Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

मोदी धनी यशाचे की अपयशाचे?
‘कक्का स्क्वेअर’ हा स्तंभ सुरू होऊन दोनेक र्वष होत आली, पण अजूनही या नावाविषयीचं कुतूहल अनेक वाचकांमध्ये आहे हे समक्ष भेटींमध्ये आणि पत्रव्यवहारातून जाणवत राहिलं आहे.. हा स्तंभ आहे देशाच्या चार सीमांमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारलेला.. ‘कक्का’ हे त्या सीमांचं सूचकरूप.. दक्षिणेचं कन्याकुमारी ते उत्तरेचं काश्मीर आणि पश्चिमेचं कच्छ ते पूर्वेचं कामरूप हे अंतर निर्देशित करणारं हे लघुरूप. ‘क’ ते ‘का’ आणि ‘क’ ते ‘का’असं दोन वेळा सूचित करावं लागत असल्यानं त्याचं केलेलं ‘कक्का स्क्वेअर’ हे लघुनामांकन. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपाचे जे पानिपत झाले, त्याला नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरता येणार नाही असा युक्तिवाद पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे..

चक्रवीर!
जगभरातील व विशेषत: अमेरिकेतील वाहनउद्योग आज मंदीमुळेआर्थिक अडचणीत सापडला असला तरी फोर्ड कंपनीने मंदीवर मात करण्यात यश मिळविले आहे. या धडाडीची बीजे तिचे संस्थापक हेन्री फोर्ड यांच्या संस्कारातूनच गवसली असतील. हेन्री फोर्ड यांचा ३० जुलैला जन्मदिन आहे. आज इंटरनेटवरून हेन्री फोर्ड यांच्याबद्दल एका ‘सर्च’मध्ये विपुल माहितीचे शेकडो स्रोत सहज गवसतील. पण माझ्या हाती आहे गोविंद विष्णु पेठे यांनी शके १८५१ मध्ये लिहिलेले ‘कर्मवीर हेन्री फोर्ड यांचे चरित्र’ हे पुस्तक! त्याची किंमत आहे चौदा आणे. या पुस्तकात हेन्री फोर्ड यांच्यातील यंत्रवीराची विलक्षण जडणघडण उलगडते. समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची झालेली मैत्री, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम; यांची रंगतदार ओळख होते. १८९२ मध्ये त्यांनी केलेल्या पहिल्या गाडीचे हे वर्णन पाहा : ‘ती लहानशा बगीप्रमाणे होती. दुचाकीच्या चार चाकांवर एक लहानसा सांगाडा बसवून त्यावर दोन माणसांना पुरेल एवढी बैठक तयार केली होती.

खाणींमुळे ताडोबाच्या वनवैभवाला धोका!
एकीकडे ताडोबाची कीर्ती जगभर पसरत असताना त्याला ग्रहण लागते की काय, असे वातावरण आता निर्माण होऊ लागले आहे. देशातील एकूण २८ व्याघ्र प्रकल्पात सातव्या क्रमांकावर असलेल्या ताडोबाच्या बफरझोनमध्ये कोळसा खाणी हव्यात की नको, हा प्रश्न सध्या विदर्भात गाजू लागला आहे. भोवताल कोळसा खाणी आणि मध्ये ताडोबा हे संभाव्य चित्र हजारो पर्यावरणप्रेमींना अस्वस्थ करणारे आहे. सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले ताडोबातील जंगल विविध प्राण्यांनी व शेकडो प्रकारच्या वृक्षप्रजातींनी अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी ताडोबाला भेट देण्याऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. यंदा तब्बल ६५ हजार पर्यटक आले होते. यातील दहा टक्के विदेशी होते. आता ताडोबाच्या रूपाने राखले जात असलेले पर्यावरणाचे संतुलन खाणींना परवानगी देऊन विस्कळीत करायचे की खाणी नको, अशी भूमिका घ्यायची, या पेचात सारे सापडले आहेत. त्याला निमित्तही तसेच आहे.