Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

शून्य भारनियमनाला ग्राहकांचाही विरोध
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या शून्य भारनियमनाच्या प्रस्तावामध्ये सर्व ग्राहकांना अतिरिक्त वीज पुरवठा आकार लावण्यास सूचवले आहे मात्र, त्याला जोरदार विरोध होत असून, ‘भीक नको पण, कुत्रे आवर’ अशी प्रतिक्रिया वीज ग्राहक व्यक्त करीत आहेत.

पावसाची उसंत
हलक्या सरींनी मात्र श्रावणाच्या आगमनाची नांदी
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी
धार्मिक व्रतवैकल्यांची धामधुम घेऊन आलेल्या श्रावणाचे आगमन झाले असून पहिल्याच दिवशी आलेल्या सरसर शिरव्यांनी संपूर्ण सजीव सृष्टीचे तनमन मोहरून गेले. दरम्यान, गेला आठवडाभर बरसणाऱ्या पावसाने विदर्भाच्या बहुतांश भागात उसंत घेतली असून काही भागात हलक्या सरींनी श्रावणाच्या आगमनाची नांदी दिली.

आमदारांच्या निधी खर्चाची घाई कंत्राटदारांच्या पथ्यावर!
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी, आमदारांना त्यांचा निधी खर्च करण्याची घाई झाली आहे, या निधीतून होणारी कामे मर्जीतीलच कंत्राटदारांना मिळावी यासाठी आमदारांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येत असलेला दबाव हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे अस्त्र ; वेतन वाढीसाठी सर्वसामान्य वेठीस
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असताना शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी संपाचे अस्त्र उपसून सर्वसामान्यांनाच वेठीस धरल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाले आहे. किंबहुना, संघटनेच्या बळावर संप करा आणि सरकारला नमवून पाहिजे ते पदरात पाडून घ्या, असा संदेशच शासकीय कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने दिला आहे.

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून विद्यार्थी ठार
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून विद्यार्थी ठार झाला. सुरेंद्र नगरात बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रौनक घनश्याम आसाटी (रा़ आमगाव) हा त्याच्या होंडा अ‍ॅक्टिव्हाने (एमएच३५/एन/३८७४) वेगात जात होता. सुरेंद्र नगरातील पोलीस प्रशिक्षण विद्यालयाजवळील वळणावर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी घसरून तो खाली पडला. त्याच्या पोटाला गंभीर इजा झाली. अपघात झाल्याचे दिसताच लोक धावले. सीम्स रुग्णालयात त्याचे उपचारादरम्यान रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. रौनक हा शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बारावीत शिकत होता़ प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला़

पर्यावरण पुरस्कारासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन
नागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी

मुंबईच्या मानव कल्याण व वृक्ष संरक्षण संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर केला असून त्यासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. ‘पर्यावरण संरक्षण पुरस्कार’ व ‘वृक्ष मित्र पुरस्कार २००९-१०’ करीता हे पुरस्कार पाठवायचे आहेत. ‘पर्यावरणाचे रक्षण करा, वृक्ष लावा, वृक्ष जगवा तरच मानव जगेल’ म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत रमेश अण्णा घेगडे, त्रिमूर्ती निवास राहुलनगर, मु.पो.ता. शहापूर, जिल्हा ठाणे या ठिकाणी पुरस्कारासाठी माहिती पाठवण्याचे आवाहन पर्यावरण मानव कल्याण व वृक्ष संरक्षण संस्थेने केले आहे.

कारगिलमधील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

कारगिल युद्धात वीर मरण आलेल्या जवानांना नागपूरकरांनी येत्या २६ जुलैला विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन वॉर विडो असोसिएशनच्या सदस्य अनुराधा फडणीस यांनी केले आहे.
२६ जुलै १९९९ ला कारगिल युद्धात थलसेना, वायुसेना आणि नौसेनेतील अनेक जवानांना वीर मरण आले. या ‘विजयी’ दिवशी २६ जुलैला शहिदांना सारे मिळून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंगणात एक मेणबत्ती पेटवून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होता येईल, असे आवाहन फडणीस यांनी प्रसिद्धिला दिलेल्या पत्रकात केले आहे.

प्रश्नध्यापकांचे आंदोलन सुरूच राहणार; नुटाचा दावा
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

प्रश्नध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली असली तरी, आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाने (नुटा) घेतला आहे.
सहावा वेतन आयोग लागू करावा यामागणीसाठी १४ जुलैपासून प्रश्नध्यापक संपावर गेले आहेत. आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी विद्यापीठासमोर नुटाच्या नेतृत्वाखाली प्रश्नध्यापकांची सभा झाली. त्यात सहावा वेतन आयोग लागू करण्याचा शासनाचा निर्णय एकतर्फी आहे, एमफुक्टोच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत लेखी आश्वासन राज्य सरकार जोपर्यंत देणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय धेण्यात आला. सभेला प्रश्न. सुनील हजारे, डॉ. हिवरकर, प्रश्न. जाधव, प्रश्न. सोमासेन, डॉ. अवस्थी, डॉ.दातारकर, डॉ. गणवीर,डॉ. सोहनी, डॉ. भाईक, डॉ. कोंगरे उपस्थित होते. उद्या, शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठाच्या पुढे प्रश्नध्यापकांची सभा आयोजित करण्यात आल्याचे नुटाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. यशवंत पाटील यांनी कळविले आहे.

‘राष्ट्र निर्माण’साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

हिंदी मासिक ‘राष्ट्र निर्माण’साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन केले आहे. मासिकात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांबद्दलचे सर्वच विषयांचे स्वागत करण्यात येते. मुलांचा बौद्धिक, सांस्कृतिक विकास आणि युवकांना रोजगाराची माहिती, नवीन संशोधन, व्यवसाय, साहसाची माहिती आणि त्यावरील विचार प्रकाशित करण्यात येतात. त्यासाठी राष्ट्र निर्माण, संपादक संजय सायरे, ६-१६-६६, ई.डब्ल्यू.एस. कॉलनी, विश्वकर्मानगर, नागपूर-२७, येथे साहित्य पाठवावे.

स्थापना दिनी बिंझाणी महाविद्यालयात वृक्षारोपण
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

बिंझाणी नगर महाविद्यालयाचा स्थापना दिवस १७ जुलैला साजरा करण्यात आला. यावर्षी नागपूर शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुधीर बाहेती व प्रश्नचार्य डॉ. मेहरुन्निसा नियाझी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, निरंतर प्रश्नैढ शिक्षण आणि विस्तार विभागाच्यावतीने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडण्यात आला. प्रश्नचार्य नियाझी यांनी सुधीर बाहेती यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या सभासदांची रविवारी सभा
नागपूर, २३ जुलै/प्रतिनिधी

विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या स्थापनेला २१ जुलैला ५० वष्रे पूर्ण झाली. या सुवर्ण जयंती वर्षातील अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्हणून रविवार, २६ जुलैला फेडरेशनच्या सर्व आजी, माजी सभासदांची सभा संध्याकाळी ५ वाजता सीताबर्डीवरील भगिनी मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी फेडरेशनच्या सर्व सदस्यांची काँग्रेसनगर कार्यालयासमोरुन रॅली निघेल. याप्रसंगी फेडरेशनच्या जुन्या अध्यक्ष, महामंत्री यांचा सत्कार करण्यात येईल. भारतीय मजदूर संघाचे अ.भा. महामंत्री लक्ष्मी रेड्डी, एनओबीडब्ल्यूचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कुळकर्णी, महामंत्री अश्वनी राणा व इतर मान्यवर याप्रसंगी मार्गदर्शन करतील. विदर्भातील सर्व बँकांचे सदस्य या कार्यक्रमासाठी येणार आहेत. नागपूर तसेच उर्वरित विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ बँक एम्प्लाईज फेडरेशनचे महामंत्री राजीव पांडे यांनी केले आहे.

रजत गुंडमवारचा सत्कार
नागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी

हडस हायस्कूलच्या रजत अजय गुंडमवार याने दहावीत ९०.७० टक्के गुण प्रश्नप्त केल्याबद्दल ड्रॉईंग टीचर्स असोसिएशनतर्फे कृष्णराव मन्न्ो स्मृती गुणवंत पुरस्कार देऊन त्याला गोरवण्यात आले. रोख बक्षीस आणि संघटनेचे गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रजतचे वडील कलाशिक्षक आहेत. सत्कार कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बारई, सचिव दीपक गायकवाड, कोषाध्यक्ष सुभाष श्रीखंडे, संजय चिंचखेडे, अरविंद आवारी, शेखर वानस्कर, राहुल चौधरी, नरेंद्र मन्नो आणि रवी खंडाईत उपस्थित होते.

भारत स्वाभिमान मोहिमेतंर्गत सक्तीच्या मतदानाचे उद्दिष्ट
नागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी
रामदेवबाबाच्या भारत स्वाभिमान मोहिमेतंर्गत सक्तीचे मतदान हे एक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. नुकतेच दिल्ली येथे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे.पी. अग्रवाल यांनी ‘मतदान अनिवार्य विधेयक-२००९’ लोकसभेत मांडले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हे विधेयक लवकर पारित करणे आवश्यक आहे. मतदान न करणाऱ्या लोकांना ५०० रुपये दंड आणि दोन दिवसांची कैद करण्यात यावी. तसेच मतदान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा १० दिवसांचा पगार कापण्यात येईल किंवा दोन वर्षाकरता पदोन्नती पुढे ढकलण्यात येईल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

अ.भा.भ्रष्टाचार विरोधी समिती विदर्भात शाखा स्थापणार
नागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी

विदर्भातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या शाखा स्थापन करण्यात येत आहेत. गैरव्यवहारावर अंकुश राहावा, कोणत्याही विभागात भ्रष्टाचार होऊ नये. भ्रष्टाचार करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी हा या संघटनेचा हेतू आहे. गैरव्यवहार करणारा विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता या शाखांचे कार्यकर्ते काम करतील. समितीचे सभासद हौऊ इच्छिणाऱ्यांनी मोहन गंगन यांच्याशी ९४२०१८७४४२ किंवा ९३७१८९३०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

बँकेची फसवणूक
नागपूर, २३ जुलै / प्रतिनिधी

बँक ऑफ इंडियाच्या इतवारी शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी राजकुमार आनंद चौधरी (रा. गरोबा मैदान) या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ज्या भूखंडाची कागदपत्रे सादर करून सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते तो भूखंड आधीच विकण्यात आला होता. कर्जाची परतफेडही केली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नगराळे यांचे स्वागत
नागपूर, २३ जुलै/प्रतिनिधी

ध्रुव कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंटच्या प्रश्नचार्यपदी डॉ. महादेव नगराळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून पदभार स्वीकारला. संस्थेचे अध्यक्ष अमित येनुरकर यांनी डॉ. नगराळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव गौरव जयपुरीया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सभासद प्रश्न. डॉ. केशव भांडारकर, प्रश्न. अरविंद खरे आदी उपस्थित होते. डॉ. नगराळे यांच्या नियुक्तीबद्दल प्राचार्य आत्माराम उखळकर, डॉ. नरेंद्र खंडाईत, मोहन गंधे, प्रा. दिनेश राऊत, प्रश्न. राम डोर्लीकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रमोद ठाकरे विशेष कार्यकारी अधिकारी
नागपूर, २३ जुलै/प्रतिनिधी
सामान्य प्रशासन विभागाने प्रमोद ठाकरे यांची २४ फेब्रुवारी २०१४ पर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शासन निर्णयात निर्देशिलेले अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

भांडे प्लॉटमध्ये नेत्ररोग निदान शिबीर
नागपूर, २३ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती व भांडेप्लॉट विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने भांडे प्लॉट परिसरात नेत्ररोग निदान शिबीर घेण्यात आले. नेत्रतज्ज्ञ डॉ. मनोज श्रीवास्तव व त्यांच्या चमूने या शिबिरात ७५० नागरिकांची तपासणी केली. सर्व गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे व निवडक रुग्णांवर महात्मे नेत्र रुग्णालयातर्फे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे यावेळी शिबीर प्रमुख श्याम थोरात यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिव प्रमोद दरणे, सीताराम लोखंडे, केदार साहेब, विष्णुपंत ठाकरे, सुरेश मुरकुटे, प्रश्न. बाबुराव मते, विजय राजणेकर आदी उपस्थित होते.

दोसर वैश्य शैक्षणिक मंडळाची कार्यकारिणी पदारूढ
नागपूर, २३ जुलै/ प्रतिनिधी
दोसर वैश्य शैक्षणिक मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ दोसर वैश्य भवन येथे पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रभाकर गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यकारिणीत उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत गुप्ता, हरिनारायण गुप्ता, हरिराम गुप्ता, सचिव अश्विनी गुप्ता, सहसचिव जगदीश गुप्ता, रविशंकर गुप्ता, कोषाध्यक्ष- महेश गुप्ता यांचा समावेश आहे. अ‍ॅड. प्रकाश गुप्ता यांनी संचालन केले, तर अश्विनी गुप्ता यांनी आभार मानले.

‘नासा’ला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचा शनिवारी सत्कार
‘सेतू- अ कॉन्शस पॅरेंटस् फोरम’ आणि बालमासिक ‘मातृभू’ अंतर्गत ‘संस्कार’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता शंकरनगरातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या सभागृहात ‘नासा’ला भेट देणाऱ्या शंतनु मांडके, जय पात्रीकर व मधुरा भालकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या ई-नेक्स्ट या प्रबंधासाठी त्यांना प्रथम क्रमांक मिळाला त्याविषयी हे विद्यार्थी यावेळी माहिती देणार असून तेथील अनुभवही सांगणार आहेत. शिवाय या विद्यार्थ्यांच्या पालकांशी यावेळी श्रोत्यांना हितगुज साधता येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत चोरघडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. विक्रम मारवाह, प्रश्नचार्य चंद्रकांत रागीट व स्नेहा दामले यांनी केले आहे.