Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ही तर नाशिकच्या सर्वागीण विकासाची नांदी -समीर भुजबळ
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक विकास प्रश्नधिकरण स्थापन करण्याची घोषणा महसूल विभाग विकास पॅकेजमध्ये

 

प्रश्नधान्याने करण्यात आल्याबद्दल खा. समीर भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. पॅकेज अंतर्गत मार्गी लावलेली कामे म्हणजे नाशिकच्या विकासाची नांदी आहे. येत्या पाच वर्षात मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करण्यास आपण कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला आहे.
नाशिक शहराचा चोहोबाजूने होणारा विकास योग्य दिशेने होण्यासाठी नाशिक विकास प्रश्नधिकरणाची नितांत आवश्यकता होती. तसा निर्णय घेऊन राज्य शासनाने त्यासाठी ६० कोटी रुपयांची भरीव तरतूदही केली आहे. राज्यातील वाइन उत्पादक व शेतकऱ्यांना या पॅकेजमार्फत शासनाने मोठा दिलासा दिला आहे. त्यातून अमूलाग्र बदलाचे संकेत दिले आहेत. विशेषत: जिल्ह्य़ातील वाइन उत्पादक व शेतकरी या दोन्ही घटकांना मोठा फायदा होणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. पर्यटन विकासाकरिता ६०.१७ कोटी रुपयांची तरतूद, नाशिक येथे क्रीडा प्रबोधिनी तसेच पर्यटन विकास प्रश्नधिकरण यांची स्थापना, येवल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी व येवला मुक्ती भूमीसाठी आवश्यक तरतूद, जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी विशेषत: फळफळावळ आणि भाजीपाला उत्पादकांसाठी नाशिक येथे टर्मिनल मार्केट, सप्तश्रृंगी व अन्य चार तीर्थक्षेत्रासाठी विकास प्रश्नधिकरण स्थापन करण्यासह त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद इ. वैशिष्टय़ांमुळे जाहीर झालेले नाशिक विभागासाठीचे पॅकेज ही नाशिकच्या आगामी काळातील विकासाची नांदी असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.