Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

ग्लोबल वॉर्मिगविरोधात ठाणेकर तरुणाची सायकलसफर..
ठाणे/ प्रतिनिधी- ठाण्यातील राजेश खांडेकर या युवकाने ग्लोबल वॉर्मिग संदर्भात जनजागृती करण्यासाठी सायकलवरून जगाची सफर करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या आठवडय़ात राजेश या मोहिमेसाठी रवाना झाला. २८६ दिवसांच्या या मोहिमेत राजेश एकूण २२ हजार २२८ किलोमीटर अंतर पार करणार आहे. चीन, जपान, कोरिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, ग्रीक, हॉलंड, इजिप्त आदी देशांमध्ये तो यानिमित्ताने जाणार आहे.

बनावट दस्त नोंदणीने ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपण्याचा प्रयत्न
ठाणे/प्रतिनिधी

बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याआधारे एका सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्याची शहापूर तालुक्यातील वडिलोपार्जित जमीन हडप करण्याचा प्रयत्न मुंबईतील एका विकासकाने केल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असून, याप्रकरणी न्याय मिळावा, अशी विनंती या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. मात्र निवेदन देऊन एक वर्ष होत आले, तरी याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.

सुस्त लोकप्रतिनिधींच्या कुशीत आणि अजगरी विळख्यात
अजून नाही सरल्या आशा..

भगवान मंडलिक

२६ जुलैच्या महापुराने कल्याण, उल्हासनगर परिसराला जो फटका दिला, तेव्हापासून या दोन्ही शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचा विकास करावा, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा म्हणून हालचाली सुरू झाल्या. २००५ पासून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महासभेने वालधुनी नदीचा विकास करणे, या नदीचे विकास आराखडा तयार करणे या विषयावर चर्चा करून शासनाला ठराव पाठविले आहेत. वालधुनी विकास प्रश्नधिकरण स्थापन करून मिठी नदीप्रमाणे वालधुनी नदीचा विकास करावा म्हणून गेली चार वर्षे आणि त्या आधीपासून लोकप्रतिनिधी, या भागातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

२१ वाहनांसह टोळी जेरबंद ; ठाण्यासह मुंबईतील १४ घरफोडय़ा उघड
ठाणे/प्रतिनिधी

वाहन चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी जुन्या वाहनांचे विक्रेते आणि गॅरेजवर विशेष लक्ष केंद्रित केल्यानंतर भिवंडीतील दोन गॅरेज मालकांसह चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. त्यांच्याकडून भिवंडी आणि कल्याणमधील ११ गुन्हांतील २१ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.

ठाण्याच्या गटारातून वाहते २२३ कोटींच्या भ्रष्टाचाराचे पाणी
ठाणे/ प्रतिनिधी- ठाणे महापालिकेतील सुलभ शौचालय घोटाळ्यानंतर भुयारी गटार योजनेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. या योजनेत केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीपेक्षा ठाणे महापालिकेने तब्बल २२३ कोटी अतिरिक्त रकमेच्या निविदा मंजूर केल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी दबावगट हवा- सुधीर जोगळेकर
प्रतिनिधी
राज्यातील शैक्षणिक धोरणाबाबत सरकार अजिबात ठाम नाही. सतत बदलत जाणाऱ्या सरकारच्या भूमिकेमुळे या क्षेत्रात कमालीच्या गोंधळाचे आणि विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने समाजावर त्याचे दूरगामी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्था, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञांनी एकत्र येऊन शैक्षणिक चांगले बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी आज मुलुंड येथील कार्यक्रमात बोलताना केले.

कामगारांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
भिवंडी/वार्ताहर

अंबाडी वाईन्समध्ये गुदमरून मृत्यू पावलेल्या तिघा कामगारांचा झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून, या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव यांनी केली आहे. या दारूच्या दुकानात चार दिवसांपूर्वी साईनाथ पाटील (२२) विनोद सोननामे (२३) व शैलेश केदार (२५) या कामगारांचा जनरेटरच्या धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या राहत्या घरातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याचे सांगून ते दुकानात जनरेटर लावून झोपी गेले होते. मात्र एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी वाईन्सचे मालक अशोक गंगवानी व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या घटनेप्रकरणी गणेशपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.