Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शाहू साखर कारखान्यातर्फे शाहूजयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धा
कागल, २३ जुलै / वार्ताहर

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातर्फे घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेचे पंचविसावे वर्ष असून, छत्रपती शाहूजयंती निमित्ताने सुरू केलेल्या या कुस्ती स्पर्धेमुळे कागल तालुक्यातील कुस्ती स्पर्धेत राज्य व देशपातळीवर चमकले ते केवळ ग्रामीण भागात तालीम वाढविण्याबरोबर कुस्तीत राखलेल्या सातत्यामुळेच, असे प्रतिपादन छत्रपती शाहू कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह

 

घाटगे यांनी केले.
कारखान्यातर्फे शाहूजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. शुभारंभीची कुस्ती ८५ किलो गटात संदेश माकणे (यळगूड) विरुद्ध संग्राम निकम (सावर्डे बु।।) यांच्यात होऊन माकणे याने ही कुस्ती गुणांवरजिंकली. त्यापूर्वी पंच राडे यांच्या हस्ते आखाडापूजन झाले. दोन नंबरची ओपन गटातील कुस्ती दऱ्याचे वडगावचा मल्ल सुरेश बेनके याने सुनील माणगावे पुलाची शिरोली याच्या विरोधात गुणांवकजिंकली, तर ७४ किलो वजन गटात लखन घाडगे (शाहू साखर) विरुद्ध अशोक साळुंखे (वळीवडे)यांच्यात होऊन लखन घाडगे याने ही कुस्तीजिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतील सुर्वपदकविजेते पहिलवान राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमोद पाटील, श्यामराव लायकर, सर्जेराव पाटील यांच्या नियोजनाखाली ही कुस्ती स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. शाहू उद्यानात असलेल्या शाहूमहाराज पुतळय़ाजवळ क्रीडाज्योतीचे पूजन कागल बँकेचे अध्यक्ष रामगोंड पाटील यांनी केले. माळ बंगला येथे क्रीडाज्योत आल्यानंतर तिचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे व व्हाईस चेअरमन एस. के. मगदूम यांनी केले. रौप्यमहोत्सवी वर्षांत ३४७ स्पर्धक सहभागी झाले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे निवेदक म्हणून राजाराम चौगुले व राडे काम पाहात आहेत. तर डी. डी. माडगुळे, संभाजी वरूटे, बबन चौगुले, बटू जाधव, रामा माने, जालंदर मेढे यांच्यासह अन्य पंच आहेत.
कुस्ती शुभारंभप्रसंगी कल्लेश माळी, अविनाश पाटील, रवि पाटील, आनंदराव हिलगे, सुनील सूर्यवंशी, अशोक बल्लाळ, यशवंत नुल्ले, कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कुस्तीशौकीन उपस्थित होते.