Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

जगातील सर्वात स्वस्त मोटार म्हणून ओळखली जाणारी टाटा मोटर्स या कंपनीची ‘टाटा नॅनो’ गुरुवारी पुण्यातील रिटा सिप्पी यांना एका विशेष कार्यक्रमामध्ये देण्यात आली. रिटा सिप्पी यांच्या मुलीच्या नावाने या मोटारीची खरेदी करण्यात आली. मात्र मुलगी उपस्थित नसल्याने रिटा सिप्पी यांनी पुण्यातील पहिली टाटा नॅनो आज स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक सरव्यवस्थापक चंद्रशेखर पोवार यांच्या हस्ते स्वीकारली. या वेळी बी. यू. भंडारी ऑटोचे सहव्यवस्थापकीय संचालक शैलेश भंडारी व चंद्रवदन भंडारी, तसेच टाटा मोटर्स पुणे विभागाचे व्यवस्थापक अय्याज अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.

सिम्बायोसिस व सेवासदनच्या दोन विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लू
पुणे, २३ जुलै / प्रतिनिधी
सिम्बायोसिस प्रश्नयमरी स्कूल तसेच इंग्रजी माध्यमाच्या सेवासदन विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे या दोन्ही शाळा येत्या आठ दिवसांसाठी बंद करण्याच्या सूचना महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी आर.आर. परदेशी यांनी दिल्या आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांना नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी आज नायडू रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णांना अपुऱ्या सुविधा मिळत असल्याबद्दल मोकाटे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले.

अकरावी प्रवेश यादी जाहीर
विज्ञान शाखेत दहा ते वीस टक्के जागा जादा
पुणे, २३ जुलै/ खास प्रतिनिधी
विज्ञान शाखेसाठी अतिरिक्त अर्ज आल्याने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना यंदा दहा ते वीस टक्के जादा जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय प्रवेश समितीने शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची गुणवत्तायादी आज जाहीर केली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. दुपारनंतर सर्व महाविद्यालयांत या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे त्या पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. उद्यापासून (२४ जुलै) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याच्या कामाला सुरुवात होणार असून, ३० जुलैपासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग नियमितपणे सुरू होणार आहेत.

राजकीय कुरघोडय़ाही
निवडणुका येताच विकास आराखडा आठवला!
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक जवळ येताच तेवीस गावांच्या विकास आराखडय़ाची ‘आठवण’ राजकीय पक्षांना झाली असून, या प्रश्नावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज दीड तास चाललेल्या चर्चेत जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि काही काळ गोंधळही झाला. तेवीस गावांचा विकास आराखडा निवडणुकीपूर्वी मंजूर होवो वा न होवो, आपण त्याबाबत आवाज उठवला, असाच एकूण या प्रकाराचा रंग होता.

पानशेत धरण निम्मे भरले; सध्या ५२ टक्के साठा
६५ टक्के साठा झाल्यावरच पाणीकपात रद्द
पुणे, २३ जुलै/खास प्रतिनिधी
खडकवासला धरण प्रकल्पात ६५ टक्के पाणीसाठा झाल्यावर शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात टप्प्याटप्प्याने रद्द केली जाणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश सुर्वे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पाटबंधारे खाते व महापालिकेमध्ये पाणीकपातीचे धोरण ठरले असल्याने त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अवघ्या तीन वर्षाच्या बालकांना दिले संगणकाचे धडे
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी
अवघ्या वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षातच पूर्व प्रश्नथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातामध्ये माऊस आणि संगणक की बोर्ड देण्याचा अभिनव उपक्रम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्या. रानडे बालक मंदिराने राबविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत पूर्व प्रश्नथमिक वर्गासाठी अशा प्रकारचा उपक्रम हा पहिलाच असावा असा शाळेचा दावा आहे.

चमिंडा वासची निवृत्ती
श्री लंकेचा डावखुरा जलदगती गोलंदाज चमिंडा वासने कसोटीतील निवृत्ती स्वीकारली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर तो कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तो दिसणार आहे. २०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याची त्याची मनीषा आहे. चमिंडा वासचे पूर्ण नाव काय, हे अनेक क्रिकेटरसिकांना तर सोडाच, पण क्रिकेटपंडितांनाही सांगता येणार नाही. त्याचे पूर्ण नाव ‘वर्णाकुलासुरिया पटाबेंडिंगे उशान्ता जोसेफ चमिंडा वास’ असे आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळेच २००४ मध्ये जागतिक कसोटीच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये चमिंडा वासचा समावेश होता. २००५ मध्येही चमिंडा वासचा पुन्हा एकदा जागतिक कसोटी इलेव्हनमध्ये समावेश झाला. डावखुरा जलदगती गोलंदाज.

----------------------------------------------------------------------------

सावकारी कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
पिंपरी, २३ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी येथे आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास एका तरुणाने सावकारी कर्जाला कंटाळून लोणावळा-पुणे लोकल गाडीखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. पिंपरी रेल्वे पोलीस दलाचे हवालदार एल. डी. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय फ्रॉन्सीस पारखे (वय ३८, रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. तो आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडविण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला. त्याने मुलाला शाळेमध्ये सोडले. मात्र, तो परत न आल्याने घरातील सर्वजण काळजीमध्ये असतानाच रेल्वे पोलिसांनी त्यांच्या घरी फोन करून हा प्रकार सांगितला.

नॅशनल स्पीड अॅरथमॅटिक स्पर्धेत उमंग महंत तृतीय
पुणे, २३ जुलै / प्रतिनिधी
चेन्नई येथे आयडियल प्ले अॅबॅकस इंडिया प्रश्न. लि. यांनी आयोजित केलेल्या नॅशनल स्पीड अॅरथमॅटिक स्पर्धेत उमंग महंत हिने तृतीय पारितोषिक पटकावले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र ठरलेल्या सर्व राज्यातील स्पर्धक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. चेन्नई येथील पोलीस महानिरीक्षक डॉ. सी. शैलेंद्र बाबु यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी आयडियल अॅबॅकस मलेशियाचे अध्यक्ष स्टीव्हन टॅन, कार्यकारी संचालक शारदा श्रीराम, संचालक चित्रा रवींद्रन उपस्थित होते.

‘साठामर्यादेपेक्षा धान्याचा जादा साठा केलेला नाही’
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी
दी पूना र्मचट्स चेंबरच्या सभासदांनी साठामर्यादेपेक्षा धान्याचा जादा साठा केलेला नाही, असे चेंबरचे अध्यक्ष दीपक बोरा यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. चेंबरच्या शिष्टमंडळाने अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आदेशानुसार तपासणी सुरू असून मर्यादेपेक्षा जास्त साठा कुणाकडेही अद्याप सापडलेला नाही व कोणावरही कारवाई झालेली नाही, असे शिष्टमंडळाला सांगितल्याचे बोरा यांनी पत्रात नमूद केले आहे. पूना डाळ अॅन्ड बेसन मिल हे उत्पादक असून त्यांच्या परवान्यानुसार त्यांना ४४ हजार ७०० क्विंटलची साठा क्षमता आहे. तपासणीत त्यांच्याकडे असलेली आठ हजार ३७० क्विंटल डाळ ही साठामर्यादेचा भंग करणारी नाही. तसेच राजेश शहा यांच्याकडील अठराशे क्विंटल एवढा तांदळाचा साठाही पाच हजार क्विंटल या मंजूर मर्यादेपेक्षा कमीच आहे. त्यांच्याकडील साठाही मर्यादेचा भंग करणारा नाही, असे बोरा यांनी कळवले आहे.

रुग्णवाहिनीचे उद्घाटन
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राम बोरकर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिनीचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.कोथरूड विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या मदतीसाठी ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे, असे मनसेचे उपाध्यक्ष बोरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कामगारांसाठीच्या इमारतीचे आज भूमिपूजन
पुणे, २३ जुलै / प्रतिनिधी

वॉर्ड क्र.८५ समताभूमी येथे महानगरपालिकेच्या वतीने चतुर्थश्रेणी कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या प्रसंगी महापौर राजलक्ष्मी भोसले, आमदार विनोद तावडे, शिवेसना उपनेते अरविंद सावंत, उल्हासदादा पवार, खासदार सुरेश कलमाडी, प्रकाश जावडेकर, माजी खासदार प्रदीप राऊत, आमदार गिरीश बापट, रमेश बागवे, मोहन जोशी, नगरसेवक विष्णू हरिहर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्रश्नचार्यपदी डॉ. रेवा कुलकर्णी
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी

एसएनडीटी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रश्नचार्यपदी डॉ. रेवा नंदकुमार कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कुलकर्णी गेली ३६ वर्षे हिंदी विषयाच्या अध्यापक म्हणून कार्यरत असून, हिंदी विषयाच्या अभ्यासक, उत्तम वक्त य़ा आणि नाटय़ाभिनय या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवरही त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

‘भाववाढीच्या नियंत्रणासाठी शासनाने प्रयत्न करावेत’
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी

सध्या पालेभाज्या, डाळी, दूध, गूळ, साखर या पदार्थाची महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पदार्थाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भारिप बहुजन संघाच्या शहर व जिल्हा शाखेने निवेदनातून दिला आहे.

पुस्तके मित्राची भूमिका बजावतात - रेणू गावसकर
पुणे, २३ जुलै/प्रतिनिधी

पुस्तके ही नेहमी विषयासंबंधी सुखद व सुंदर जाणीव करून देताना मित्राची भूमिका बजावतात, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता व लेखिका रेणू गावसकर यांनी आज व्यक्त केले. ज्ञानगंगा पुणे आयोजित ज्ञानोत्सव २००९ साहित्य- कला- संस्कृती प्रदर्शनाचे उद्घाटन गावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी उपस्थित होते. या प्रदर्शनाबरोबर साहित्यिक उपक्रम म्हणून २ ऑगस्टला ‘२६/११ ऑपरेशन मुंबई’ या पुस्तकावर अतुल कुलकर्णी यांची मुलाखत उज्ज्वला बर्वे घेणार आहेत. वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

बाबू गेनू मंडळासाठी नितीन देसाई देखावा उभारणार
पुणे, २३ जुलै / प्रतिनिधी

जोधा अकबर, लगान या चित्रपटांमधून कला दिग्दर्शनाचा उत्तम नमुना सादर करणारे कला दिग्दर्शक नितीन देसाई हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणेश उत्सवातील देखावा तयार करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नितीन देसाई उपस्थित होते. देसाई म्हणाले की, या वर्षी बाबू गेनू मंडळासाठी ‘गज गणेश महाल’ हा देखावा आम्ही तयार करणार आहेत. हा देखावा एकशे दहा फूट उंच असेल. देखाव्यामध्ये २१ भव्य हत्तींचा समावेश करण्यात येणार आहे. हा देखावा प्रथमच तयार केला जात असून, यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.