Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

‘मेघदूत’चा हवामानशास्त्रीय रसास्वाद
एकविसाव्या शतकातील युवा पिढी नोवेलच्या वाचनापेक्षा, त्या नोबेलचं दृश्यरूप पाहण्यास जास्त पसंती दर्शविते. त्यामुळेच ‘हॅरी पॉटर’च्या नोवेलच्या तुलनेत त्यावर चित्रित झालेल्या चित्रपटांना जास्त पसंती मिळते. आजच्या या प्रगत काळात अभ्यासक्रमसुद्धा दृक्श्राव्य (ऑडिओ- व्हीजवल) रूपात आणला जात आहे. त्यात जर ते एखाद् साहित्य असेल तर ते आजच्या तरुणांच्या नजरेस पडणे कठीणच, पण ते दृक् -श्राय रूपात असेल तर त्याला तरुणांची पसंती मिळणे साहजिकच.

एनएसएस कॅडेटस्ची अभिनव कामगिरी
अनेक कॉलेजमधील एनएसएस विंग कार्यरत असतात, पण के. सी. कॉलेजमधील एनएसएस विंगकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. २००५ पासून एनएसएसच्या कॅडेटस्नी सफाळेमधील ‘करवाले’ हे गाव दत्तक घेतले आहे. के. सी. कॉलेजमधील एनएसएस को-ऑर्डिनेटर डॉ. कोलते म्हणाले की, ‘‘गेल्या पाच वर्षांपासून आम्ही करवाले गावात अनेक मोहिमा राबवीत आहोत आणि सर्व कॅडेटस् त्यात आनंदाने सहभागी होतात.’’ ते पुढे असंही म्हणाले की, करवाले गावात मुख्यत: आम्ही स्वच्छता अभियान राबवितो. या प्रकल्पांतर्गत आम्ही या गावात १५ शौचालये बांधली आहेत.

पीजीज् अ‍ॅण्ड हॉस्टेलाईट्स
दहावी, बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. आता प्रत्येकाला ओढ लागली आहे ती कॉलेजची. आपण एखाद्या चांगल्या मोठय़ा कॉलेजमध्ये जावं असं प्रत्येकाला वाटतं आणि अशी बरीचशी कॉलेजेस मुंबईत असल्याने साहजिकच विविध ठिकाणांहून विद्यार्थी मुंबईकडे धाव घेतात. फक्त उपनगरांमधूनच नाही तर भारतातील ठिकठिकाणांहून विद्यार्थी मुंबईत शिकायला येतात. बाहेरून मुंबईत शिकायला येणाऱ्या प्रत्येकाचे नातेवाईक इथे असतात असं नाही. मग ही मुलं पेईंग गेस्ट म्हणून किंवा हॉस्टेलवर आपला मुक्काम ठोकतात.

सेव्ह अवर टीचर्स
सध्या चालू असणाऱ्या शिक्षकांच्या संपामुळे बहुतेक सर्व कॉलेजियन्स मजेत आहेत. ही अघोषित सुट्टी सगळेजण एन्जॉय करून घेतायत. आपल्या शिक्षकांचा संप नक्की कशासाठी आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे आपल्याला काय तोटे होणार आहेत. ‘छोडो यार! मारो गोली.. लेक्चर्स नाहीत, अटेंडन्स नाही, धमाल करो..!!’ असा बहुतेकांचा अ‍ॅटिटय़ूड आहे.

स्ट्रगलर्स अ‍ॅण्ड अचिव्हर्स
निसर्गमित्र

आपल्या छंदाचं रुपांतर करिअरमध्ये करायची फार कमी लोकांना संधी मिळते. ज्यांना ती मिळते त्यांना संधीचं सोनं करता येतं आणि राजेश सानपला आता अशीच संधी खुणावतेय. आठवीत शिकत असल्यापासून निसर्गाची आवड त्याच्या मनात रुजली. जीएनएचएसच्या माध्यमातून प्राणी, पक्षी, वनस्पती, जंगलं यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची सवय लागली आणि आता वन्यजीव छायाचित्रणाचं क्षेत्र त्याला खुणावतंय.

शिक्षकांचा संप: मजा की सजा?
सध्या सर्व कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे- ती म्हणजे प्राध्यापकांचा संप! सर्व कॉलेज प्राध्यापकांनी आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवडय़ाभरापासून सर्व प्राध्यापक बेमुदत संपावर गेले आहेत. सुरुवातीला ही कल्पना सर्वाना सुखद वाटली पण आता प्राध्यापकांशिवाय कॉलेज सुनं-सुनं वाटू लागलं आहे, पण हा संप केवळ कायमस्वरूपी प्राध्यापकांचाच आहे.

पावसाळी फॅशन मॅनिया
कॉलेज सुरू होतं नेमकं पावसाळ्यात. कॉलेजचं नवीन वर्ष म्हटलं की नवीन कपडे आलेच. पण पावसाळा सुरू असल्याने नवीन कपडेही पावसाळ्यात उपयोगी असेच घ्यावे लागतात. तर फ्रेण्डस्, काय आहे आजची पावसाळी फॅशन? काय दिसतं आपल्याला, सध्या दुकानांमध्ये? कोणते कपडे घालणे प्रेफर करतात आजचे यंगस्टर्स पावसाळ्यात? पावसाळा म्हटला की भिजणं आलंच, मग तुम्ही छत्री घ्या किंवा विंडचिटर घाला.

दिल से..
प्रिय सावनी

ट्रेकचे फोटो पाहिले, फार छान आहेत. पण ते पाहताना राहून राहून वाटत होतं आपण या फोटोत का नाही आहोत. If I am not wrong गेली सलग आठ वर्षे न चुकता दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक वीकएन्डला नवीन गडावर अथवा जंगलाची सफर ठरलेली होती. शहरातल्या प्रदूषणापासून दूर जाऊन निसर्गाच्या सहवासात काही काळ मनसोक्त घालवण्याचा तो एक नित्यक्रम ठरलेला होता. असो. अनीशबद्दलचा किस्सा ऐकून खरं तर मला बरं वाटलं.


अमेय गावडे, रुईया महाविद्यालय

कॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमें हैं वह बात? तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो! फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.