Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

उद्योगांच्या घोषणांचा पाऊस फलदायी ठरेल काय?
न.मा.जोशी, यवतमाळ, २० जुलै

निवडणुका जवळ आल्या म्हणजे उद्योग आणि विकास प्रकल्पांच्या घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम दरवेळी न चुकता सरकार करीत असते. नंतर त्या ‘पावसाचे’ काय झाले हे विचारणारा मतदार जागरूक नसतो, हेही सरकारला ठाऊक असते. त्यामुळे स्वत:हून काय झाले? या प्रश्नाचे उत्तर देण्याची तसदी ‘पाऊस पाडणारे’ घेत नसतात. यंदा सुद्धा यवतमाळ जिल्ह्य़ात नुकताच असा उद्योगाच्या घोषणांचा ‘मुसळधार पाऊस’ पडला आहे. अंबानी यांच्या ‘रिलायन्स सिमेंटेशन मर्यादित’ या कंपनीतर्फे यवतमाळात दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा ‘सिमेंट प्रकल्प’ सुरू होणार, अशी घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

राजकारणासोबत समाजसेवा
वामन तुरिले

लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेल्या नाना पटोले यांनी लोकांच्या प्रश्नांवर सत्ताधारी काँग्रेसशी अनेकदा दोन हात केले. अखेर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच राजीनामा देऊन ते सत्तापक्षातून बाहेर पडले. जागरूक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. नाना पटोले राजकारणी असले तरी त्यांचा मूळ पिंड समाजसेवकाचा आहे. छावा व ओबीसी संग्राम परिषदेच्या माध्यमातून सामूहिक लग्नकार्ये, रक्तदान चळवळ, अंध-अपंगांच्या सेवेसाठी अनेक चळवळी त्यांनी उभारल्या. भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ातील युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे याकरिता आय.ए.एस., आय.पी.एस. स्पर्धा परीक्षांचे वर्ग उपलब्ध करून दिले. २००७ मध्ये पोलीस निवड पूर्व प्रशिक्षण शिबिरात ५०० युवक-युवतींना मार्गदर्शनाची व्यवस्था करून दिली. त्यापैकी ९० नोकरीला लागले.

विदर्भाच्या बहुतांशी भागात सरासरीइतका पाऊस ; तालुके पावसाच्या प्रतीक्षेत
अमरावती, २० जुलै / प्रतिनिधी

विदर्भाच्या बहुतांशी भागात सरासरीएवढा पाऊस झाल्यामुळे पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. विदर्भात ७५ टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी पश्चिम विदर्भात काही तालुक्यांमध्ये दमदार पावसाची आवश्यकता आहे. पूर्व विदर्भावर पावसाची मेहरनजर असून या आठवडय़ात सर्वच जिल्ह्य़ांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याने येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अमरावती विभागात गेल्या वीस दिवसांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी विभागातील केवळ २४ तालुक्यांनी जुलैच्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. इतर तालुके अजूनही सरासरीच्या खालीच आहेत. विभागात बहुतांश तालुके अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चोवीस तासात विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक १५ मिलीमीटर पाऊस बुलढाणा जिल्ह्यात झाला.

निळू फुलेंना ओबीसी संघटनेची श्रद्धांजली
ब्रह्मपुरी, २० जुलै / वार्ताहर

सिनेकलावंत व सामाजिक बांधिलकी आयुष्यभर जोपासणारे निळू फुले यांना चंद्रपूर जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य डॉ. एन.एस. कोकोडे होतो. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रश्नचार्य श्याम झाडे, प्रश्न. नामदेव जेंगठे, प्रश्न. विजय मुडे, प्रश्न. धनंजय गहाणे उपस्थित होते.

भंडाऱ्यात सामाजिक न्याय भवनाचे भूमिपूजन
भंडारा, २० जुलै / वार्ताहर

येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या ४ कोटी ६२ लाख २२ हजार २०० रुपयाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन भैयालाल भोतमांगे यांनी कोनशिलेची फीत कापून केले. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते.

नांदा व पोटेवाडा तलाव तुडुंब
सावनेर, २० जुलै / वार्ताहर

तालुक्यातील नांदा व पोटेवाडा तलाव तुडुंब भरले असून सांडव्यातून पाणी सोडले जात आहे. इतर तलावात मात्र ५० टक्केच साठा आहे.

शेंदूरजनाघाटातील शेतकऱ्यांना धनादेश वाटप
शेंदूरजनाघाट, २० जुलै/ वार्ताहर
संत्रा उत्पादकांना मृग बहार न फुटल्याने आर्थिक फटका बसला. त्याची प्रति हेक्टर १० हजार रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धनादेश वाटप मंडल कृषी अधिकारी वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक योगेंद्र संगेकर, कृषी सहाय्यक प्रदीप टेकाडे, महादेव वाघमारे, नितीन बारमासे यांनी तिवसा घाट केंद्रावर सुरूकेली आहे. सातनूर शेंदुरजनाघाट मालखेड, रवाळा, तिवसाघाट, पुसली, खेडी, जामतळ, मलकापूर, हुम्मन पेठ, वाई (बु), आंतरखोप, पिंपळशेंडा, सटामाझिरी व दायवाडी अशा १५ गावांतील शेतकऱ्यांना १ कोटी ४० लक्ष रुपये धनादेशाद्वारे वाटण्यात आले.धनादेश दुसऱ्या शेतकऱ्यांजवळ जाणार नाही. यासाठी ओळख पटविल्यानंतरच या शेतकऱ्यांचा धनादेश देण्यात आले.

जिल्हा महिला सचिवपदी मीना तायवाडे
कळमेश्वर, २० जुलै/ वार्ताहर

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर जिल्हा महिला आघाडीच्या सचिवपदी मीना तायवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. मीना तायवाडे यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वागत केले. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

पराग महेशकरचा सत्कार
चंद्रपूर २० जुलै/प्रतिनिधी

आदिवासी अधिकारी समितीतर्फे गुणवंत पराग राजकुमार महेशकर याचा सत्कार करण्यात आला. पराग महेशकर बारावी सायन्समध्ये ८९.६७ टक्के प्रश्नप्त केले आहे. तसेच पीएमटी परीक्षेत १८० गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल अतिरिक्त जिल्हा अधिकारी एन.बी. वटी, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, उपअभियंता राजेश वटे, प्रश्न. संतोष आडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

घाटे व खाडे सन्मानित
कारंजा-लाड, २० जुलै / वार्ताहर

राज्यस्तरीय कलादालन स्पर्धेत कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले, तर मुख्याध्यापक जी.ए. घाटे यांना उपक्रमी मुख्याध्यापक म्हणून व गोपाल खाडे यांना उपक्रमकर्ता कलाध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले. गेल्या सत्रात राज्यस्तरीय कलादालनाच्या विविध स्पर्धेत कामरगावच्या जिल्हा परिषद विद्यालयाच्या १२५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी या स्पर्धेत विशाखा गावंडे, पायाल गावंडे, कल्याणी ढोरे व शिवम् पुरोहित यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्याध्यापक जी.ए. घाटे आणि शिक्षक गोपाल खाडे यांनी ग्रामीण भागात कला विषयक सुप्त गुण विकसित केल्याबद्दल मुख्याध्यापक जी.ए. घाटे यांना उपक्रमी मुख्याध्यापक म्हणून आणि गोपाल खाडे यांना उपक्रमकर्ता कलाध्यापक म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रशंसनीय संस्थेचा पुरस्कार मुख्याध्यापक एम.सी. गोमासे यांनी स्वीकारला. कामरगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी व गुरुजनांना लाभलेल्या या सन्मानाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रदेश काँग्रेसची संपर्क मोहीम यात्रा गुरुवारी चिखलीत
चिखली, २० जुलै/ वार्ताहर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यभर सुरू करण्यात आलेली संपर्क मोहीम यात्रा २३ जुलैला शहरात प्रवेश करणार असल्याचे बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती या यात्रेचे वैशिष्टय़ राहणार असून त्यांच्यासोबत राज्य पातळीवरील नेत्यांची हजेरी लागणार आहे. स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मते प्रदेशाध्यक्ष जाणून घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात चिखलीनंतर ही यात्रा खामगाव मार्गे नागपूर येथे जाऊन तिथे समारोप होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बोंद्रे व लक्ष्मण घुमरे, नगराध्यक्ष मोहम्मद सलीम, जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र खेडेकर, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यावेळी उपस्थित होते.

नवसारीच्या नगराध्यक्षाचा आमदार सानंदाच्या हस्ते सत्कार
खामगाव, २० जुलै / वार्ताहर

गुजरात राज्याच्या सुरत जिल्ह्य़ातील नवसारी नगरपालिकेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मीना राजू मांगले खामगाव येथे आल्या असता १५ जुलैला जनसंपर्क कार्यालयात त्यांचा विकाससूर्य आमदार दिलीप सानंदा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व तिरंगा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. खामगावच्या नगरसेविका सरस्वती खासने यांनीसुद्धा नवसारीच्या नगराध्यक्षा मीना राजू मांगले यांचे तिरंगा दुपट्टा देऊन व पेढा भरवून स्वागत केले. याप्रसंगी रामविजय बुरूंगले, सुरेश वनारे, पुंडलिक पारस्कार, विजय काटोले, संतोष टाले, अवधूत टिकार, राजेश शर्मा, गोटू देशमुख, किशोर राजपूत, शिवा राजपूत, मुक्तार ठेकेदार, विजया चव्हाण आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सरस्वती विद्यालयात वृक्षारोपण
मेहकर, २० जुलै/ वार्ताहर

जानेफळ येथील सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात उपप्रश्नचार्य दौ.रा. डव्हळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शरद मिटकरी होते तर संस्थेचे सचिव श्रीराम डोमळे, संचालक गजानन अप्पा दिनकर मिटकरी, परशुराम धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रश्नचार्य मदन लाहोटी, राष्ट्रीय हरित सेनेचे जानफेळ शाखा अध्यक्ष प्रश्न. शिवाजी म्हस्के व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून महाविद्यालय परिसरात रोपवाटिका तयार करून एक हजार रोपांची निर्मिती करण्यात आली. यावेळी सदाशिव वानखेडे, जी.एम. जाधव, जानकिराम राठोड उपस्थित होते. संचालन प्रश्न. नंदकिशोर बोकाडे तर आभार घुगे यांनी केले.

कुमरे यांना निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार व उपाध्यक्ष अब्दूल रफीक. चौकांमध्ये टपाल पेटय़ांची मागणी
बल्लारपूर, २० जुलै / वार्ताहर

पूर्वी प्रत्येक वॉर्डात आणि वस्त्यांमध्ये प्रमुख ठिकाणी टपाल कार्यालयातर्फे लावण्यात आलेल्या टपाल पेटय़ा आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना टपाल पाठवावयाचे झाल्यास घरापासून बऱ्याच दूरवर असलेल्या टपाल कार्यालयात टपाल टाकण्यास जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेता येथील संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेद्वारा टपाल कार्यालय, अधीक्षकांना एक निवेदन देऊन शहरातील प्रमुख ठिकाणांवर पूर्ववत टपाल पेटय़ा लावण्यात याव्या, अशी मागणी निवेदनात केली आहे. संस्थाध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अब्दुल रफीक यांनी अधीक्षकांना निवेदन सादर केले.

श्वानदंशाची लस रुग्णालयात उपलब्ध
भंडारा, २० जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ात प्रत्येक महिन्याला श्वानदंशाच्या किमान ३० ते ४० घटना येतात. त्यासाठी आवश्यक असलेली लस सर्व रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात श्वानदंशाची लस उपलब्ध असून काही दिवसांपूर्वी काही रुग्णालयातील लस संपल्या होत्या. मात्र, आता त्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अ‍ॅण्टी रॅबीजचे प्रमाण आता बदलले असून पहिल्या, तिसऱ्या, सातव्या आणि एकविसाव्या दिवशी या लस देण्यात येतात. या लस नियमित ठरलेल्या दिवशी घेणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. लस योग्य प्रमाणात ठराविक वेळेत घेतली तर श्वानदंशाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. विशेषत: लहान मुलांना श्वानांपासून दूर ठेवण्याचे काम पालकांनी करावे, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

पंच परीक्षेचा लाभ घेण्याचे आवाहन
मूर्तीजापूर, २० जुलै / वार्ताहर
महाराष्ट्र हँडबॉल संघटना व हँडबॉल राज्य पंच मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित होणाऱ्या हँडबॉल पंच परीक्षेचा लाभ अकोला जिल्ह्य़ातील शारीरिक शिक्षक व हँडबॉलप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास तिडके यांनी शुक्रवारी येथे केले. पुणे येथे २६ जुलैला ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील खेळाडू, शिक्षक सहभागी होत आहेत. ज्यांनी यापूर्वी परीक्षा दिलेली आहे, जे राज्य स्तरीय परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध स्पर्धामध्ये पंचाचे काम केले. अशा पंचांनी ‘ग्रेडेशन’ मिळविण्याच्या दृष्टीने या परीक्षेस बसणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव प्रश्न. अशोक राजपूत व हँडबॉल रेफरी राज्य बोर्डाचे अध्यक्ष परवाले यांनी म्हटले आहे.

वार्ड समिती अध्यक्षा सविता बेले विद्यार्थ्यांना पुस्तके वाटताना. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
शेंदूरजना घाट, २० जुलै / वार्ताहर
येथील नगर परिषद शाळा क्र. ३ मध्ये शाळेचा परिसर स्वच्छता व परिपाठ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वॉर्ड समिती अध्यक्ष सविता बेले या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पवन बेलसरे, समिती सदस्य योगिनी आंजनकर होत्या. पाहुण्यांच्या हस्ते शाहू महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर मुख्याध्यापक रोहणकर यांनी प्रश्नस्ताविक केले. वॉर्ड समिती अध्यक्ष सविता बेले व पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सविता बेले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाकडे लक्ष देताना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव कसा मिळेल व शिक्षणासोबतच खेळाकडे अधिक लक्ष देण्याचे प्रयत्न शिक्षकांनी व पालकांनी करण्याचे आवाहन केले. आभार राऊत यांनी मानले.

जनता बँकेच्या संचालकांची बिनविरोध निवड
अकोला, २० जुलै/प्रतिनिधी
अकोला जनता कमर्शियल को.ऑप. बँक अकोला या बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडून आणावयाचे उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सर्वसाधारण गटातून साकरचंद शाह, ज्ञानचंद गर्ग, रमाकांत खेतान, भीमराव धोत्रे, रश्मिकांत पटेल, के.जी. देशमुख, गुरमुखसिंग गुलाटी, संतोष गोळे, बिहारीलाल बियाणी, सुनील तुलशान, कमलकिशोर कागलीवाल, सुभाष तिवारी, शिव मंत्री, शाखा प्रतिनिधी प्रवर्गातून जयंतीभाई हरिया, माणिक धूत, महिला प्रवर्गातून मनोरमा पाराशर, प्रतिभा जानोरकर, राखीव प्रवर्गातून पंढरी सदाशिव यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाकडे वळावे- अनिल देशमुख
नरखेड, २० जुलै/ वार्ताहर

आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान अवगत करण्यापेक्षा व्यावसायिक अभ्यासाकडे वळून रोजगारांची संधी उपलब्ध करावी, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अनिल देशमुख यांनी नरखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी नरखेड पंचायत समितीचे सभापती नरेश अरसडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत चांडक, पालिका उपाध्यक्ष प्रवीण बालपांडे, विजय बिलगिये, अनिल कोरडे, हेमलता, माधुरी हनवतकर, कुसुम लुंगे, मोतीराम साठोणे प्रश्नमुख्याने उपस्थित होते.