Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

हिराचंद वाचनालयाच्या नव्या अ‍ॅम्फी थिएटरचे किशोरी आमोणकर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
सोलापूर, २३ जुलै/प्रतिनिधी

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी कलासंकुलातील वातानुकूलित आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या अ‍ॅम्फी थिएटरचा उद्घाटन सोहळा गानतपस्वी किशोरी आमोणकर यांच्या हस्ते येत्या शनिवारी २५ जुलै रोजी होत

 

आहे.
सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या समारंभातच वाचनालयाच्या अभ्यासिकेचे व बालविभागाचे उद्घाटन तसेच प्रा. श्रीराम पुजारी यांच्या ‘काव्यानंद’ व ‘श्रवण बोल’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रख्यात लेखक व चित्रकार सुभाष अवचट यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती वाचनालयाचे सरकार्यवाह डॉ. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
दहा वर्षांपूर्वी हि. ने. वाचनालयाच्या आवारात संस्थेचे दिवंगत अध्यक्ष प्रा. श्रीराम पुजारी यांच्या पुढाकाराने भव्य अ‍ॅम्फी थिएटरची उभारणी करण्यात आली होती. सुमारे १५ लाख रुपये खर्च करून या थिएटरची रचना बदलण्यात आली असून, रसिक श्रोत्यांना व्यासपीठावरील कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा म्हणून पायऱ्या-पायऱ्यांनी अविचल आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. आसनक्षमता २७५ एवढी आहे. तीन टनी नऊ वातानुकूलित यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. संपूर्ण सभागृह ध्वनिदोषमुक्त आहे. या अ‍ॅम्फी थिएटरसाठी दर तीन तासांकरिता तीन हजार तर बिगर वातानुकूलितसाठी अडीच हजार भाडे आकारण्यात येणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.