Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

‘नॅनोधीश’ अशोक विचारे यांची इच्छा
गणपतीला कोकणात ‘नॅनो’ने जाणार!

रवींद्र बिवलकर

टाटा मोटर्सचे प्रमुख रतन टाटा यांच्या स्वप्नातील नॅनो प्रत्यक्षात अवतरली आणि मुंबईकर अशोक विचारे आणि त्यांचे कुटुंबीय शुक्रवारी जगभरात प्रसिद्ध झाले. टाटांची पहिली नॅनो मोटार मुंबईकर अशोक विचारे यांना मिळाली व एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे विचारे कुटुंबीयांना देशातीलच नव्हे तर परदेशातीलही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली..

‘ऑनलाइन’मुळे अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या गैरप्रकाराला चाप
तुषार खरात

मुंबईमध्ये अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या सुळसुळाट झाला आहे. भाषक व धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालविण्यात येत असलेल्या बहुतांशी संस्था प्रत्यक्षात गैरप्रकारांमध्ये आघाडीवर असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कोटय़ातून बिगरअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जबर देणगी आकारून प्रवेश देण्यात येतो. परंतु, यंदा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशामुळे या गैरप्रकाराला आळा घालण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.

‘ईगल इज लॅन्डेड!’
सतीश चाफेकर

होय हे शब्द मी प्रत्यक्ष ऐकले, बघितले याची देही याची डोळा. काही वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँग मुंबईत येणार असे कळले. तेव्हापासून फिल्डिंग लावली होती. कसेही करून नील आर्मस्ट्राँगला गाठायचं. एका वृत्तपत्रात साधी बातमी आली. आज नील आर्मस्ट्राँग यांचे मुंबईत भाषण आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला, ते कुठे कसे कळणार?मोबाईल व इंटरनेटचे पीक त्यावेळी इतके फोफावले नव्हते.

चार्जशीट
निशांत सरवणकर
सारे काही पैशासाठी..

टय़ूशनसाठी गेलेला सात वर्षांचा चुणचुणीत साईल घरी परतला नाही तेव्हा त्याची आई मनिषाच्या काळजात चर्र झालं. परंतु तो निश्चित सापडेल अशी आशा तिला होती. दररोज ती न चुकता पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारायची, मंदिरात जायची. तासन्तास देवापुढे आर्जवं करायची.