Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महापालिकेतर्फे आजपासून श्रावणोत्सव व्याख्यानमाला
धुळे / वार्ताहर

महापालिकेतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय श्रावणोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले

 

आहे. आ. राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. महापालिकेच्या राजर्षि शाहू महाराज नाटय़मंदिरात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या उद्घाटन सत्रात पूर्णिमा हुंडीवाले या ‘स्वराज्य व राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर पहिले पुष्प गुंफतील. प्रश्न. सदाशिव माळी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. शनिवारी प्रश्न. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रम होईल. प्रश्न. डॉ. मु. ब. शहा हे अध्यक्षस्थानी राहतील. कवी प्रश्न. पुरूषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ‘भारत कधी कधी माझा देश’ या विषयावर कवी रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे व सुरेश शिंदे हे दिग्गज मत मांडतील, अशी माहिती महापौरांचे स्वीय सहायक मनोज वाघ यांनी दिली. शहरातंर्गत नागरी सुविधा पुरवितानाच महापालिकेने नागरिकांच्या ज्ञान-मनोरंजन व वैचारिक प्रबोधनासाठी श्रावणोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध कलावंत निळू फुले व गीतकार शांताराम नांदगावकर यांना रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पारिजात चव्हाण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होईल. व्याख्यानमालेचा रसिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन महापौर मोहन नवले, उपमहापौर फर्जुल रहमान अन्सारी, आयुक्त अजित जाधव यांनी केले आहे.