Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

क्रीडा

मारूती माने, माधवराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार
शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा
पुणे २३ जुलै/प्रतिनिधी

राज्य शासनातर्फे क्रीडा क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीबद्दल दिले जाणारे २००७-०८ या कालावधीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आज येथे जाहीर करण्यात आले. मारुती माने, माधवराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार तर पुण्याचे अभय छाजेड(अ‍ॅथलेटिक्स),मनोज एरंडे (जलतरण) हे संघटक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत तर पुण्याच्या रुपाली शिंदे (डायव्हिंग), मनीषा गारगोटे(हॅंडबॉल), शीतल मारणे (कबड्डी), केतकी कदम (वुशु), राजेश कळसकर (बॉक्सिंग) यांना खेळाडूंसाठी दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे.

कसोटी क्रिकेटची कसोटी
कसोटी क्रिकेटला धोका नाही- गांगुली
लंडन, २३ जुलै/ वृत्तसंस्था

कसोटी क्रिकेटला एक परंपरा आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. अन्य काही क्रिकेटच्या प्रकारांना लोकप्रियता मिळत असली तरी त्यामुळे कसोटी क्रिकेटला कोणताही धोका नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे. ट्वेन्टी- २० क्रिकेट कमी वयातच चांगला लोकप्रिय होत असला तरी त्यामुळे कसोटी क्रिकेटला धोका आहे असे भकित व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानसाठी ‘स्पिन इज विन’
विजयासाठी पाकिस्तानला सात विकेट्सची तर श्रीलंकेला ३०७ धावांची गरज
कोलंबो, २३ जुलै/ वृत्तसंस्था

श्रीलंकेच्या दौऱ्यातील तिसरा आणि शेवटचा सामना पाकिस्तानला जिंकायचा असेल तर त्यांना ‘स्पिन’ वाचून पर्याय नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानला तिसऱ्या सामन्यात विजयाची नामी संधी असून त्यांचा विजय हा संघातील फिरकीपटूंवर अवलंबून असेल. कारण पहिल्या डावात पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी श्रीलंकेच्या ९ विकेट्स घेतल्या होत्या. दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसरा डाव ४२५ धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेला विजयासाठी ४९२ धावांचे आव्हान दिले आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी व्ॉटसनला संधी मिळण्याची शक्यता
लंडन, २३ जुलै/ वृत्तसंस्था

मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे संघातून बाहेर बसणारा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन व्ॉटसन हा पूर्णपणे फिट झाला असून ३० सुरू जुलैपासून होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते. सलामीवीर फिलीप ह्युजेस सध्या फॉर्मात नसून त्याच्याजागी व्ॉटसनची वर्णी लागू शकते असे सुत्रांनी सांगितले आहे. काही दिवसांपासून मी संघासाठी डावाची सुरूवात करत आहे. सुरूवातीला मला सलामी करताना काही समस्या जाणवल्या होत्या. पण त्या त्रुटी मी काहि प्रमाणात कमी केलेल्या असून आता डावाची सुरूवात करताना मला कसलाही त्रास होत नाही.

नाशिकसाठी ‘सोनियाचा दिनु’
अविनाश पाटील, नाशिक, २३ जुलै

‘हाफमॅरेथॉन क्वीन’ कविता राऊत..तलवारबाज तनुजा पटेल..आणि असंख्य शारीरिक व मानसिक अडथळ्यांवर मात करीत अपंगांच्या विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करणारा जलतरणपटू हंसराज पाटील. नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात सुवर्णाक्षराने नोंद करावी असा दिवस या तिघांच्या कामगिरीमुळे उजाडला. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कविता व तनुजाला तर एकलव्य पुरस्कार हंसराजला जाहीर झाल्याचे वृत्त नाशिकमध्ये येताच क्रीडाप्रेमींच्या आनंदाला उधाण येणे साहजिकच.

बसच्या विलंबामुळे हॉकीपटूंचे विमान चुकले
पुणे, २३ जुलै/ प्रतिनिधी

विमानतळावर नेण्यासाठी येणाऱ्या बसला विलंब झाल्यामुळे भारतीय हॉकीपटूंचे विमान हुकले, त्यामुळे त्यांना लोहगाव विमानतळावर बराच वेळ तिष्ठत बसावे लागले. स्पेन, हॉलंड, बेल्जियम व इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय हॉकीपटू आज येथून नवी दिल्लीस सकाळी ६.१५ वाजता किंगफिशर विमानाने जाणार होते.

वानखेडे स्टेडियमच्या बांधकामाकरिता कर्जाची निकड?
मुंबई, २३ जुलै / क्री. प्र.

वानखेडे स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी सव्वादोनशे कोटी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार उत्तर आणि दक्षिणेकडील स्टॅण्डस्च्या बांधकामाकरिता सुमारे १७० कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याव्यतिरिक्त अंतर्गत सजावट, विद्युतझोत व्यवस्था आदी कामांसाठी खर्च लक्षात घेता सुमारे सव्वादोनशे कोटीपर्यंत खर्च होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

युनूस खानचे मन वळविण्याचे पीसीबीचे प्रयत्न
कराची, २३ जुलै, वृत्तसंस्था

ट्वेंटी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने युनूस खान याचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. इंग्लंडमध्ये गेल्या महिन्यात झालेली ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर युनूस खान याने पाकिस्तानच्या ट्वेंटी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र युनूस खानने कर्णधारपद सोडू नये असे मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी युनूस खानचे मन वळविण्याची जबाबदारी निवड समितीचे हंगामी अध्यक्ष वासिम बारी, सईद यांच्यावर सोपविली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी २० या तिन्ही संघांचे नेतृत्त्व एकाच व्यक्तीकडे असणे फायदेशीर आहे असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मत असून हे मत युनूसला पटवून देण्याची कामगिरी या दोघांवर टाकण्यात आली आहे, असे पाकिस्तान मंडळातील एका सूत्राने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. युनूस खान याने ट्वेंटी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करताना आपल्या वयाचे कारण दिले होते. युनूस खान याच्या जागी शाहिद आफ्रिदी याची नियुक्ती होणार असल्याची चर्चा चालू होती. खुद्द आफ्रिदी याने युनूस खान हाच कर्णधारपदी राहावा असे मत व्यक्त केले आहे.

सचिन टॉप; आठ कोटींचा कर भरला
नवी दिल्ली, २३ जुलै / वृत्तसंस्था

भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर फलंदाजीत सर्वोत्तम आहे, हे सारेच जाणतात. कर भरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्येही तोच अव्वल आहे. गेली तीन वर्षे त्याने आपले हे स्थान कायम राखले असून यावर्षी त्याने ८.१कोटी रुपये कररूपात भरले आहेत. सचिनपाठोपाठ महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविड गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर होता, पण यंदा तो पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.