडताळून पाहतात. त्यासाठी, तो जितका परिपूर्ण असेल तितका सहज ग्राह्य़ धरला जातो. या साठीच प्रकल्प अहवालात उत्पादनाची माहिती, त्याचे उपयोग, बाजारपेठ, उत्पादनाची बाजारातील किंमत, उत्पादन पद्धत व प्रकल्पाची क्षमता याची माहिती द्यायला हवी. तसेच उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री, त्याचा घसारा, मनुष्यबळ, कायमस्वरूपी गुंतवणूक, खेळते भांडवल, प्रत्यक्ष खर्च व नफा याची माहिती द्यायला हवी. प्रकल्प उभारण्यासाठी जमीन/जागा स्वत:ची आहे, खरेदी करणार की भाडेपट्टय़ाने घेणार यावर त्यांचा खर्च ठरतो.

सीडलेस कलिंगडाचे पराग संवर्धन
बिनबियाची फळे निर्माण करण्यात नव्या तंत्रज्ञानाने मोठे यश मिळवून दिले आहे. कधी-काळी बियांसह असलेली द्राक्षे खाताना बिया टचा-टच दाताखाली फुटायच्या. आता अनेक वर्षांमध्ये सीडलेस द्राक्षे व त्याचे नवे वाण आले. त्याचे उत्पादनही सहज उपलब्ध झाले व बियांची द्राक्षे जणू इतिहासजमा झाली. आजही काही जातींची बियांसह द्राक्षे उपलब्ध असली, तरी बिनबियांच्या द्राक्षांकडेच अधिक कल राहतो. कोकण कृषी विद्यापीठात बिनकोयीचा आंबा तयार करण्यात यश आले. बिनबियाची पपई उपलब्ध झाली. आता बिनबियाचे कलिंगडही अधिक मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जपानमधील एका संशोधन संस्थेने अशा बिनबियाच्या कलिंगडाच्या फुलांचे संयुगीत परागकण किमान वर्षभर टिकवून ठेवता येतील, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. खरे तर पन्नास वर्षांपूर्वीच बिनबियाचे कलिंगड विकसित करण्यात आले होते. मात्र त्याचे संयुगीत परागकण फार काळ टिकवता येत नव्हते.

कोपनहेगन परिषद आणि शेती
हाहा म्हणता ‘ग्लोबल वार्मिग’ भारताच्या दाराशी आले, अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम आधी युरोपला भोगावे लागतील, असे अनुमान होते. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान किमान दोन ते चार अंशांनी वाढलेले असेल. हे तापमान प्राणिसृष्टी, जीवसृष्टीला घातक असणार आहे. पण भारतावर यंदाच दुष्काळाचे सावट पसरले आहे. भले एल निनोचा परिणाम असेल, किंवा कारण काहीही असेल, पण भारतातील पावसाने यंदा सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. संपूर्ण जून कोरडा गेल्यावर पुढे भरपूर पाऊस पडूनही शेतीला फारसा उपयोग नाही. बहुतांश शेती पावसावर अवलंबून असलेल्या या देशाचा प्रमुख खरीपाचा हंगाम गेल्याने त्याचे परिणाम वर्षभराच्या महागाईने सर्वानाच भोगावे लागणार आहेत. त्यातच भरीला भर म्हणून इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने केलेल्या अभ्यासानुसार तापमानवाढीने कृषी उत्पादनांमध्ये प्रचंड घट येण्याची भीती व्यक्त आहे.

जीएम पिके : समज-गैरसमज
येत्या तीन वर्षांत वांगी, टोमॅटो व फ्लॉवर या तीन भाज्यांचे जीएम वाणांचे उत्पादन देशात सुरु होत आहे. जीएम पिकांबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा होतात. याबाबतचे लेख ‘शेतीवाडी’तून देण्याचा प्रयत्न आहे. समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूंना येथे स्थान दिले जाईल. कोल्हापूरच्या बगलेतील कसबा बावडा येथील कृषी खात्याच्या जमिनीत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली एक एकर नवीन मक्यांच्या वाणाचे चाचणी प्रयोगासाठी लागवड केली होती. सदर मका जी.एम. (जेनेटिकली मॉडीफाईड) असून त्याचा मानवी आरोग्याला, पर्यावरणाला धोका असल्याचे आरोप करून ते ताबडतोब उपटून टाकावे, प्रयोग बंद करावे, अशी मागणी करीत काही लोकांनी आंदोलन उभे केले. या आंदोलनाला प्रसार माध्यमांनी प्रसिद्धीही खूप मोठी दिली.