Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

तलत आणि शमशादच्या आवाजाची जादू..
रफी, मुकेश आणि किशोर यांच्याप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत जबरदस्त कर्तृत्व गाजविणारे गायक म्हणजे तलत मेहमूद आणि मन्ना डे..तलतचा आवाज मधाळ, मखमली, रेशीम स्पर्शी तर मन्ना डेचा खुला, तयार आणि भारदस्त..दोन्ही गुणी गायक असूनही त्यांचे दुर्दैव म्हणजे त्यांना आघाडीचे नायक मिळाले नाहीत. दिलीपकुमारला रफी, मुकेशला राज कपूर आणि किशोरला राजेश खन्ना हे जसे हिरो मिळाले तसे पक्के हिरो यांना मिळाले नाहीत.

टेलिस्कोप
सुनील नांदगावकर
‘सच का सामना’मध्ये विनोद कांबळी आणि उर्वशी ढोलकिया

स्टार प्लसवर सुरू झालेल्या ‘सच का सामना’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सोमवारी क्रिकेटपटू विनोद कांबळी आला. आता आज, मंगळवारीही आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर ‘सच का सामना’मधील प्रश्नांची उत्तरे देणार आहे. अलीकडेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आपले गुरू रमाकांत आचरेकर यांच्या सत्कारप्रसंगी एका मंचावर आले होते. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीविषयी प्रश्न विचारला जाणार आहे.