Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

प्रादेशिक


कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात दूषित पाणीपुरवठय़ामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरचे पाणी घेण्यासाठी सोमवारी येथे अशी रांग लागली होती. जुन्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होऊन या वस्तीत साथीचे आजार फैलावत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सोमवारी पालिका अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली. (छाया : प्रशांत नाडकर )

महागाईचा निर्देशांक उणे, मात्र भाववाढ वर्षभरात दुपटीवर
जनसामान्यांपुढे ‘टंचाई’च्या संकटाची भीती

सचिन रोहेकर, मुंबई, २0 जुलै

चालू वर्षांच्या फेब्रुवारीपासून महागाईचा दर अर्थात घाऊक किंमत निर्देशांक घसरणीला लागून प्रत्यक्षात उणे झाला असला तरी प्रत्यक्षात अन्नधान्य, कडधान्य-डाळी, साखर, भाजीपाला, खाद्यतेल अशा जनसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या भाववाढीने याच महिन्यांनंतर हळूहळू वेग पकडला. गेल्या वर्षांतील जूनअखेरचा भाव आणि आजचा भाव बहुतांश दुपटीने वाढला असून, तुटीच्या मान्सूनमुळे खरीप हंगामातील उत्पादन बेताचेच राहण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ, कमॉडिटी बाजारातील सट्टा, साठेबाजी वगैरे कारणांमुळे अन्नधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील आणि धान्य-टंचाईजनसामान्यांच्या शक्यता वर्तविली जात आहे.

नाल्यावरील झोपडीच्या फोटोपासची विक्री फक्त ४५ लाखांना!






मुंबई, २० जुलै/प्रतिनिधी

जय संतोषी माता नगर, विलेपार्ले (प.) येथे इर्ला नाल्यावरील १२३ फूट बाय ३६ फूट आकाराच्या एका अनधिकृत बांधकामाचा फोटोपास १० वर्षांपूर्वी तब्बल ४५ लाख रुपयांना विकला गेल्याचे मुंबई उच्च न्यायालयापुढील एका प्रकरणाच्या सुनावणीत आज उघड झाले. तळमजला व मॅझेनिन फ्लोर अशा स्वरूपाच्या १७ फूट उंचीच्या या बांधकामात पी.ए. ऑटो गॅरेज चालविले जात असे.

कसाबचा कबुलीजबाब स्वेच्छेने? शहानिशेनंतरच चित्र स्पष्ट होणार
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने आज विशेष न्यायालयात अचानक व अनपेक्षितपणे गुन्ह्याची कबुली दिली व सर्व घटनाक्रमांच्या तपशीलाचा न्यायाधीशांसमोर पाढा वाचला. कसाबने कबुली दिली म्हणजे आता त्याच्याविरुद्धचा खटलाही संपला, असे चित्र त्याच्या कबुलीजबाबाने निर्माण केले. मात्र काही कायदेपंडितांच्यामते कसाबने केवळ गुन्ह्याची कबुली दिली म्हणजे सर्व संपले असे नाही, तर कसाबने स्वेच्छेने गुन्हा कबूल केला आहे का याची शहानिशा आता न्यायालयाला करावी लागेल आणि त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

‘हाँ.. मैं गुनाहगार हू'
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
कसाबच्या खटल्याची आजची सुनावणी नेहमीप्रमाणे सव्वाअकराच्या सुमारास सुरू झाली. शहीद झालेले पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासोबत २६/११च्या रात्री त्यांच्या गाडीतून दहशतवाद्यांच्या मागावर गेलेले अरुण जाधव यांची महत्त्वपूर्ण साक्ष होणार होती. साडेअकराच्या सुमारास कसाबला न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावले.


भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निषेध करुन निदर्शने केली. पाकिस्तानबरोबर सुरू असलेली सर्व चर्चा तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी ‘भाजप’ने यावेळी केली. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान योग्य ती पावले उचलत नाही तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारची बोलणी करू नयेत, असे ‘भाजप’कडून सांगण्यात आले. (छायाचित्र-प्रशांत नाडकर)

मुंबईतील पाणी टंचाईची राज्यपालांकडून दखल
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने तसेच मुंबईत करण्यात आलेल्या पाणीकपातीची दखल राज्यपाल एस. सी. जमीर यांनी घेतली आहे. पाणीपुरवठय़ाबाबतची सद्य स्थिती काय आहे, याची विचारणा त्यांनी एका पत्राद्वारे पालिका महापालिकाआयुक्त डॉ. जयराज फाटक यांच्याकडे केली आहे. जवळपास दीड महिन्यापासून मुंबईत पाणीकपात सुरू आहे. अजून काही दिवस पाणीकपात सुरूच राहणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिका प्रशासन अनेक उपाय योजना करीत आहे. मुंबईतील पाणी टंचाईचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. आता राज्यपाल जमीर यांनी या प्रकरणी आपली चिंता व्यक्त केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची सद्य स्थिती काय आहे, पालिका प्रशासन समन्यायी पाणी वाटप करीत आहे की नाही, अशी विचारणा राज्यपालांनी केली आहे.दरम्यान, प्रशासनाकडून राज्यपालांच्या पत्राला उत्तर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी ‘ लोकसत्ता’ला दिली.

सातारा जिल्ह्य़ात धान्याच्या १७८ गोदामांवर छापे
सातारा, २० जुलै/प्रतिनिधी

सातारा जिल्हा प्रशासनाने साठेबाजीद्वारे कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामांवर धाडी टाकण्याची जोरदार मोहीम उघडली असून, जिल्ह्य़ात एकूण १७८ गोदामांवर धाडी टाकून १७ हजार क्विंटलच्यावर अन्नधान्य, साखर, तेलाचा अतिरिक्त साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी दिली. या धाडींमध्ये अतिरिक्त साठा करण्यात आलेल्या गोदामांना तसेच धान्याने भरून माल घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना सील ठोकण्यात आले आहे. एकूण धाडींमध्ये सातारा शहरात १९, कोरेगावात २६, जावळीत १२, कराड ९, पाटण, २२, फलटण १७, वडूज १२, माण ३१, वाई १०, खंडाळा १, महाबळेश्वर १९ गोदामांचा समावेश आहे.