Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

व्यापार - उद्योग

‘सॅमसंग’चा जगातील पहिलाच सौरऊर्जेवर चालणारा मोबाईल
व्यापार प्रतिनिधी : सॅमसंग इंडियाने जगातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा ‘सोलर गुरू’ हा मोबाईल फोन भारतीय बाजारपेठेत सादर केला. या नव्या ‘सोलर गुरू’ (गुरू ई ११०७) हँडसेटची बॅटरी सूर्यप्रकाशात प्रभारित करता येत असल्याने ग्राहकांना त्यासाठी निव्वळ वीजपुरवठय़ावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि वीजपुरवठा न झाल्यास बॅटरी डिस्चार्ज होऊन संपर्क ठप्प होण्याची अडचणही येणार नाही.

कॅमलिनच्या नफ्यात ८७ टक्के वाढ; ३० टक्के लाभांश
व्यापार प्रतिनिधी : कॅमलिन लिमिटेड या कंपनीने आपली प्रगती पुढे चालू ठेवली असून गेल्या वर्षांच्या संबंधित तिमाहीच्या (एप्रिल ते जून ०८) रु. ८५६६.२१ लाखांच्या तुलनेत या वर्षी तिमाही-१ (एप्रिल ते जून ०९) मध्ये विक्री रु. १०५८८.०३ लाख नोंदवून २३.६०% एवढी सशक्त वाढ केली आहे.

ग्रामीण भागातील जनतेसाठी महाराष्ट्र बँकेची विशेष योजना
व्यापार प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र बँकेने विशेष योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत पुणे, ठाणे, अमरावती व नागपूर येथील ग्रामीण भागात मोबाईल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या गावात बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशातील पहिल्या बीओटी तत्त्वावरील सहवीज प्रकल्पाची उभारणी
व्यापार प्रतिनिधी : श्री रेणुका शुगर्स लिमिटेड या साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनीतर्फे इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे बगॅसवर आधारित ३० मेगाव्ॉट सहवीज प्रकल्प उभारणीची सुरुवात करण्यात आली आहे.

‘आयडिया’ आणि ‘बाबाजॉब’ यांचे घरगडी, ड्रायव्हर यांच्यासाठी जॉब पोर्टल
व्यापार प्रतिनिधी : आयडिया सेल्युलर आणि बाबाजॉब डॉट कॉम (babajob.com) यांनी भारतीय भाषांमध्ये नोकरीशोध घेणारे मोबाइल जॉब पोर्टल सुरू केले आहे. भारतात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या जॉब पोर्टलच्या माध्यमातून ड्रायव्हर, घरगडी, घरसफाई कामगार, अशा प्रकारच्या अनौपचारिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना नोकरी शोधणे सोपे जाणार आहे तसेच काम देऊ इच्छिणाऱ्या लोकांना योग्य उमेदवार शोधणे सोपे होणार आहे.

प्रवीण मसालवाले उद्योगसमूहाचे बचतगटांशी विपणनविषयक सहकार्य
व्यापार प्रतिनिधी : उद्योग संस्था व महिला बचतगटातील सहकार्याचे पहिल उदाहरण ठरलल्या उपक्रमामध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध प्रवीण मसालवाल उद्योगसमूहाने तिकोणा स्वयंसेवी ग्रुपने उत्पादित केलल्या हातसडीच्या आंबेमोहोर तांदळाच्या विपणनासाठी तिकोणा स्वयंसेवी समूहाशी सहकार्य केल आहे. सदर तांदूळ सुहाना ब्रँडखाली बाजारात वितरित करण्यात येणार आहे.

विश्वनाथन यांची नियुक्ती
व्यापार प्रतिनिधी : एस. विश्वनाथन यांनी एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदांचा कार्यभार स्वीकारला आहे. एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही भारतीय स्टेट बँकेची इनव्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी उपकंपनी आहे. विश्वनाथन या कंपनीच्या व्यवसाय प्रचालन, व्यवसाय धोरण आखणी, विपणन अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळणार आहेत. एस. विश्वनाथन यांनी हे पद स्वीकारण्यापूर्वी ते भारतीय स्टेट बँकेच्या ईशान्य भारत विभागाच्या मुख्य महासंचालक पदावर रूजू होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेत १९७६ सालापासून प्रोबेशनरी ऑफिसर पदापासून आपल्या कारकि र्दीस सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी या बँकेत विविध पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. त्यात न्यूयॉर्क शाखेच्या प्रमुखपदाचाही समावेश आहे. देशी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ट्रेझरी व ग्लोबल मार्केट अशा दोन्ही क्षेत्रातील त्यांचा अनुभव वादातीत आहे. महाव्यवस्थापक या नात्याने भारतीय स्टेट बँकेच्या विविध उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी त्यांनी मौलिक कामगिरी बजावली आहे.

सॅमसंग ‘जेट’ व ‘मरिन’ मोबाईल बाजारात
व्यापार प्रतिनिधी : सर्वात प्रगत ‘सॅमसंग जेट’ आणि ‘सॅमसंग मरिन’ हा मोबाईल भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. हे दोन्ही फोन अत्याधुनिक वैशिष्टय़ांनी युक्त आहेत. ‘सॅमसंग जेट’ या टचस्क्रीन मोबाईल स्मार्टफोनची किंमत २४,१५० रुपये, तर ‘सॅमसंग मरिन’ची किंमत ७०३० रुपये आहे, असे सॅमसंग मोबाईल डिव्हिजनचे विभागीय प्रमुख सुनील दत्त यांनी सांगितले.
‘सॅमसंग जेट’मध्ये सध्याच्या मल्टी-टास्क मॅनेजर व मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंज अ‍ॅक्टिव्ह सिंक या प्रगत सुविधा आहेत. याचबरोबर सुटसुटीत टचविझ दोन हा यूजर इंटरफेसही आहे. त्यामुळे मोशन यूआय, स्मार्ट अनलॉक, विडगेट स्क्रीन अशी नवी वैशिष्टय़े प्राप्त करता येतात. यातील अधिक सुसूत्रित अशी पुश ई-मेल सुविधा विशेषत: व्यावसायिकांना अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्या १६ एम. डब्ल्यूव्हीजीए अ‍ॅमोलेड डिस्प्लेमुळे (३.१ इंची) नेहमीच्या डब्ल्यूक्यूव्हीजीए स्क्रीनच्या चौपट अधिक रिझोल्युशनची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. ८०० मेगाहर्ट्झ अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसरमुळे हा फोन कमालीचा वेगवान ठरला आहे. सॅमसंग मरिन हा कंपनीने सादर केलेला पहिला आऊटडोअर फोन आहे. अत्यंत दणकट व टिकाऊ डिझाईन असणारा हा फोन स्टायलिश आहे.

जिओजित टेक्नॉलॉजिस
व्यापार प्रतिनिधी: जिओजित टेक्नॉलॉजिस प्रा. लि. ही जिओजित बीएनपी पॅरिबस फिनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लि.ची उपकंपनी असून कॉन्सेप्चुअलायजिंग, डिझायनिंग व इम्प्लिमेंटिंग एंड-टू-एंड बिझनेस सोल्यूशन्स यामध्ये कार्यरत आहे. कंपनीला केपीएमजीकडून कार्नेज मेलन्स सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूटचे (एसईआय) कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन (सीएमएमआय) मॅच्युरिटी लेव्हल ३ प्रमाणपत्र मिळाले आहे. जिओजित टेक्नॉलॉजिस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक ए. बाळकृष्णन म्हणाले की, सीएमएमआयचे मॅच्युरिटी लेव्हल ३ प्रमाणपत्र म्हणजे ग्राहकांना सतत दर्जेदार उत्पादने व सेवा देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे. आम्ही कंपनीमध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे आणि सातत्याने आमच्या कामात सक्षमता आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशन (सीएमएमआय) हा आपल्या प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करणारा दृष्टिकोन आहे त्यामुळे कंपन्यांना प्रभावी काम करण्यासाठी आवश्यक असलेले घटक मिळतात.

आयसीआरआयची क्लिनिकल रिसर्च शिष्यवृत्ती
व्यापार प्रतिनिधी: देशातील महत्त्वपूर्ण क्लिनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ क्लिनिकल रिसर्च (इंडिया) च्या वतीने संशोधन व उच्च दर्जाच्या क्लिनिकल रिसर्च शिक्षणाला चालना मिळावी या हेतूने क्लिनिकल रिसर्चच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उज्ज्वल, आश्वासक व यशस्वी भविष्याला चालना देण्याच्या हेतूने शिष्यवृत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारच्या पहिल्याच प्रयत्नात आयसीआरआयच्या वतीने असे व्यासपीठ खुले करून दिले जात आहे जेथे मुले या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. निवड चाचणी, हुशारी, ज्ञान व आवड यांच्या आधारे पुढे जाऊ शकतील व क्लिनिकल रिसर्चमध्ये पदवी/ पदविका करण्यासाठी पूर्णत: शिष्यवृत्ती मिळवू शकतील. स्पर्धेदरम्यान अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या क्विझ व अ‍ॅक्टिव्हिटींना तोंड द्यावे लागेल. उद्योगव्यवसायातील तज्ज्ञ येथे उपस्थित असतील व आयसीआरआय विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे परीक्षण करेल. इच्छुक विद्यार्थी सीएनएन आयबीएन वेबसाइटवर लॉग ऑन करून (www.ibnlive.com/ avivayoungschloar) येथे नोंदणी करू शकतात.

महाबँक क्रेडिट सोसायटीला ५.८१ कोटींचा नफा; १४ टक्के लाभांश
व्यापार प्रतिनिधी : महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने २००८-०९ या आíथक वर्षांत पाच कोटी ८१ लाखांचा भरघोस निव्वळ नफा मिळविला आहे. सोसायटीने या वर्षी सभासदांना १४ टक्के लाभांश दिला आहे. सोसायटीच्या ५७व्या वार्षकि सर्वसाधारण सभेत सोसायटीचे चिटणीस राम बांगड यांनी या वर्षीचा अहवाल व ताळेबंद सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीच्या संचालिका मनीषा घाटे या होत्या. सोसायटीच्या प्रगतीविषयी माहिती देताना बांगड म्हणाले की, सोसायटीचे १० हजार ८०४ सभासद असून एकूण ठेवी १८ कोटी ४० लाख रुपयांच्या आहेत. एकूण ६७ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आल आहे. भागभांडवल २५ कोटी ८० लाख रुपयांचे असून १३ कोटी ८४ लाख रुपयांची गुंतवणूक सोसायटीने केली आहे.