Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आठ साठेबाजांवर साताऱ्यात गुन्हे दाखल
सातारा, २३ जुलै/प्रतिनिधी

जीवनावश्यक कायद्याचा भंग करून धान्य, तेल, साखरेचा साठा करणाऱ्या, तसेच परवाने नसलेल्या आठ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच तपासणीच्या धडक मोहिमेत कराडमधील १८, तर इतर जिल्ह्य़ांतील सहा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची

 

माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी दिली.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सातारा शहरातील गीता ट्रेडर्सच्या गीता झंवर, विजय नंदकिशोर झंवर (लक्ष्मी डाळ बेसन), दीप्ती ट्रेडर्सच्या सुनीलकुमार रमणलाल शहा, शिरीषकुमार शहा (मार्केट यार्ड), आशिष ट्रेडिंगच्या सौ. सीमा सुनीलकुमार शहा, सागर ट्रेडर्सच्या आशिषकुमार शहा, लक्ष्मीनारायण आईल मिलचे सुनील झंवर व नदीम ट्रेडिंगच्या फैसल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साखरेचा साठा करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांकडे त्याचा परवाना नव्हता, तसेच इतर परवान्यांचे नूतनीकरण न करता व निर्धारित जागेऐवजी अन्यत्र अतिरिक्त साठा करण्यात आल्याचे आढळून आल्याने नोटीस देऊन या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.