Leading International Marathi News Daily
रविवार, १९ जुलै २००९

डावपेचात सतर्क राहा
गुरू, शनी, राहू नियमित कार्यक्रम फिरवत ठेवणारी अनुकूलता निर्माण करून देतील. शुक्र-मंगळ सहयोगामुळे आर्थिक समस्या सोडवता येतील. कला, संगीत, विज्ञानाच्या वर्तुळात प्रशंसा मिळवू शकाल. परंतु सूर्य, बुध, केतू यांचा सहयोग चतुर्थात असेपर्यंत प्रपंचातले प्रश्न त्रस्त करीतच राहतील. आणि अधिकारांवर नवी नियंत्रणं येण्याचा संभव नाकारता येत नाही. अवघड राजकीय डावपेचात सतर्क राहणे आवश्यक आहे.
दिनांक: २०, २१, २४, २५ शुभकाळ
महिलांना: झगडून यश मिळवावे लागेल.

चित्र आकर्षक होईल
राशीस्थानी शुक्र- मंगळ पराक्रमी बुध-रवी भाग्यांत राहू दशमांत गुरू अशाच ग्रहकाळांत जीवनचित्र आकर्षक करता येते. नवे प्रयोग अभिनव उपक्रम यांच्यामधील यश रविवारच्या रवी-हर्षल नवपंचम योगापासूनच दृष्टिपथात येऊ लागेल. बुध-मंगळ शुभयोग व्यापारात बौद्धिक प्रांतात अर्थप्रांताचं यश नेत्रदीपक करणारा ठरतो.
दिनांक: १९, २०, २१ शुभकाळ
महिलांना: प्रयत्नाने प्रश्न सुटतील, दबदबा वाढेल.

यशासाठी झगडावे लागेल
गुरू-शनीचं सहकार्य मिळूनही मिथुन व्यक्तींना अपेक्षित यशासाठी झगडावे लागणार आहे. कारण व्ययस्थानी शुक्र-मंगळ अष्टमांत राहू यांच्या अनिष्टतेमुळे ठरवलेले कार्यक्रम ठरवलेल्या वेळेत होत नाहीत. परिणामी आश्वासनं, चर्चा, संपर्क यांचा फायदा होत नाही. आरोग्यावर लक्ष ठेवा. धावपळीत पडणं, लागण्याचा संभव आहे. उपासना, प्रार्थना मन:शांती देणारी ठरेल.
दिनांक: २१ ते २५ शुभकाळ.
महिलांना: सरळ मार्ग, स्वच्छ कृती यातूनच निर्दोष यश मिळवता येईल.

झटपट लाभ उठवा
राशीस्थानी सूर्य-बुध, लाभांत शुक्र-मंगळ, सप्तमांत राहू याच ग्रहांचा लाभ झटपट उठवला तर व्यवहाराची गाडी बरीच पुढे नेता येईल. काही अवघड प्रकरणांमधून सुटका करून घेता येईल. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. रविवारच्या रवी-हर्षल नवपंचम योगाचे परिणाम हे यश निश्चित करणारी शक्तीच ठरावी. साडेसाती गुरू अष्टमांत असल्याने संकटात टाकणाऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात. श्री मारुतीची उपासना, आराधना मन:शांतीची ठरावी.
दिनांक: २२ ते २५ अनुकूलता वाढेल.
महिलांना: रागरंग पाहून कृती करा; यश मिळेल.

कल्पकता उपयुक्त ठरेल
साडेसाती सुरू असताना राहू-केतू अनिष्ट व्ययस्थानी बुध- रवी असा काळ व्यवहारांत आव्हानांचा, प्रपंचात अशांतीचा आणि आर्थिक देवघेवीत तणावाचा ठरणे शक्य असते; परंतु गुरुकृपा, अनुकूल शुक्र-मंगळ यांना कल्पकता, प्रयत्न यांची साथ दिलीत तर काही समस्यांवर मार्ग सापडतील. कदाचित काही आर्थिक, प्रापंचिक प्रश्न मार्गी लावता येतील. हवामानाचा आढावा घेऊन शेतीची कामे पूर्ण करू शकाल. प्रवासाचे बेत सध्या तरी नक्की करू नका.उपासना, प्रार्थना मन:शांती देणारी ठरेल.
दिनांक: २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना: झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या. नवीन उपक्रम सध्या नको.

सतर्कता प्रतिष्ठा सांभाळील
भाग्यांत शुक्र-मंगळ, लाभांत बुध-रवी यांच्यामधून कन्या व्यक्तींना प्रतिष्ठेचे प्रश्न सोडवून घेता येतील. काही स्थगित योजनांवर मार्ग शोधता येतील. पंचमातील राहू धर्मकार्यातून आनंद देतो. साडेसाती आणि गुरूची नाराजी अशा काळांत सतर्क राहून कार्यचक्र फिरवत ठेवले तर समस्या इभ्रतीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. बुध-मंगळ शुभयोग व्यापारांत, बौद्धिक क्षेत्रात प्रगतीचा ठरतो. अचानक प्रवास संभवतात.
दिनांक: २० ते २३ शुभकाळ.
महिलांना: प्रपंचातले प्रश्न सुटतील. समाजात प्रभाव वाढेल. प्रवास कराल.

धरलं तर चावतंय..
गुरू, शनी, बुध, रवी यांची अनुकूलता असूनही राहू, मंगळ, शुक्र आणि सूर्यग्रहण यांच्या परिणामांनी ‘धरलं तर चावतंय..’ अशी परिस्थिती काही क्षेत्रात तुला व्यक्तींची होणं शक्य आहे. अचूक अंदाज येईपर्यंत कृती करू नका. कला, विज्ञान, उधारी, सावकारी, नवे व्यवहार यांचा त्यात समावेश ठेवावा. व्यापारी संधीचा उपयोग करण्यास विलंब टाळावा. राजकीय संबंधांचा लाभ होईल.
दिनांक : २० ते २४ प्रयत्नाने यश.
महिलांना : झगडावे लागेल, पण यश मिळेल.

अशक्य काही नाही
पराक्रमी राहू, सप्तामांत शुक्र, मंगळ भाग्यात सूर्य, बुध दशमात शनी, अशा ग्रहकाळात अशक्य शब्दांचा वेळापत्रकांत समावेश होत नाही. प्रयत्न, हुशारीने कार्यचक्र हवी तशा वेगाने फिरवत ठेवता येतात. रविवारच्या रवी हर्षल नवपंचम योगापासूनच त्याचा प्रत्यय येऊ लागेल. चतुर्थात गुरू असल्याने प्रापंचिक समस्या जबाबदारीने सोडवणं आवश्यक ठरणार आहे. शुक्र- शनी केंद्रयोगात प्रलोभनापासून दूर राहावे लागेल. प्रवास होतील.
दिनांक : २२ ते २५ शुभकाळ.
महिलांना : सामाजिक प्रश्न सुटतील.

प्रतिष्ठा मजबूत राहील
पराक्रमी गुरू, भाग्यात शनी, मकर, राहू यांच्यामधून काही समस्या सुटतील. प्रतिष्ठा मजबूत राहील. तरीही शुक्र मंगळाची नाराजी अष्टमात बुध, रवी आणि सूर्यग्रहण यांच्यामुळे सहज सफलतेची अपेक्षा पूर्ण होणं शक्य नसल्याने मिळेल तेवढं घ्यावं आणि पुढे सरकत राहावं. हाच मंत्र उपयुक्त ठरणारा आहे. व्यापारात सतर्क राहा. राजकीय साहस नको. आरोग्य आणि अधिकार यांच्यामधून क्लेश निर्माण होतील. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळणार आहे. प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही.
दिनांक : २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना : प्रक्षोभ टाळा, प्रार्थना सुरू ठेवा.

यश मिळत राहील
राशीस्थानी राहू, पंचमात शुक्र, मंगळ, सप्तमात सूर्य-बुध आणि गुरूकृपा एवढय़ा अनुकूल ग्रह भांडवलावर मकर व्यक्तींना मजल दरमजल करीत नेत्रदीपक यशापर्यंत पोहोचता येईल. रविवारच्या रवी- हर्षल नवपंचम योगापासून याचा अनेक क्षेत्रात प्रत्यय येऊ लागेल. अष्टमातील शनीची सध्या तरी धास्ती नको. नवीन उद्योगाची रूपरेखा तयार होईल. समाज चळवळीचा प्रभाव वाढेल, प्रवास होतील. प्रापंचिक समस्या सुटतील, पैसा मिळेल. आनंदाचा काळ आहे. मन प्रसन्न ठेवा.
दिनांक : १९, २२, २३ शुभकाळ
महिलांना : प्रपंचात खूश रहाल. सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल. यशात आप्तेष्ठाांनाही सामावून घ्या, तुमचा आनंद द्विगुणित होईल.

हालचाली अवघड होतील
व्ययस्थानी राहू, षष्ठांत सूर्य- बुध, चतुर्थात शुक्र- मंगळ आणि सूर्यग्रहण यांच्या अनिष्ट प्रक्रियांमध्ये वेढलेल्या कुंभ व्यक्तींना व्यावहारिक हालचाली अवघडच ठरणार आहेत. प्रपंच प्राप्ती, आरोग्य, अधिकार यांचा समावेश त्यात राहणार आहे. गुरूची कृपा आणि देवाची प्रार्थनाच या वेळी उत्साह देतील आणि तारून नेतील. सत्य, संयम, शिस्त यांचा आधार चक्रातून बाहेर काढणारा ठरेल. वाद टाळा.अचानक प्रवास संभवतात.
दिनांक : २०, २१, २४, २५ शुभकाळ.
महिलांना : दगदग वाढेल, धावपळ होईल आणि यशासाठी थांबावे लागेल.

साहस करू नका
पराक्रमी शुक्र- मंगळ पंचमात बुध- रवी आणि रविवारचा रवी-हर्षल नवपंचम योग यामधून नियमित उलाढाली सुरू ठेवता येतील. परंतु व्ययस्थानी गुरू षष्ठांत शनी असल्याने साहसामध्ये उलाढाली अडकू नये यासाठी शनिवापर्यंत सतर्क राहावे लागेल. पैसा मिळेल. प्रापंचिक प्रश्न सुटतील. लिखापढीची कामे पूर्ण करू शकाल. भेटी चर्चेला आकार देता येईल. ग्रहण आणि ग्रहणाची कर या वेळी प्रकरणं संयमाने हाताळणे आवश्यक ठरणार आहे. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी.
दिनांक : २०, २१, २४, २५ सावध राहा.
महिलांना : अवास्तव विश्वासाने दिलेले शब्द केलेल्या कृतीमधून अडचणीत याल, सांभाळा.