Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ जुलै २००९
  रानभैरी मन माझं
  ओपन फोरम
३३ टक्के आरक्षण नको..
  थर्ड आय
माँ, मैं ATKT पास हो गया
  बूक कॉर्नर
  स्मार्ट बाय
  मेल बॉक्स
  ग्रूमिंग कॉर्नर
पश्चात्ताप नकोच..
  लँग्वेज कॉर्नर
इन्टरकल्चरल कम्युनिकेशन
  ब्लॉग कॉर्नर
नियम कोणासाठी?
  यंग अचिव्हर
आरती अहुजा
कागदाची मैत्रीण
  हेल्थ कॉर्नर
स्वास्थ्यकारक मध
  फूड कॉर्नर

घरोघरी - दिवस संपांचे..
नंदन : वैशाली, एक कप चहा होऊन जाऊ दे. बाहेर मस्त पाऊस पडतोय. बडा मन कर रहा है चाय पीनेका. और चाय के साथ पकोडे भी हो तो.. what say jiju?
विजय : सालेसाहब, हमारी भी यही ख्वाहिश है, काश वो पूरी हो जाती..
नंदन : क्यों नही पूरी होगी? अरे, हम बोले और हमारी बहना ना माने, ऐसा तो होही नही सकता.

 

विजय : सालेसाहब, लगता है वो दिन गये.
नंदन : क्या मतलब?
विजय : जो तब होता था वो अब नही होगा.
नंदन : क्यों नही होगा भला? देखिए, आप आप है, मैं मैं हॅूं, वैशाली, वेदा, विराज, सबकुछ तो सेम है..
वैशाली : नंदन, तू, मी, हे, मुलं सगळे तसेच आहोत, पण परिस्थिती तीच नाही ना..
विजय : .. आणि त्यामुळे बाईसाहेब संपावर आहेत.
नंदन : काय? वैशाली, तू आणि संपावर?
वेदा : आई, काय झालं?
वैशाली : अरे, संपावर जाऊ नको तर काय करू? जरा घरात डोकावून बघा सगळेजणं म्हणजे कळेल. भाज्यांचे भाव कडाडलेत, डाळी महागल्यात.. अरे या महागाईनं तर तोंडचं पाणी पळवलच आहे, त्यात पाणीकपातही लागू झालीये. असं वाटतंय ना की कुठे तरी दूर जाऊन राहावं. जीव अगदी मेटाकुटीला आलाय, या सगळ्याचा मेळ घालता घालता आणि तुम्हाला भज्यांचे- चहाचे डोहाळे लागलेत.
नंदन : पण म्हणून डायरेक्ट संपावर?
वैशाली : काय करणार? अरे, त्याशिवाय तुम्हाला परिस्थितीची जाणीवच होत नाही ना! पाहतो आहेस ना आजूबाजूला काय चाललंय?
विजय : लहानपणी आपल्याला एक कविता होती बघ. दिवस सुगीचे सुरू जाहाले. तसं सध्या दिवस संपांचे सुरू जाहले, असं म्हणावंसं वाटतंय. मार्डचा संप झाला. वीज कर्माचाऱ्यांचा संप चालू आहेत. वैद्यकीय अधिकारी संपावर आपल्या मागण्यांसाठी हटून बसले आहेत. अगदी शिक्षक मंडळीही यापासून दूर नाहीत.
वेदा : पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत म्हणजे रिक्षा-टॅक्सीवालेही भाववाढीची तयारी करतच असतील आणि त्याला विरोध झाला की संपावर जाण्याच्या तयारीत असतीलच.
नंदन : आणि बँकवाले? त्यांच्यासाठी तर संप ही एक नियमित बाब झाली आहे. त्यांना तर संप केल्याशिवाय चैनच पडत नाही आणि त्यांचे संपही कसे स्ट्रॅटेजिकली प्लॅन केलेले असतात. म्हणजे सुट्टय़ा बिट्टय़ांना जोडून. त्यामुळे एक तर त्यांना कुठे तरी छान फिरून येता येतं आणि कस्टमर्सना जास्तीत जास्त त्रास होतो.
विराज : पुन्हा हल्ली सगळ्या संपकऱ्यांना सामान्य माणसाला होणाऱ्या त्रासाबद्दल खेद हा असतोच. तसं ते जाहीरही करून मोकळे होतात. उगीच सामान्य माणसाचे शिव्याशाप नको लागायला.
वेदा : म्हणजे वेठीला धरायचं सामान्य माणसालाच पण आव तर असा आणायचा की बघा तुम्हाला त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाहीये.
विजय : ते कसं आहे ना की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसला प्रकार आहे हा. सामान्य माणसाला जोपर्यंत झळ लागत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्यांचा विचार होणार नाही.
वैशाली : सगळं पटतंय. गळ्याशी आलं म्हणून हे करायला लागतंय, हे मान्य आहे. पण आता मात्र सामान्य माणसाच्या सहनशीलतेची हद्द झालीये. म्हणून अगदी विनंती करावीशी वाटते की आपल्या मागण्यांसाठी सामान्य माणसांना नका रे सारखं वेठीला धरू! आज आधीच सामान्य माणूस होरपळला आहे. कुठे जाऊ, वळू मागे, करू मी काय रे देवा, अशी त्याची अवस्था आहे, त्यात या संपांची भर.
विजय : तर काय? डॉक्टरांच्या संपाच्या वेळेला पेशंटस्चे काय हाल झाले, ते वाचून अंगावर काटा आला. अरे, ही गरीब माणसं, जगाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आशेनं येतात आणि अचानक असं काही झालं की त्यांचे हाल कुत्रा खात नाही. आपल्यासारख्यांना याची जास्त झळ लागत नाही. दृष्टीआड सृष्टी म्हणून आपणही कोरडेच राहतो.
वेदा : खरंय. पण आता शांतीच्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायची वेळ आली तेव्हा आम्ही रिअलिटीच्या जवळ आलो. आपल्या सोसायटीनं तेव्हा मदत केली नसती तर त्यांनी काय केलं असतं?
विजय : तो पण एक प्रश्नच आहे. कशी आहे गं त्याची तब्येत आता?
वैशाली : बरी आहे. पण परवा खूप रडत होती. म्हणत होती, व्हिवा सोसायटीचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुमच्यामुळेच माझा नवरा मृत्यूच्या दाढेतून परत आला. माझ्या कातडय़ाचे जोडे करून घातले तरी कमीच पडतील.
नंदन : कोण ही शांती?
वैशाली : अरे, आपल्या सोसायटीत जिना झाडायचं काम करते ती. आधी तिचा नवरा करत होता ते काम, पण त्याला डॉक्टरांनी मना केलं तेव्हा सोसायटीनं तेच काम शांतीला दिलं. मग तिनं इथल्याच जवळपासच्या काही सोसायटय़ांमध्येही काम धरलं आणि बघता बघता घर सावरून धरलं. चार कच्चीबच्ची पदरात. त्यांना कोण खायला घालणार? तिला हातपाय हलवणंच भाग होतं.
वेदा : तिची मुलं पण तिला मदत करतात. त्यामुळे त्यांना शाळेत जाता येत नाही म्हणून आम्हीच त्यांना शिकवतो.
नंदन : अरे वा, म्हणजे एका घराचा उद्धारच केलात म्हणायचा की.
विराज : मामा, एवढंच नाही, तर आता जे ऑपरेशन झालं ना त्याचाही सगळा खर्च आम्ही सगळ्या सोसायटय़ांनी वाटून घेतलाय.
विजय : अरे, नाही तर ते कर्ज फेडण्यात तिची उभी हयात गेली असती. त्यापेक्षा मग आम्हीच ठरवलं की हे पैसे तिच्याकडून घ्यायचे नाहीत.
वैशाली : ऑपरेशनची रक्कम एकाला जड होती. पण सगळ्यांना मिळून ते काही फार अवघड नव्हतं. इतर समाजसेवा करणं जमत नाही मग अशी सेवा करायची आणि मला एक गोष्ट मुद्दाम तुला सांगावीशी वाटतेय की, ऑपरेशनचा खर्च तिच्याकडून घ्यायचा नाही हा निर्णय आपल्या सोसायटीतल्या सगळ्या तरुणाईचा बरं का कट्टय़ावर घेतलेला. ही मुलं कधी कधी अशी वागतात ना की आम्हीही कोडय़ात पडतो. पण आम्हालाही सगळ्यांना तो पटला, कारण शांतीचं मन लावून काम करणं. प्रामाणिक तर एवढी आहे ना.
वेदा : अरे, मध्ये ना, माईनं मध्ये तिचा ज्युवेलरी बॉक्स टाकून दिला आणि त्यात तिच्या कुडय़ाही गेल्या. माईला वाटलं झालं गेल्या आता. बसला काही हजारांना फटका. पण नाही. शांतीच्या नजरेतून कशा सुटतील? बरोबर माईला परत आणून दिल्या.
वैशाली : ती गरीब आहे, पण लसलस नाही. मग अशा माणसाला मदत करायलाही मदतीचे हात आपोआपच पुढे होतात. अशी माणसं आज जगात आहेत म्हणून तर अजून जगावर विश्वास आहे. नाही तर सगळं कठीणच आहे.. संप, अपघात, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास, बलात्कार, स्त्री-भूषण हत्या, पाणीकपात, महागाई.. वाढवू तेवढी यादी वाढतच जाईल. दिवसागणिक अडचणी कमी होण्याचं नावच नाही. त्यात भरच पडत आहे. असं वाटतं ना की हे सगळं सोडावं आणि लांब कुठेतरी रानात जाऊन राहावं.
नंदन : अग, तुला असं वाटतंय. पण माझा एक मित्र फॉरेस्ट ऑफिसर आहे, तो म्हणत होता की, कंटाळा आलाय रे या नोकरीचा. वाटतं, सोडावी नोकरी आणि शहरात येऊन राहावं..
विराज : म्हणून मामा, आई म्हणते तसं.. जात्यातलेही रडतात आणि सुपातलेही रडतात..
shubhadey@gmail.com