Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

ऊर्जामंत्री तटकरे आज भुसावळात
भुसावळ / वार्ताहर

येथील औष्णिक वीज प्रकल्पाच्या बॉयलरमधील रोटरी पार्ट इरेक्शनचा शुभारंभ २४ जुलै रोजी

 

ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाजेनकोचे निर्मिती प्रकल्पप्रमुख रवींद्र गौर यांनी दिली. प्रकल्पाचे विस्तारीत ५०० मेगाव्ॉटचे दोन प्रकल्प निर्माण करण्यात येत आहेत. त्यापैकी संच क्र. ४ हा २२ मे २०१०पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॉयलरच्या रोटरी पार्ट इरेक्शनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. विस्तारित प्रकल्प क्र. ५ चे काम २२ सप्टेंबर २०१०मध्ये पूर्ण करावयाचे असल्याने या दोन्ही संचाच्या टाकी उभारण्याचे काम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड व टाटा यांनी हाती घेतले आहे. दोन्ही संचातील धूर हवेत सोडणारी २७० मीटर उंची असलेली चिमणी उभारण्याचे काम जवळपास पूर्ण होत आल्याची माहिती गौर यांनी दिली. प्रकल्पाचा आढावा घेण्याचे काम पहिल्यांदाच मंत्रीपातळीवरून होत आहे. डॉ. सुनील देशमुख, पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, खा. हरिभाऊ जावळे, आ. संतोष चौधरी हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.