Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

धरणांतून पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्य़ाला पुराचा धोका
भंडारा, २३ जुलै / वार्ताहर

मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून १ लाख १३ हजार क्युसेक्स पाणी, तर गोंदिया जिल्ह्य़ातील पुजारीटोला धरणातून २५ हजार क्युसेक्स पाणी वैनगंगेत सोडले गेले असून वैनगंगेच्या उगमस्थानाकडील प्रदेशात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील १५९ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘नक्षलवादविरोधी लढय़ासाठी पोलीस व लष्कराच्या दलांमध्ये समन्वय आवश्यक’
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २३ जुलै

नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आता लष्कर किंवा निमलष्करी दलांना पाचारण करण्याचा पर्याय योग्य असला तरी पोलीस यंत्रणा व या दलांमध्ये समन्वय असल्याशिवाय ही कामगिरी यशस्वी होऊ शकत नाही, असा सूर वरिष्ठांच्या वर्तुळात उमटू लागला आहे. समन्वयाचा अभाव असल्यामुळेच छत्तीसगड व झारखंडमध्ये ही दले असूनही समस्या सुटू शकली नाही. या पाश्र्वभूमीवर येत्या ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या मोहिमेसाठी पोलीस दलाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

बहुतांशी कामे मार्गी
मधुकर खोकले

आमदार तुकाराम बिरकड यांनी मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघात केंद्र व राज्याकडून विकास कामे खेचून आणून मार्गी लावली त्यामध्ये लाखाचा हिशेबच धरता येत नाही, तर बहुतेक सर्वच कामे कोटीच्या वर खर्चाचीच आहेत.परिसीमन आयोगाच्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा संघ अनुसूचितांसाठी राखीव म्हणून निर्धारित झाल्यामुळे आमदार तुकाराम बिरकड यांची मतदारसंघात विकास कामे आणि जनसामान्यांच्या समस्यांचा निपटारा करण्याची संधी हुकली आहे.

राजकीय पुढाऱ्यांना महाविद्यालयांची खैरात
संलग्नीकरण व विद्यार्थी प्रवेशाची समस्या
न.मा. जोशी, यवतमाळ, २३ जुलै

राजकीय पुढाऱ्यांच्या संस्थांना सरकारने नवीन महाविद्यालयांची खैरात केली असली तरी विद्यापीठाचे संलग्नीकरण, विद्यार्थी प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याप्रमाणे शासनाने ज्या नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली असेल त्या महाविद्यालयांची नावे संबंधित विद्यापीठाकडे ३१ मे पूर्वी पोहोचली पाहिजेत.

प्रश्नचार्यपदासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या प्रश्नध्यापकाविरुद्ध गुन्हा
वर्धा, २३ जुलै / प्रतिनिधी

शिक्षा मंडलद्वारे संचालित येथील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रश्नचार्यपदावर डोळा ठेवून बनावट प्रमाणपत्र सादर करण्याची मजल प्रश्नध्यापक गाठत असून याप्रकरणी एकावर विविध गुन्हे दाखल झाले.

वडाळा रस्त्याची दुर्दशा
* २ महिन्यापासून बसफेरी नाही
* विद्यार्थ्यांना रोज ७ कि.मी.ची पायपीट
वरूड, २३ जुलै / वार्ताहर
प्रशासन किती निद्रिस्त आहे याचा अनुभव वडाळा ग्रामवासी घेत आहे. गेल्या २ वर्षापासून वडाळा-राजुरा बाजार रस्त्यावर जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असताना केवळ माती टाकून बुजविण्यात आले. मात्र, पावसाळ्यात रपटय़ांवर ५ फूट खोल ४ खड्डे अन् रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडल्यानंतर ते बुजविण्याची मागणी वडाळा ग्रामवासीयांनी वरिष्ठांकडे केलेल्या निवेदनात केली.

अल्लीपुरात फवारणीची मोहीम
वडनेर, २३ जुलै / वार्ताहर
अल्लीपूर परिसरात हिवताप आणि चंडीपुरा तापाची लागण झाली असून आरोग्य खाते आणि जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उपाययोजना म्हणून अल्लीपूर भागात फवारणीची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक घरोघरी जाऊन हिवतापाचा संशयित रुग्ण शोधणे, घर परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने मार्गदर्शन, औषधोपचार, फवारणी करून त्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पारधी, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे कर्मचारी तालुका पर्यवेक्षक साळवे, आरोग्य केंद्राचे राठोड, धनराज घोडमारे यांच्यासह इतर कर्मचारी धडक मोहीम राबवित आहेत.

गुणवंतांचा सत्कार
मानोरा, २३ जुलै / वार्ताहर
सेवालाल आर्मीच्यावतीने हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बळी राठोड यांच्या पुढाकाराने २२ जुलैला आयोजित करण्यात आला. या सामाजिक कार्यक्रमाकडे कोणीही फिरकला नसल्याने अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वसंतराव नाईक सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमसिंग महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ नाईक, भावसिंग राठोड, के.झेड. राठोड, मोरसिंग राठोड, वामन राठोड, वसंतराव राठोड, जयसिंग जाधव, प्रश्न. पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमास बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक बळी राठोड यांनी, तर संचालन प्रश्न. राठोड यांनी केले.

विद्यार्थ्यांना नोटबुकांचे वाटप
चंद्रपूर, २३ जुलै / प्रतिनिधी
सिंदेवाही येथील पद्मशाली युवा मंचच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना नोटबुकांचे वाटप व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विदर्भ पद्मशाली युवा मंचचे कोषाध्यक्ष भारत तोकलवार, आशीष सादमवार, पद्मशाली युवा मंचचे अध्यक्ष साईनाथ अल्लेवार उपस्थित होते. हा कार्यक्रम महाकाली मंदिराजवळ असलेल्या महामृत्युंजय मरकडेय मंदिरात झाला. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच समाजकार्यातही रस दाखवावा, असे आवाहन युवा मंचचे अध्यक्ष साईनाथ अल्लेवार यांनी केले. समाजसेवक किशोर जोरगेवार यांनी या सामाजिक कार्यासाठी यथायोग्य सहकार्य केले. रमेश दिनगलवार यांनीही या कार्यास मदत केली. यावेळी पद्मशाली युवा मंचचे राजू सुंकूरवार, वैभव चामलवार, वीरेंद्र अल्लेवार व अनेक युवकांचा समावेश होता.

गोंदिया जिल्हा क्रिकेट संघाची रविवारी निवड
गोंदिया, २३ जुलै / वार्ताहर

येथील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने २६ जुलैला इंदिरा गांधी स्टेडियम येथे सकाळी ८ वाजता १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात येणारा संघ राज्य पातळीवरील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे. याकरिता ३० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असून अधिक माहितीसाठी मुकेश बारई (उत्सव कलेक्शन), पुष्पक जसानी, शब्बीर अहमद, राजू लिमये, त्रिलोक तुरकर, प्रश्न. सुधीर घुसे, प्रश्न. मोहन वानखेडे, सुनील काळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.

समर्थ महाविद्यालयात अनेक अभ्यासक्रमांना मान्यता
भंडारा, २३ जुलै / वार्ताहर

महाराष्ट्र शासनाने लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाला एम.ए. करिता इंग्रजी, संस्कृत, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गृहअर्थशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमाला तसेच विज्ञान शाखेत द्वितीय वर्ष, वाणिज्य शाखेत बी.सी.ए., विज्ञान शाखेत मायक्रोबायोलॉजी व कॉम्प्युटर सायन्स या विषयांना नव्याने मान्यता दिली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
भंडारा, २३ जुलै / वार्ताहर

अण्णाभाऊंचा पिंड अस्सल मराठमोळ्या शाहिराचा होता. डफ व तुणतुणे यांच्या तालावर समाजप्रबोधनात्मक गीते त्यांनी गायिली. आपल्या साहित्यातून तत्कालीन पिचलेल्या समाजजीवनाच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नांचे ज्वलंत चित्रण केले, असे आंबेडकरी विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक हर्षल मेश्राम यांनी सांगितले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मातंग समाज कमेटीचे अध्यक्ष भाऊ अवसरे यांनी आयोजित अभिवादन सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी ढोके यांनी समाजबांधवांना ऐक्याचे आवाहन केले. या सभेचे संचालन प्रतापराव पवार यांनी केले. आभार रमेश वाघमारे यांनी मानले.

भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी
भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाची सभा पत्रकार भवनात घेण्यात आली. यामध्ये १० स्वीकृत सदस्यांचा समावेश करण्यात आला. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सभासदांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष रमेश चेटुले, सचिव मिलिंद हळवे, सहसचिव दीपक फुलबांधे, कोषाध्यक्ष दादाजी कोचे, कार्यकारिणी सदस्य अश्विन नागदेवे, प्रश्न. बबन मेश्राम, प्रमोद नागदेवे, आबीद सिद्धीकी, पदसिद्ध सदस्य जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राज्य परिषद सदस्य शेखर मगर हे आहेत. स्वीकृत सदस्यांमध्ये कांचन देशपांडे, इंद्रपाल कटकवार, मेघा राऊत, काशिनाथ ढोमणे, गोविंद हटवार, शशी वर्मा, दीपेंद्र गोस्वामी, देवानंद नंदेश्वर, नितीन कारेमोरे, राजू मस्के यांचा समावेश आहे.

विवेक मदनकरचे सुयश
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणद्वारा राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत स्थानिक बंसीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थी विवेक सहदेव मदनकर वर्ग १० याने रोख १००० रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रश्नप्त केले आहे. वादविवाद स्पर्धेचा विषय ऊर्जा संवर्धनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ अल्पबचत भवन, पुणे येथे राज्यपाल, एस.सी. जमीर, मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

कमी उंचीच्या रपटय़ांची उंची वाढविण्याची मागणी
करचखेडा-खडकी रोडवरील सुरेवाडा, खमारी, ढिवरवाडा, डोंगरदेव येथील कमी उंचीचे रपटे पावसाळ्यात अनेकदा तुडुंब भरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन पूर्णत: विस्कळीत होते. त्यामुळे कमी उंचीच्या रपटय़ांची उंची वाढविण्यात यावी, अशी जनतेची मागणी आहे. करचखेडा-खडकी रोडवरील गावांमधील बहुतांश मजूर वर्ग दरदिवशी कामाकरिता भंडारा येथे येत असतो. परंतु, पावसाळ्यात रपटय़ांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते व मजूर वर्गासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा चार-चार दिवस रपटय़ावरून पाणी कमी होत नाही. अशावेळी मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येते. आजारी व्यक्तीला प्रश्नथमिक उपचाराकरिता सुद्धा जाता येत नाही. याकडे प्रशासनाचे अनेकदा लक्ष वेधण्यात आले. या भागातील कमी उंचीच्या रपटय़ांची उंची वाढविण्याची वारंवार मागणी करण्यात आली. परंतु, प्रशासन यावर कोणतीच कारवाई करीत नाही. प्रशासनाचे व या भागातील लोकप्रतिनिधींनी करचखेडा, करडी मार्गावरील कमी उंचीच्या रपटय़ांची उंची वाढविण्याच्या कामांना प्रश्नधान्य द्यावे व मजुरांची होत असलेली उपासमार थांबवावी, असे जनतेची मागणी आहे.

वरूड बसस्थानकात घाणीचे साम्राज्य
वरूड, २३ जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ात उत्पन्नाच्या बाबतीत अग्रस्थानी असलेल्या वरूड बसस्थानकात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस कोसळल्यानंतर बसस्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचते. विशेषत: अमरावती, नागपूरकडे जाणाऱ्या बसेस या ठिकाणी थांबतात. प्रवाशांना उतरताना व चढताना पावसाच्या डबक्यातून ये-जा करावी लागते. या डबक्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असताना उपाययोजना आगार प्रमुखांनी आखल्या नाही. नव्यानेच आलेल्या बेलसरे आगार प्रमुखांनी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याबाबत उपाययोजना करून प्रवाशांना त्रासापासून मुक्त करण्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

भंडाऱ्यात उंट अळी व केसाळ अळीचा प्रश्नदुर्भाव
भंडारा, २३ जुलै / वार्ताहर

नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन या पिकावर यावर्षी हिरव्या उंट अळीचा व केसाळ अळीचा प्रश्नदुर्भाव आढळून आला आहे. पीक वाढीच्या पहिल्या टप्प्यातच सोयाबीनवर हिरव्या उंट अळ्यांनी हल्ला चढवला आहे. या अळ्यांच्या प्रश्नदुर्भावाने सोयाबीनच्या पानांची चाळणी होत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, कीड नियंत्रक, कीड सर्वेक्षक यांनी पवनी तालुक्यातील सोयाबीन क्षेत्राची पाहणी केली. त्यामध्ये सौंदड, खापरी, सिंदपुरी, रुयाळ, निष्ठी, आमगाव, भुयार या गावातील शेतांमध्ये उंट अळीचा व केसाळ अळीचा प्रश्नदुर्भाव आढळून आला आहे.