Leading International Marathi News Daily
बुधवार, २२ जुलै २००९
  आयएलओमधील करिअर
  करिअर सल्ला
स्वयंरोजगाराच्या करिअर संधी व मार्गदर्शन करणाऱ्या संस्था
  करिअरनामा
आर्बिट्राजर
  स्कॉलरशीप
‘क्लायमेट चेंज’वर कार्यशाळा
  समृद्धतेचा सिकंदर
  स्पर्धा परिक्षांचे जग
स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हपदाची तयारी
  प्रभावी सादरीकरण
  अमेरिका मॉडेल ऑफ एज्युकेशन
  जाहिरातींची निर्मिती
  ‘एसएनडीटी’मध्ये मुलींसाठी हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरिंग मॅनेजमेंटमध्ये पदविका अभ्यासक्रम

आयएलओमधील करिअर
आंतरराष्ट्रीय संघटनांमधील करिअरसंधीबद्दल माहिती करून देण्यासाठी आतापर्यंत आम्ही आपणाला युएन, वर्ल्ड बँकसारख्या संघटनांची व त्यातील करिअर्सची माहिती करून दिली. आज अशांपैकीच ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’या संघटनेविषयी जाणून घेऊ या!
उत्कृष्ट समाजबांधणीसाठी माणसे जिथे काम करतात ते ठिकाण, कामाचे स्वरूप, त्यांच्या आशा-आकांक्षा या सर्वाचाच विचार होणे गरजेचे असते. कारण, चरितार्थासाठी करायचे काम हे केवळ पोटापाण्याची व्यवस्था करण्याइतपतच महत्त्वाचे नसून माणसाच्या विकासाशी निगडित अनेक पैलूंचा त्यात समावेश असतो. काम करीत असातना उद्भणाऱ्या विविध समस्या, काम मिळण्याची, ते मिळाले तर
 

टिकून राहण्याची शाश्वती, कामाचा सुयोग्य मोबदला, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या (किंवा न मिळणाऱ्या) सोयी-सवलती इत्यादी अनेक विषयांचा सांगोपाग विचार करण्यासाठी व जाणवत असलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जी सर्वोच्च संघटना आज अस्तित्वात आहे ती म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन’ आयएलओची स्थापना १९१९ मध्ये केली गेली.
कुठल्याही प्रकारचे काम हे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक विकासाशीच संबंधित नसून राष्ट्रविकास, आर्थिक विकास, तसेच समाजातील विविध स्तरांचा विकास यांच्याशीही संबंधित असते. लोकांच्या कार्यालयीन जीवनाविषयी असलेल्या आकांक्षा (करिअर अ‍ॅबिशन्स) यांचाही विचार या संघटनेच्या माध्यमातून केला जातो.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची संरचना :
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ) ही ‘यूएन’चीच ट्रायपार्टाइट’ संघटना असून भारतात ती सरकारी नियुक्त अधिकारी, एम्प्लॉयर्स (जसे कारखानदार) व कामगार या तिन्ही स्तरांवर एकदिलाने व परस्पर सामंजस्याने काम करते.
जगभरातील विविध देशांमधील कामगार (इथे केवळ कामगार असा अर्थ नसून अर्थार्जनासाठी नोकरी करणारी माणसे हा आहे.) हे त्यांना मिळणाऱ्या पगार/ रोजगाराबाबत संतुष्ट असले पाहिजेत, त्यांना कामाच्या ठिकाणी सुयोग्य वातावरण व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, वस्ती कामगारांच्या समस्यांचा विचार केला गेला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक ‘कोडस्’ आयएलओ लागू करीत असते. कालपरत्वे त्यात बदल केले जातात. विविध देशांत त्याच्या स्थळ-कालानुरूप हे स्टॅन्डर्डस् लागू केले जातात.
आयएलओची कार्यप्रणाली
आयएलओचे सदस्य असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी (ज्यात एक एम्प्लॉयर व एक वर्कर डेलिगेट तसेच दोन सरकारी डेलिगेटस् असतात.) दरवर्षी जून महिन्यात जिनेव्हा येथे चर्चेसाठी बैठकीत एकत्र येतात, चर्चा करतात, संघटनेसमोर आलेल्या विषयांवर चिंतन करून, समस्या सोडवून व त्यावरील उपाययोजना ठरवतात. तसेच वार्षिक बजेट ही या बैठकीदरम्यान मंजूर केले जाते. याच बैठकीत ‘गव्हर्निग बॉडी’चीही निवडणूक पार पडते.
आयएलओतील करिअर्स
कमालीचे स्पर्धात्मक, बुद्धिमान, कष्टाळू व आपल्या कामाप्रती निष्ठा असणारे मनुष्यबळ आयएलओसारख्या संघटना सतत चाचपडत असतात. स्त्री असो अथवा पुरुष, प्रत्येकाला त्याच्या बौद्धिक उंचीनुसार सुमात्र असे काम मिळवून देण्याकडे आयएलओचा भर असतो. ती व्यक्ती कुठल्याही जाती/ धर्म/ वंशाची असू शकते.
आयएलओमध्ये खालीलप्रमाणे चार स्तरांवर संधी उपलब्ध असतात.
करंट व्हॅकन्सीज
असोसिएट एक्सपर्ट प्रोग्रॅम
इंटर्नशिप्स
अदर एम्प्लॉयमेंट ऑपॉरच्र्युनिटीज
करंट व्हॅकन्सीज
व्होकेशनल ट्रेनिंग व व्होकेशनल रिहॅबिलिटेशन, एम्प्लॉयमेंट पॉलिसी, लेबर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, लेबर लॉ अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन्स, वर्किंग कंडिशन्स, मॅनेजमेंट. डेव्हलपमेंट, को-ऑपरेटिव्हज्, सोशल सिक्युरिटी तसेच लेबर स्टॅटिस्टिक्स ऑक्युपेशनल सेफ्टी अ‍ॅण्ड हेल्थ इत्यादी क्षेत्रात भरपूर करिअर्स उपलब्ध आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असून आपण काम करीत असलेल्या क्षेत्राबद्दल माहिती द्यायची असते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी recruit.ilo.org या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे व मगच अर्ज करता येईल.
फायनान्स व अकाऊंट्स लॉ, एज्युकेशन, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स बिझनेश अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इत्यादी क्षेत्रातील उच्चशिक्षित व अनुभवी व्यक्तींना या नोकरीत प्राधान्य दिलं जातं.
तुम्हाला असलेल्या वर्क एक्सपिरिअन्सनुसार त्या त्या योग्यतेच्या पोस्टसाठी तुमचा विचार केला जातो.
असोसिएट एक्सपर्ट प्रोग्रॅम
असोसिएट एक्सपर्ट प्रोग्रॅम हा डोनर कंट्रीज जसे ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलॅण्ड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅण्ड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन अशा अनेक देशांतील एक्सपर्ट मंडळींद्वारा आयएलओकडून राबवला जातो. आजघडीला १२० असोसिएट एक्सपर्टस् जगभर काम करीत आहेत. त्यातील काही आयएलओचे फिल्ड ऑफिस तर काही विविध टीम्समध्ये काम करतात. २० टक्के मंडळी जिनेव्हा येथील आयएलओ हेडक्वॉर्टर्समध्ये काम करतात. येथे त्यांना विविध इंटर- रिजनल प्रोजेक्ट्स, रिसर्च अ‍ॅक्टिव्हिटीज तसेच प्रोग्रॅम वर्कमध्ये काम करायचे असते. विकसनशील देशांना तांत्रिक सहकार्य करणे, नुकत्याच रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे तसेच याच्यातूनच भविष्यातील ‘एक्सपर्टस्’ घडवणे हे असोसिएट एक्सपर्ट प्रोगॅ्रमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
असोसिएट एक्सपर्टसाठी अर्ज करायचा असल्यास तुमचे कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक असणे किंवा पदवी व त्यानंतर पदव्युत्तर दर्जाचे तांत्रिक शिक्षण पूर्ण असणे आवश्यक असते. याबरोबरच संबंधित कामाचा आठ ते दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करताना तुमचे वय ३२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. असोसिएट एक्सपर्ट प्रोग्रॅमच्या असाइनमेंटचा कालावधी दोन वर्षे ते पाच वर्षे एवढा असू शकतो.
असोसिएट एक्सपर्ट प्रोग्रॅमसाठी निवड पद्धती
आयएलओ डोनर कंट्रीजला आपल्याकडील व्हेकन्सीची यादी पाठवते. त्या त्या देशाची सरकारे आपापल्या पॉलिसीज व गरजांनुसार योग्य त्या पदांसाठी निवड करतात. प्राथमिक निवड ही नॅशनल रिक्रुटमेंट सव्‍‌र्हिसद्वारा केली जाते व अंतिम निवडीसाठी आयएलओशी दीर्घ चर्चा करून मगच निवडप्रक्रिया पूर्ण होते.
इंटर्नशिप्स
पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असणाऱ्यांपासून पदवीधर, पदव्युत्तर अशा कोणालाही इंटर्नशिपसाठी अर्ज करता येतो.
आयएलओमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या मंडळींना आयएलओशी संबंधित कामासाठी आवश्यक अशा शाखांचा अभ्यास करण्याची संधी मिळते, जेणेकरून पुढे त्यांना आयएलओत कर्मचारी, अधिकारी अशा पदांसाठी पात्र बनता येते.
इंटर्नशिपदरम्यान आयएलओच्या कार्यप्रणालीची अतिशय जवळून ओळख होण्यास मदत होते. ‘प्रॅक्टिकल एक्सपिरिअन्स’ मिळवण्याच्या दृष्टीने इंटर्नशिप अतिशय महत्त्वाची पायरी ठरते. तरुण, उत्साही मनुष्यबळ ही आयएलओची सर्वात मोठी गरज आहे. आधुनिक प्रागतिक विचारसरणी परंतु अभ्यासू व संशोधनात्मक वृत्ती असे ‘कॉम्बिनेशन’ असलेली मंडळी आयएलओसाठी ‘मोस्ट वाँटेड’ आहेत.
इंटर्नशिपसाठी अर्ज करताना वर सांगितल्याप्रमाणे पदवीधर, पदव्युत्तर तसेच पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असणारी (अंडरग्रॅड्स) मंडळी अर्ज करू शकतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे आयएलओच्या कामाशी निगडित विषयांत उमेदवाराचे शिक्षण सुरू पूर्ण झालेले असणे अपेक्षित आहे (जसे इंटरनॅशनल लॉ, इकॉनॉमिक्स, इंडस्ट्रियल रिलेशन्स, पोलिटिकल/ सोशल सायन्स इत्यादी).
अर्ज करणारी व्यक्ती इंग्लिश/ फ्रेंच किंवा स्पॅनिश भाषेशी उत्तम परिचित असावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सांस्कृतिक तसेच विविध भाषिक वातावरणात सहजपणे वावरण्याची मानसिकता या उमेदवारांमध्ये असणे आवश्यक असते. ज्यांचे जवळचे नातेवाईक आयएलओत काम करीत आहेत त्यांनी मात्र अर्ज करू नयेत. इंटर्नशिपचा कालावधी साधारणपणे कमीत कमी तीन महिने तर जास्तीत जास्त सहा महिने एवढा असतो.
इंटर्नशिप सुरू असताना तुमच्या प्राथमिक गरजा भागातील एवढा ‘स्टायपेंड’ दिला जातो. तुमचा प्रवास, निवास, विमा हा खर्च तुम्हाला स्पॉन्सर करणाऱ्या संस्थेने करायचा असतो/ अथवा वैयक्तिकरीत्या करायचा असतो.
इंटर्नशिपसाठी निवड पद्धती
आयएलओकडे इंटर्नशिपसाठी व्हेकन्सीज नसतात. विविध देशांची सरकारे, त्यातील खाती, विद्यापीठे इंटर्नशिप ‘अवॉर्ड’ करतात. त्यामुळेच इंटर्नशिप करू इच्छिणाऱ्यांनी आयएलओची वेबसाईट नीट अभ्यासावी. आपण कुठल्या तऱ्हेने काम करण्यास पात्र आहोत याचा नीट अंदाज अर्ज करू इच्छिणाऱ्यांना येतो. आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी येथे तुम्हाला मिळू शकते. यासाठी internship@ilo.org वर संपर्क करा.
अन्य एम्प्लॉयमेंट अपॉच्र्युनिटीज :
यामध्ये अल्पकालीन नोकऱ्या उपलब्ध असतात. स्टॅटिस्टिशियनपासून ते लायब्ररीयन, संपादकीय कार्य, भाषांतराची कामे अशा तऱ्हेच्या अनेक संधी येथे मिळू शकतात.
वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारची निवडप्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होते. त्यामुळे इंटरनेटबद्दल तुम्हाला सखोल माहिती असणे आवश्यक असते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये नोकरी मिळवणे अवघड जरूर आहे; परंतु अशक्य मुळीच नाही. आकांक्षांना भरारी घेण्यासाठी तेवढेच मोठे आकाशही हवे. आंतरराष्ट्रीय संघटना हे आकाश तुम्हाला उपलब्ध करून देतात. आपल्या
पंखातले बळ आजमावून बघण्याची नामी संधी इथे तुम्हाला मिळते. चाकोरीबाहेरचा विचार करू शकणाऱ्या तरुणांनी या संधीचा फायदा जरूर घ्यायला हवा.
शर्वरी जोशी
sharvariajoshi@indiatimes.com